Monsoon Update 2023 : जूनमध्ये कमी पाऊस पडणार; आयएमडीचा सुधारित अंदाज जाहीर

IMD Monsoon Update : हवामान विभागाने जो नकाशा प्रसिध्द केला त्यानुसार महाराष्ट्रात कमी पाऊस दिसतो. नकाशात उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.
Monsoon Update 2023
Monsoon Update 2023Agrowon

Weather News : देशात यंदा माॅन्सून काळात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. वायव्य भारतात यंदा सरासरीपेक्षा कमी तर ईशान्य भारत, मध्य भारत आणि दक्षिण द्विपकल्प भागात सरासरी पाऊसमान राहील.

पण जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने जो नकाशा प्रसिध्द केला त्यानुसार महाराष्ट्रात कमी पाऊस दिसतो. नकाशात उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.

यंदा एल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. एल निनोचा माॅन्सूनवर काय परिणाम होऊ शकतो, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण भारतीय हवामान विभागाने आज माॅन्सून काळातील दीर्घकालीन पावसाचा अंदाज जाहीर केला.

या अंदाजात भारतीय हवामान विभागाने देशात यंदा सरासरी ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला. यात ४ टक्के अधिक किंवा कमी पाऊस गृहीत धरण्यात आला. माॅन्सून काळात एल निनो आणि आयओडी दोन्ही वातावरणीय स्थिती सक्रिय होतील. त्यामुळे देशपातळीवर सरासरी पाऊसमान राहील.

Monsoon Update 2023
Monsoon Update : मॉन्सून निर्धारित वेळेत अंदमानात दाखल

हवामान विभागाने यंदा जून ते सप्टेंबर याकाळात वायव्य भारतात ९२ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला. तर ईशान्य भारत, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात सरासरी ९४ ते १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला.

तर कोरडवाई शेतीक्षेत्र असलेल्या भागात यंदा ९४ ते १०६ टक्के पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जून महीन्यातील पावसाच्या अंदाजाचा विचार करता यंदा सरासरीपेक्षा कमीच पाऊस राहणार आहे. जून महीना खरिपाच्या लागवडीसाठी महत्वाचा असतो. पण यंदा जूनमध्येच पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज आहे. जूनमध्ये देशातील बहुतेक भागात सरासरी ९२ टक्के पाऊस असा अंदाज आहे.

तर दक्षिण द्वीपकल्प आणि व्यायव्य भारतातील काही भाग आणि अति उत्तरेतील भाग आणि ईशान्य भारतातील काही भागात जून महिन्यात सरासरीपेक्षा काहीसा अधिक पाऊश पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com