Rain Forecast : राज्यात वादळी पावसाचे सावट कायम

तापमान चाळिशीपार गेल्याने राज्यात उन्हाच्या झळा असह्य होत असतानाच राज्याच्या विविध भागांत वादळी पाऊस गारपिटीने हजेरी लावली आहे.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon

Weather Update Pune : तापमान चाळिशीपार गेल्याने राज्यात उन्हाच्या झळा (Summer Heat) असह्य होत असतानाच राज्याच्या विविध भागांत वादळी पाऊस गारपिटीने (Hailstorm) हजेरी लावली आहे.

आज (ता. ८) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (Rain Forecast) हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे. उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी दुपारपासून तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यात वादळी पावसासह जोरदार गारपीट झाल्याने कांदा, लिंबू व खरबूज आदी पिकांचे नुकसान झाले.

तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी पावसाला सुरुवात झाली होती.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, ब्रह्मपुरी येथे तापमान ४० अंशांवर होते.

कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा १४ ते २५ अंशांच्या दरम्यान स्थिरावला आहे.

उत्तर मध्य प्रदेशपासून विदर्भ, मराठवाडा, अंतर्गत कर्नाटक, दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर खंडित वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे.

दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीदरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आज (ता. ८) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३७.२ (१९.९), जळगाव ३९ (२०.३), धुळे ३७.५ (१८.२), कोल्हापूर ३८.१ (२४.२), महाबळेश्‍वर ३१.१ (१६), नाशिक ३७.३ (२०.७),

निफाड ३७.२ (१४.१), सांगली ३९ (२४.९), सातारा ३७.५ (२१.४), सोलापूर ४०.२ (२४.१), सांताक्रूझ ३४.२ (२४.६), डहाणू ३१.६ (२३.४), रत्नागिरी ३३ (२३.४),

छत्रपती संभाजीनगर ३६ (२२), नांदेड ३८.८ (२३.२), परभणी ३९.४ (२५), अकोला ४० (२५.८), अमरावती ३८.६ (२४), बुलडाणा ३६.५ (२३.२), ब्रह्मपुरी ४० (२२.४),

चंद्रपूर - (२३.६), गडचिरोली ३४ (२०), गोंदिया ३८ (२१.८), नागपूर ३७.४ (२१.९), वर्धा ३९.८(२४), वाशीम ३९.६ (२०.२), यवतमाळ ३९ (२४.५).

शनिवारी (ता. ८) राज्यातील वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com