Agriculture Mechanization : भारतीय कृषी यंत्र, अवजार बाजारावर चीनचा कंट्रोल

Team Agrowon

कृषी यांत्रिकीकरणात भारताची झपाट्याने प्रगती होत आहे. भारताची कृषी यंत्र, अवजारांची बाजारपेठ चीनच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे.

Agriculture Mechanization | Agrowon

चीनमधून मोठ्या प्रमाणात कृषी यंत्रांची आयात होत असल्याचा आरोप देशांतर्गत उद्योजकांनी केला आहे.

Agriculture Mechanization | Agrowon

जवळपास ५३ टक्के बिगर ट्रॅक्टर यंत्रे (नॉन ट्रॅक्टर फार्म मशिनरी) आता चीनमधून येत आहेत. भारतीय उद्योगांचे खच्चीकरण होत आहे.

Agriculture Mechanization | Agrowon

चीनमधील कृषियंत्रे, अवजारांची आयात रोखायला हवी. यासाठी देशातील उद्योजकांना अधिकाधिक सवलतींसह शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण अवजारे कमी खर्चात देण्याची गरज आहे.

Agriculture Mechanization | Agrowon

अन्यथा येत्या १० वर्षात भारतीय कृषीयंत्रांची बाजारपेठ चीनच्या ताब्यात जाण्याची भीती यंत्रनिर्मिती क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Agriculture Mechanization | Agrowon

२०२२ ते २०२७ या कालावधीत चीनमधील कृषियंत्रे उद्योगाच्या विकासाचा दर ५.८ टक्के इतका मजबूत राहण्याची शक्यता आहे.

Agriculture Mechanization | Agrowon

चीनने तब्बल २५०० कृषियंत्रे निर्मिती प्रकल्प उभारून भारतासह जगातील प्रमुख देशांच्या कृषियंत्रे उत्पादक कंपन्यांसमोर मोठी स्पर्धा उभी केली आहे.

Agriculture Mechanization | Agrowon

एकीकडे चीन कृषियंत्र, अवजारांची मोठ्या प्रमाणात निर्यात करत भारताची बाजारपेठ काबीज करत आहे. तर दुसरीकडे स्वतःची बाजारपेठ अबाधित ठेवण्यासाठी अनुदानाचा मारा करत आहे.

Agriculture Mechanization | Agrowon
Onion Rate | Agrowon