Weather Alert : थंडीची लाट 'या' जिल्ह्यांमध्ये कायम राहणार

26 जानेवारीला राज्यात आलेली थंडीची लाट राज्याच्या कोणत्या भागात कायम राहणार, वाचा सविस्तर...
Cold Wave in Maharashtra
Cold Wave in Maharashtra

देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस तरी ओसरण्याची शक्यता नाही. तर उत्तरेत उच्च दाब (high pressure belt) असल्यानं थंड वारे वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं येतायत. परिणामी, गेले तीन दिवस विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये थंडीची लाट (cold wave) आलीये. ही लाट मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून ओसरलीय.

पण विदर्भात मात्र येते दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं (IMD) वर्तवलीये. नागपूर वेधशाळेने पुढच्या 24 तासांसाठी विदर्भातल्या बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा 'यलो अलर्ट' (yellow alert) जारी केला असून थंड दिवस राहण्याचा इशारा कायम ठेवलाय.

Next 5 days weather warning for Vidarbha Dated 27.01.2022 #weatherwarning #imdnagpur #imd pic.twitter.com/AGy1esuRgL

— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur)

गेल्या आठवड्याच्या शेवटी मध्य महाराष्ट्र, कोकण, आणि वऱ्हाडातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसानं (unseasonal rainfall) हजेरी लावली होती. त्यानंतर आता थंड वारे या भागात थंडी ओतत आहेत.  उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यासहित काही ठिकाणी दवबिंदू गोठण्याचा अनुभव शेतकऱ्यांना आले. या थंडीपासून द्राक्ष आणि इतर रब्बी पिकांना वाचवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com