Summer Heat : राज्यात उन्हाचा चटका वाढला

Weather Update : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे देखील तापदायक ठरत आहे.
Summer Heat
Summer Heat Agrowon

Weather Update Pune : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे देखील तापदायक ठरत आहे.

विदर्भासह राज्यात असलेल्या ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढला आहे. आज (ता. २१) तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.७ तापमानाची नोंद झाली. तर विदर्भात उन्हाची ताप चांगलीच वाढली असून, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, ब्रह्मपूरी, वाशीम येथे तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे.

मध्य महाराष्ट्रातील जळगाव, सोलापूर, आणि मराठवाड्यातील परभणी येथे उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरत आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३८ ते ४२ अंशांच्या दरम्यान होते.

Summer Heat
Summer Heat : राज्यासह देशभरात उन्हाचा चटका वाढणार ; पारा ४२ अंशावर जाण्याची शक्यता

पश्चिम विदर्भापासून, छत्तीसगड ते उत्तर तेलंगणापर्यंत, तसेच कर्नाटकपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहे.

आज (ता. २१) उष्ण व दमट हवामानामुळे चटका आणि उकाडा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Summer Heat
Summer Heat Update : तापमानाचा पारा ४० अंश पार

शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.७ (२३.१), जळगाव ४३.२ (२६.७), धुळे ४०.० (-), कोल्हापूर ३९.६ (२३.६), महाबळेश्वर ३३.९ (१९.४), नाशिक ३८.३ (२२.३),

निफाड ४०.१ (२३.६), सांगली ४०.६ (२४.१), सातारा ३९.८ (२३.६), सोलापूर ४३.० (२७.१), सांताक्रूझ ३४.१ (२६.८), डहाणू ३३.९ (२७.७), रत्नागिरी ३४.० (२४.१),

छत्रपती संभाजीनगर ४०.७(२४.४), नांदेड ४१.८ (२७.२), परभणी ४२.६ (२७.६), अकोला ४३.७ (२८.९), अमरावती ४३.४(२५.७), बुलढाणा ३९.६ (२७.४), ब्रह्मपूरी ४२.१ (२६.०),

चंद्रपूर ४२.८(२७.८), गडचिरोली ४१.२(२६.०), गोंदिया ४१.८ (२७.०), नागपूर ४२.६ (२४.९), वर्धा ४३.२(२६.८), वाशीम ४२.०(२६.४) यवतमाळ ४१.२ (२६.५).

दोन दिवसातं मॉन्सूनची प्रगती

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल झाला. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसात दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

विदर्भ : अमरावती, वाशीम, यवतमाळ, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com