Pre-Monsoon Rain : राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पाऊस

Monsoon Rain Update : राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली आहे. रविवारी (ता. ४) दुपारनंतर अचानक काळाकुट्ट ढग गोळा होत मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाने राज्याच्या विविध भागांत हजेरी लावली.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon

Pune Rain Update : राज्यात पूर्वमोसमी पावसाला सुरवात झाली आहे. रविवारी (ता. ४) दुपारनंतर अचानक काळाकुट्ट ढग गोळा होत मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाने राज्याच्या विविध भागांत हजेरी लावली.

जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी धुळीचे लोट उसळले. सर्वत्र काळोख पसरला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. वादळामुळे केळी, पपईच्या बागा भुईसपाट झाल्या असून, उन्हाळी पिके देखील आडवी झाली आहेत.

...अशी आहे नुकसान स्थिती

- खानदेशात वादळी पावसाने नुकसान

- जळगावात केळी पीक भुईसपाट

- नाशिकमध्ये पाऊस, गारपिटीने दाणादाण

- वादळामुळे धुळीचे लोट, सर्वत्र काळोख

- नगरमध्ये मल्चिंग, शेडनेटचे नुकसान

- शिवली (ता. औसा) येथे पपई बागांचे मोठे नुकसान

Monsoon Rain
Rain Update : निसर्गाकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत

नाशिक जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीने दाणादाण उडाली. वादळी वाऱ्याने अधिक फटका बसला तर पावसाचा जोर तुलनेत कमी होता. पावसामुळे साठवलेला कांदा भिजला, शेवगा व पपई लागवडी आडव्या झाल्या. भाजीपाला पिके, घरे व झाडांचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या. सिन्नर तालुक्यातील विंचूरी दळवी परिसरात १५ मिनिटे जोरदार गारपीट झाली.

नगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, संगमनेर, अकोले परिसरात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. कोपरगाव तालुक्यात येसगाव टाकळी फाटा भागात वादळाचा तडाखा बसला आहे. शेवगाव तालुक्यातील वादळामुळे झाडे उन्मळून पडली.

छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात रविवारी दुपारी अनेक घरावरील पत्रे उडून गेले. झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी पाऊसही झाला. गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी परिसरात शेतीत काम करणाऱ्या दोघांच्या अंगावर वीज पडून एक जण मृत्यूमुखी पडला.

Monsoon Rain
Monsoon Rain : पावसाच्या अंदाजासाठी ‘एल निनो‘ घटक महत्त्वाचा...

पुणे जिल्ह्यातील हवेली, मुळशी, मावळ, खेड, भोर, पुरंदर, बारामती भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. बारामती भागात अचानक धूळ वादळ वाहिल्याने काही मिनिटात शहरावर काळोख सदृश परिस्थिती झाली.

शिवली (ता. औसा) येथे शनिवारी (ता.३) दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे येथील पपई बागांचे मोठे नुकसान झाले. जवळपास ६० एकरांवरील या बागांचे नुकसान झाले.

खानदेशात अनेक भागांत गारपीट

खानदेशात जोरदार वादळ वारे वाहून, पावसाने हजेरी लावली. जळगाव जिल्ह्यात जळगाव, रावेर, भुसावळ, जामनेर, यावल, धरणगाव भागात वादळ व हलकी गारपीट झाली. जळगाव तालुक्यातील फुपनगरी, कानळदा भागात अनेक शेतकऱ्यांचे केळी पीक भुईसपाट झाले. अनेक घरांचे पत्रे उडाले. सुमारे अर्धा तास वादळ सुरू होते. धुळ्यात धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा भागात पाऊस झाला. वादळाने मोठी हानी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com