Hawaman Andaj IMD: राज्यात आजही गारपीटीची इशारा; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

राज्यात हरभरा, गहू, द्राक्ष, करडई, रब्बी ज्वारी पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
Hawaman Andaj
Hawaman AndajAgrowon

Rain update : राज्यात पुढील विविध भागात शनिवार (ता. १८) वादळी पावसाचा इशारा वर्तवण्यात आला. तसेच विदर्भात आज शुक्रवार (ता.१७) विजा, वादळी वारे आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला.

तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शुक्रवारी (ता.१६) संध्याकाळी मराठवाडा आणि विदर्भाच्या वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड जिल्ह्यात वादळी गारपीटीचा जबर तडाखा बसला.

तर विदर्भातील बुलढाणा, वाशिम, चंद्रपुर नागपूर या जिल्ह्यातील अनेक भागात प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच कोकणातही वादळी पावसाने काजू, आंबा पिका मोठा फटका बसला आहे.

Hawaman Andaj
Rain Forecast : वादळी पावसाचा अंदाज कायम

नाशिक भागात द्राक्ष उत्पादकांना वादळी वाऱ्यांने नुकसान केले. पुणे शहरात संध्याकाळी काळे ढग जमून काळोख पसरला. शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचं मोठं प्रमाणात नुकसान झाले आहे. शुकवारी (ता.१७) राज्याच्या काही जिल्ह्यात ताशी ४० ते ५० प्रतिकिलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात हरभरा, गहू, द्राक्ष, करडई, रब्बी ज्वारी पिकांची काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. फळबागांना गारपीटीचा तडाखा बसला आहे. भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात वादळी पावसाने नुकसान केले आहे.

जनावारांची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच जनावरांना झाडाखाली बांधू नये. कापणी केलेल्या पिकाच्या गंजी झाकून ठेवाव्यात.

राज्यातील वादळी पावसाने नुकसान होत असल्याची बाब विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत मांडली. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Hawaman Andaj
Stormy Rain : वारा, पावसाचे संकट कायम; शेतीमाल वाचविण्याची लगबग

नैॡत्य राजस्थान आणि कच्छ परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. १७) राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काही जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com