Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका वाढला

राज्यात उन्हाची ताप वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ३८ अंशांच्या पार पोहोचला असून, उकाड्यात वाढ झाली आहे.
Heat Wave
Heat WaveAgrowon

Weather Update पुणे : राज्यात उन्हाची ताप (Heat) वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा (Temperature) ३८ अंशांच्या पार पोहोचला असून, उकाड्यात वाढ झाली आहे.

आज (ता. २८) राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, उद्यापासून (ता. २९) विदर्भात तुरळक ठिकाणी विजा मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता (Rain Forecast) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, उकाड्यातही वाढ होत आहे. सोमवारी (ता.२७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे राज्यातील उच्चांकी वर्धा ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, अमरावती व यवतमाळ येथे कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढे होते.

Heat Wave
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील एल निनोची स्थिती काय?

उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३२ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. तर, किमान तापमानातही चढ-उतार होत असून, बहुतांश ठिकाणी पारा १२ अंशांच्या पुढे कायम आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान १०.५ अंश सेल्सिअस तापमानाचा नोंद झाली.

Heat Wave
Weather Station : पीकनुकसान मदतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्र

छत्तीसगडपासून, विदर्भ, तेलंगण, कर्नाटक ते दक्षिण तमीळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत.

ओडिशापासून झारखंडपर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होत असल्याने उद्या (ता. २९) पासून विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.

तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Heat Wave
Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका वाढणार

सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.६ (१३.६), जळगाव ३५.७ (१९.५), धुळे ३४.५ (१५.८), कोल्हापूर ३५.६ (१८.७), महाबळेश्वर २९.९ (१३.८), नाशिक ३१.७ (१६.६), निफाड ३३.२(१०.५),

सांगली ३५.७ (१७.१), सातारा ३५.२ (१३.६), सोलापूर ३७.०(२०.९), सांताक्रूझ ३०.५ (२१.२), डहाणू ३०.३ (२०.६), रत्नागिरी ३१.१ (२०.७),

छत्रपती संभाजीनगर ३४.३ (१८.२), नांदेड ३७.६ (२०.८), परभणी ३७.५ (२०.४), अकोला ३८.३ (१८.६), अमरावती ३८.०(१८.१), बुलडाणा ३४.० (२०.६), ब्रह्मपुरी ३६.८ (२०.६),

चंद्रपूर ३०.२ (२१.८), गडचिरोली ३५.४(१९.०), गोंदिया ३६.० (१९.६), नागपूर ३५.८ (२०.२), वर्धा ३८.६(२१.५), वाशीम ३५.४ (२०.०), यवतमाळ ३८.० (१८.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com