
Heat Stroke Update In Mumbai : उन्हाच्या झळांमुळे संपर्ण राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक भागांमध्ये पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आहे. यामुळे उष्माघाताचे प्रमाणही वाढल्याचे शासनाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे. जानेवारी ते आतापर्यंत राज्यभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे; तर २,२५३ रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
अनेक ठिकाणी दुपारी तापमानाचा चाळीशी गाठत आहे. घामाच्या धारांमुळे अंगाची लाही लाही होते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्तींना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
वाढत्या उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
बदललेली जीवनशैली, घरांची रचना, आधुनिक बांधकाम, वृक्षतोडीमुळे उष्णतेचा प्रकोप कायम राहणार असल्याने यावर दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाकडूनही काही उपाययोजना करण्यात येत आहेत. उष्माघाताचे आजार वाढले आहे.
शरिराचे तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वाढले तर ते सुर्याच्या गरमीपुढे सामान्य पातळी ठेवणे अशक्य होते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर येते. त्यामुळे राज्यात उष्णता विकार प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात दरवर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो.
बचावासाठी हे करा?
पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा. हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा. उन्हात जाताना टोपी खाली ओलसर कपडा ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत थंड ठिकाणी ठेवा. ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
हे करू नका
उन्हाच्या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळा. कष्टाची कामे उन्हात करू नका. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका. गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.