Summer Heat Wave : विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Weather News : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असले तरी उन्हाची ताप कायम आहे. वाढलेल्या चटक्याने विदर्भ भाजून निघत असून, उर्वरित राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत.
Heat Wave Maharashtra
Heat Wave Maharashtra Agrowon

Weather Update Pune : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असले तरी उन्हाची ताप कायम आहे. वाढलेल्या चटक्याने विदर्भ भाजून निघत असून, उर्वरित राज्यात उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. आज (ता. २६) राज्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर नागपूर आणि अकोला येथे कमाल तापमान ४३ अंशांच्या पुढे गेले आहे.

विदर्भात अनेक ठिकाणी पारा ४२ अंशाच्या वर होता. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३५ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका आणि दमट हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे.

Heat Wave Maharashtra
Monsoon Update IMD 2023 : मॉन्सून शुक्रवारपर्यंत अंदमानात दाखल होणार; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

वायव्य उत्तर प्रदेशापासून दक्षिण बांगलादेशपर्यंत, तसेच मध्य प्रदेशपासून, विदर्भ, तेलंगणा ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत.

आज (ता. २६) उष्ण व दमट हवामानामुळे राज्यात चटका आणि उकाडा कायम राहणार आहे. विदर्भातील उन्हाच्या झळा अधिक राहणार असून, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Heat Wave Maharashtra
Monsoon Update : मॉन्सून निर्धारित वेळेत अंदमानात दाखल

गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३७.६ (२४), जळगाव - (२७.६), धुळे ४१.५, कोल्हापूर ३५ (२३.५), महाबळेश्‍वर ३२.१ (१८.१), नाशिक ३६.१ (२३.४),

निफाड ३८ (२५.४), सांगली ३९.२ (२२.९), सातारा ३८.७ (२३.७), सोलापूर ४१.४ (२५.५), सांताक्रूझ ३४.१ (२८), डहाणू ३५.४ (२९), रत्नागिरी ३४.२ (२७),

छत्रपती संभाजीनगर ३९.६ (२४), नांदेड ४१.६ (२८.६), परभणी ४२.८ (२८), अकोला ४३ (२८.२), अमरावती ४२.६ (२६.३), बुलडाणा ३९.४ (२५.१), ब्रह्मपुरी ४२.७ (२९.६),

चंद्रपूर ४२.८ (२७.८), गोंदिया ४२.२ (२७), नागपूर ४३ (२६.५), वर्धा ४३.४ (३०), वाशीम ४२ (२५.२) यवतमाळ ४१.७ (२०.२).

मॉन्सूनची वाटचाल शक्य

नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर हजेरी लावली. गुरुवारी (ता. २५) मॉन्सूनच्या वाटचालीत कोणतीही प्रगती झाली नाही.

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्राच्या आणखी काही भागांसह अंदमान बेटांच्या काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

उष्ण लाटेचा इशारा

विदर्भ, अकोला, अमरावती, वर्धा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com