जागतीक बाजारात गहू, मका, सूर्यफूल तेल महागले

रशिया आणि युक्रेनमधील युध्द सातव्या दिवशीही सुरुच आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियाच्याआर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली
Wheat, maize, sunflower oil became more expensive in the global market
Wheat, maize, sunflower oil became more expensive in the global market

पुणेः रशिया आणि युक्रेन युध्दामुळं गहू, मका आणि सूर्यफूल तेल बाजार विस्कळीत झाला. याचा अनेक देशांना फटका बसत आहे. भारतात काही शेतमालाचे दर वाढले आहेत, तर काही शेतीमालाच्या बाबतीत नुकसान होत आहे. यात सूर्यफूल तेलासाठी भारत आयातीवर अवलंबून आहे. याचा फटका भारताला बसत आहे. मात्र गहू आणि मक्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.  

रशिया आणि युक्रेनमधील युध्द सातव्या दिवशीही सुरुच आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियाच्या(Russia) आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली. राष्ट्राध्यक्ष पुतीन आपल्या आडमुठ्या धोरणावर ठाम आहेत. मात्र याचा फटका रशियन नागरिकांना बसतोय. रशियातील कर्जाचा व्याज (Loan interest)दर २० टक्क्यांवर गेला आहे. गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावल्यानंतर रशियन शेअर बाजार बंदच आहे. रशियाच्या महत्वाच्या बॅंकांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारावरही(international affairs) निर्बंध आणले आहेत. त्यामुळे रशियाशी आयात निर्यात करणाऱ्या देशांना पेमेंटच्या अडचणी येतील. तसेच काही बॅंकाची विजा आणि मास्टरकार्डचीही सुविधा बंद करण्यात आली. अॅपल पे आणि गुगल पे या कंपन्यांनीही येथील व्यवहारांवर बंदी घातली आहे. त्यामुळे रशियातील नागरिकांना खरेदीसाठी अॅपल पे आणि गुगल पे आणि एटीएम वापर करता येत नाही. तसेच महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. डाॅलरच्या तुलनेत रशियन चलन म्हणजेच रुबलचं मूल्य ७५ वर होतं. तर युरोचं मूल्य ८० रुबलवर होतं. ते आता एक डाॅलरचे मूल्य ११३ रुबलवर पोचले, तर एक युरो १२७ रुबलवर पोचला. म्हणजेच रशियाच्या चलनाचे अवमूल्यन झाले. मात्र या युध्दामुळे इतर देशांनाही फटका बसतोय. कारण मागील २५ वर्षांपासून रशिया आणि युक्रेनचा जागतिक शेतीमाल निर्यातीत मोठा वाटा राहिला. गहू, मका, बार्ली, सूर्यफूल आणि सूर्यफूल तेल पुरवठ्यात मोठा वाटा आहे. या शेतीमालासाठी पूर्व युरोप आणि मध्य आशियातील देश अवलंबून आहे. त्यामुळे या देशांनाही फटका बसतोय.

हे हि पहा :  …………. गहू उत्पादन आणि निर्यातीत रशिया आणि युक्रेनचे महत्व अधिक आहे. २०१७ ते २०२१ या काळात या दोन्ही देशांचे उत्पादन आणि निर्यात महत्वाची राहिली. या कालावधीत जागतिक गहू उत्पादनात १४ टक्के तर निर्यातीत ३० टक्के वाटा राहिला. यासोबतच युरोपियन युनियन, अमेरिका आणि कॅनडातून गव्हाची निर्यात झाली. चीन आणि भारतातही गव्हाचे मोठे उत्पादन होते. आयातही केली जाते. मात्र निर्यातीत वाटा कमी आहे. या सोबतच जागतिक गहू निर्यातीत ऑस्ट्रेलियाचा ८.४ टक्के वाटा आहे. तर अर्जेंटीनाचा ६.६ टक्के, कझाकिस्तान ४.१ टक्के आणि टर्किचा ३.४ टक्के वाटा आहे. यावरूनच जागतिक गहू बाजारात या दोन्ही देशांचं महत्व लक्षात येतं. या देशांतून गव्हाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता असल्यानं दरात वाढ झाली. याचा लाभ देशातील गहू उत्पादकांनाही होतोय. आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातही गव्हाचे दर सुधारले आहेत.  ………….. मका उत्पादन आणि निर्यातीत रशिया आणि युक्रेनचे महत्व आहेच. जागतिक निर्यातीत १५ टक्के हिस्सा युक्रेनचा आहे. तर रशियातून २.३ टक्के मका जाते. एकूण जागतिक मका उत्पादनात अमेरिकेचा वाटा ३२ टक्के असून ३३ टक्के निर्यात होते. त्यानंतर ब्राझील १८.३ टक्के निर्यात हिस्स्यासह दुसऱ्या आणि अर्जेंटीना तिसऱ्या क्रमांकावर आहे. यक्रेन मका निर्यातीत जगात चौथ्या नंबरवर आहे. युक्रेनचा जास्तीत जास्त मका चीनला जातो. मात्र २०२० मध्ये युक्रेनमध्ये उत्पादन घटल्यानं चीनने अमेरिकेच्या मक्याला पसंती दिली होती. मागील काही वर्षांत मका निर्यातीत रशिया आणि युक्रेनचे महत्व वाढत आहे. 

………….. रशिया आणि युक्रेन युध्दाचा सर्वाधिक फटका भारताला बसेल तो सूर्यफूल तेलाच्याबाबतीत. हे देश जागतिक पातळीवर सूर्यफूल तेल उत्पादन आणि निर्यातीत महत्वाची भूमिका पार पाडतात. युक्रेन आणि रशियातून जागतिक खाद्यतेल बाजारात ९ टक्के उत्पादन आणि २ टक्के निर्यात होते. तर केवळ सूर्यफूल तेलाचा विचार करता उत्पादन ६० टक्के होते. तर जागतिक सूर्यफूल तेल निर्यातीतील वाटा ७५ टक्के आहे. यावरून या देशांचा सूर्यफूल तेल बाजारावरील दबदबा लक्षात येतो. या देशांतील परिस्थिनुसार जागतिक सूर्यफूल बाजाराची दिशा ठरत असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com