
Akola Rain : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) बनले आहे. शिवाय अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाच्या सरींचे आगमन झाले.
शिवाय दिवसभर ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा काढणीला तयार झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. २० मार्चपर्यंत असे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सध्या गहू, हरभरा काढणीला वेग आला आहे. पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यापासून शेतकरी हा शेतीमाल घरी आणण्यासाठी एकच धडपड करीत आहेत.
बुधवारी (ता. १५) रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी पहाटेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे मळणीच्या कामावर परिणाम झाला.
बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, संग्रामपूर व इतर तालुक्यांमध्ये पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर व इतर भागात काही गावांमध्ये पावसाने हजेरी दिली.
वाशीम जिल्ह्यातील मध्यम स्वरूपाच्या सरी काही भागात झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सतत ढगाळ वातावरण राहत असल्याने भाजीपाला वेलवर्गीय पिकांवर बुरशीचा प्रभाव वाढण्याची चिन्हे आहे.
वादळी वारा, पाऊस, ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा उत्पादकांची चिंता वाढली आहे. शेतकरी मिळेल त्या साधनाने मळणीसाठी धडपड करीत आहेत.
शेतकऱ्यांकडून मागणी वाढल्याने हार्वेस्टरचे दर वाढवण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.