What solution has been find out by Kerala Government to control cost of animal feed? | Agrowon

पशुखाद्य महागल्यामुळे केरळ सरकारने काय शोधला उपाय?

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

केरळमधील मिल्मा नावाच्या सहकारी दूध पणन महासंघाने क्षीरवर्धिनी बायपास फॅट नावाचे पशूपूरक खाद्य बाजारात आणलंय.

जनावर विताना प्रचंड प्रमाणात उर्जेचा वापर केला जातो. एक तर विताना वासरू बाहेर टाकण्यासाठी लागणारी उर्जा आणि दुसर म्हणजे विल्यानंतर चिक दूध तयार तयार करण्यासाठी वापरली जाणारी उर्जा. या अवस्थेला आपण transition phase असं म्हणतो. या काळात जनावरांची उर्जेची गरज भयंकर वाढलेली असते आणि त्वरित उर्जेचा पुरवठा न केल्यास जनावरे विविध आजारांना बळी पडलेले दिसून येतात. आपला देश दूध उत्पादनात अग्रेसर आहे, आपल्याकडील पशुधनाची संख्याही जास्त आहे. त्याप्रमाणात चारा उपलब्ध नसल्याने चाऱ्याची टंचाई आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करून केरळमधील मिल्मा नावाच्या सहकारी दूध पणन महासंघाने क्षीरवर्धिनी बायपास फॅट नावाचं  पशु पूरक खाद्य बाजारात आणलंय. सोबतच पशुपालन व्यवसाय करत असतना उत्पादन खर्चात सातत्याने होणारी वाढ आणि पशुखाद्याची सततची वाढणारी किंमत यासर्वांचे प्रमुख कारण म्हणजे या व्यवसायात असेलेली निविष्ठांची कमतरता होय.  या सर्व बाबींचा विचार करून केरळच्या राज्य सरकारने अनुदान देऊन हिरव्या चाऱ्याचं उत्पादन घेण्यासाठी स्थानिक लोकांना प्रोत्साहित केलंय. असं केरळच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री जे. चिंचुराणी यांनी म्हटलंय.

हेही पाहा - गाय, म्हशींच्या आहारात बायपास फॅटचा वापर

बायपास फॅट काय आहे ?

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटाचे एकूण चार कप्पे असतात. रुमेन, रेटीक्युलम, omasum आणि Abomasum. जनावरांनी खाल्लेल्या चाऱ्याचे जास्तीत जास्त विघटन हे रुमेनमध्ये झाल्याने जनावरांच्या शरीराला आवश्यक त्या प्रमाणात उर्जा उपलब्ध होत नाही. बायपास फॅटचे रुमेनमध्ये विघटन न होता ते सरळ abomasum जाऊन त्याचं पचन होतं. परिणामी जास्त प्रमाणात उर्जा मिळून दूध उत्पादनात सातत्य राहण्यास मदत होते.

खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून पशुखाद्याच्या किमतींमध्ये वारंवार होणारी वाढ यामुळे राज्य सरकारने हस्तक्षेप करून गायींसाठी अतिरक्त उर्जेचा पुरवठा व्हावा म्हणून मिल्माच्या क्षीरवर्धिनी बायपास फॅट हे product बाजारात आणलं आहे. मिल्मा आणि केरळ फीड्स लिमिटेडद्वारे उत्पादित पशुखाद्य सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. गाभण काळाच्या शेवटच्या दहा दिवसांत आणि विल्यानंतर १५ लिटरपेक्षा अधिक दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायीच्या आहारात दररोज १०० ग्रॅम क्षिरवर्धिनी बायपास फॅटचा समावेश फायद्याचे ठरेल.  

निविष्टांचा तुटवडा हे जनावरांच्या चारा उत्पादनाच्या किमती वाढण्यास प्रमुख कारणीभूत घटक असल्यानं हिरव्या चाऱ्याच्या स्थानिक लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने पहिली पायरी म्हणून उत्पादकांना प्रति एकर १५,०००  ची सबसिडी देण्यास सुरुवात केलीय. यासोबतच केरळ पशुधन विकास मंडळाने भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेशी नवीन उच्च वंशावळीच्या गायींच्या प्रजाती आणण्याच्या बाबतीतही करार केला आहे. पथनामथिट्टा या जिल्ह्यापासून  सुरुवात करून गायींची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी राज्य सरकार गायीच्या शरीरामध्ये मायक्रोचीप लावण्याची योजनाही राबवत आहे.

मिल्माचे व्यवस्थापकीय संचालक सुयोग पाटील असं म्हणालेत की, या कोरोना महामारीच्या दिवसांत अनेक अडचणींचा सामना करून दुग्धव्यवसाय स्थिरावले आहे. सतत हवामानात होणारे बदल आणि इतर कारणांमुळे दूध उत्पादनातील घसरणीवर मात करण्यासाठी मिल्माने क्षीरवर्धिनी बायपास फॅट बाजारात आणलंय, ज्याची निर्मिती मिल्माच्या मलमपुझा कॅटल फीड प्लांटमध्ये होईल.


इतर अॅग्रो विशेष
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...
कशी केली जाणार आहे शेतीमध्ये...शेतीत मूल्यवृध्दीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
मध्यप्रदेश सरकारची शेतकऱ्यांना प्रति...वृत्तसेवा - मध्य प्रदेश सरकारने मुख्यमंत्री...
गहू तांदूळ, कारळासह ओट्सच्या नव्या जाती...वृत्तसेवा - मध्य प्रदेशातील जबलपूर येथील राज्य...
इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषी...यंदाच्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राने इतर...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
महाविकास आघाडी सरकाचा निर्णय...महाविकास आघाडी सरकारने भुमी अधिग्रहण कायद्याला (...
युवा शेतकऱ्याचे अभ्यासपूर्ण प्रिसिजन...शेतीतील विज्ञानाचा अभ्यास, विविध देशांतील...
जातिवंत पैदाशीसह आदर्श गोठा व्यवस्थापनमाणकापूर (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील प्रफुल्ल व...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...