मासे टिकविण्यासाठी कोणते पदार्थ वापरले जातात?

आपल्याकडे विविध प्रकारचे मासे आढळतात. त्यात काही महाग जसे की पापलेट, सुरमई, झिंगा यांसारखे मासे येतात तर स्वस्त माशामध्ये मांदेली, राणीमासा, ढोमी यांसारखे मासे येतात. बऱ्याच वेळा हे मासे जाळ्यात येतात. त्यांचे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ वापरले जातात
What are the different substances used in preservation of fish?
What are the different substances used in preservation of fish?

आपल्याकडे विविध प्रकारचे मासे (fish) आढळतात. त्यात काही महाग  जसे की पापलेट (Paplet), सुरमई (Surmai), झिंगा (Zinga) यांसारखे मासे येतात तर स्वस्त माशामध्ये मांदेली (Mandeli), राणीमासा (Ranimasa), ढोमी (Dhomi) यांसारखे मासे येतात. बऱ्याच वेळा हे मासे जाळ्यात येतात. त्यांचे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ वापरले जातात. हेही पाहा- शेपटाकडे शेपूट किंवा तोंडाकडे तोंड पद्धत सुकवलेल्या माशांवर कॅल्शियम प्रोपियोनेट (Calcium propionet) व अत्यंत बारीक मिठाचा (salt) शिडकावा केला जातो. हे मिश्रण बनवण्यासाठी ३ भाग कॅल्शियम प्रोपियोनेट घेऊन ते २७ भाग बारीक मिठात (वजनाने) मिसळले जाते. हे मिश्रण माशाच्या सर्व भागांना पूर्णपणे लावणे आवश्यक असते. हेही वाचा- गांडूळांच्या जीवनातील अवस्था कोणत्या असतात? मासे वजनानुसार पॉलिथिनच्या (polythene) पिशव्यांत भरून सीलबंद करून किरकोळ विक्रीसाठी पाठवता येतात. ठोक विक्रीचे मासे पॉलिथिनचे अस्तर असलेल्या पोत्यांत भरले तरी चालतात. या पद्धतीने पॅक केलेले मासे, साठवणीच्या काळात, घातक जिवाणूंपासून मुक्त आणि तरीही पुरेसे दमट राहतात. हेही वाचा- ही कोंबडी ठरली आदिवासींचा आधार ! साधारणतः दहा किलो माशांवर शिडकावा करण्यासाठी असे एक किलो मिश्रण वापरावे. मासे शिजवण्याआधी पाण्यात बुडवून ठेवले असता जास्तीच्या मिठाबरोबरच हे मिश्रण देखील धुतले जाते. खारवलेले मासे दीर्घकाळ टिकविण्यासाठी ही पद्धत फारच उपयोगी आहे. या पद्धतीने खारवलेले मासे कमीत कमी आठ महिने अतिशय चांगल्या स्थितीत राहू शकतात. ही पद्धत अत्‍यंत सोपी असून, कोणीही सहजपणे करू शकतो. घातक जीवाणू दूर ठेवले जातात व क्युअर केलेले मासे दीर्घकाळ टिकविता येतात. कॅल्शियम प्रोपियोनेटमुळे माशांचा रंग, वास किंवा चवीवर (taste) कोणताही परिणाम होत नाही. ही पद्धत इतर पद्धतीपेक्षा स्वस्त पडते. त्यामुळे माशांचा साठवणुकीचा काळ वाढून माशांची शेल्फ लाइफही (shelf life)  वाढते. वेळेनुसार दरामध्येही फायदा होत असल्याने उत्पादनाचा थोडासा वाढीव खर्च होत असला तरी तो लगेच भरून निघतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com