गव्हाचे दर विक्रमी पातळीवर

शुक्रवारी सीबाॅटवर गव्हाचे दर १२.०९ डाॅलर ब्रतिबुधेल्सने गव्हाचे करार झाले. हे दर मागील १४ वर्षांतील उच्चांकी आहेत. मध्य आशिया आणि उत्तर आफ्रिकन देशांना गव्हाचा पुरवठा थांबला, तसेच गहू उपलब्ध होत नाही, त्यामुळे गव्हाचे दर वाढले, असे जाणकारांनी सांगितले.
Wheat prices
Wheat prices

पुणेः रशिया युक्रेन युद्धामुळे या दोन्ही देशांची गहू निर्यात थांबली. त्यामुळे गव्हाचे दर तेजीत आहेत. गव्हाने दराचा १४ वर्षांतील विक्रम मोडला. सध्या दर १२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचलेत. भारतातही गव्हाचे दर वाढले असून निर्यातीसाठी मागणी होत आहे. 

रशिया गहू निर्यातीत (Wheat exports)जगात आघाडीवर आहे. एकूण जागतिक निर्यातपैकी ३० टक्के गहू रशिया निर्यात करतो. युध्दामुळे नाटो(NATO) देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र रशिया नमते घ्यायला तयार नाहीत. मध्य आशिया आणि उत्तर आफ्रिकन देश गव्हासाठी रशिया (Russia)आणि युक्रेनवर अवलंबून आहेत. आता हे देश गव्हाच्या पुरवठ्यासाठी चाचपणी करत आहेत. परिणामी गव्हाचे दर विक्रमी पातळीवर पोचले.

शुक्रवारी सीबाॅटवर गव्हाचे दर १२.०९ डाॅलर ब्रतिबुधेल्सने गव्हाचे करार झाले. हे दर मागील १४ वर्षांतील उच्चांकी आहेत. मध्य आशिया आणि उत्तर आफ्रिकन देशांना गव्हाचा पुरवठा थांबला, तसेच गहू उपलब्ध होत नाही, त्यामुळे गव्हाचे दर वाढले, असे जाणकारांनी सांगितले. तसेच अनेक देशांनी रशियाच्या बॅंकांवर आंतरराष्ट्रीय व्यवहारबंदी घातली आहे. त्यामुळे रशियातून गहू आयात करता येत नाही. व्यवहार पूर्ण होऊ शकणार नाहीत, या  भीतीने व्यापारी सौदे करत नाहीत. याचाही परिणाम गव्हाच्या दरावर होतोय.

रशियाच्या सैन्याने युक्रेनमधील अनेक बंदरे बंदी पाडली आहेत. परिणामी युक्रेनची गहू निर्यात थांबली आहे. परिणामी गहू खरेदीदार अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडातील देश आणि युरोपकडे मागणी करत आहेत. परिणामी दरात मोठी वाढ झाली. त्यातच युध्द दीर्घकाळ चालण्याच्या भीतीने काही देश साठा करून ठेवत आहेत. 

हे हि पहा : 

रशिया आणि युक्रेनमधून पुरवठा ठप्प झाल्याचा परिणाम भारतीय गव्हाला होतोय. भारतीय गव्हाला आशिया खंडातून मागणी येतेय. परिणामी भारतीय गव्हाच्या दरातही १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या भारतीय गहू ३४० ते ३५० डाॅलर प्रटनाने निर्यात होत आहे. युध्द पुढील काही काळ सुरु राहिल्यास गव्हाचे दर आणखी सुधारण्याचा अंदाज व्यक्त होतोय. भारतातून सध्या कोरिया, फिलिपिन्स आणि पूर्व आशियायी देशांत निर्यात होत आहे. देशातून १० लाख टन गहू निर्यातीचे करार झाले आहेत, अशी माहिती जाणकारांनी दिली. जागतिक गहू निर्यात (लाख टनांत)

देश…निर्यात

रशिया…३९१

युरोपियन युनियन…२९७

कॅनडा…२७७

अमेरिका…२६७

ऑस्ट्रेलिया…१९७

युक्रेन…१६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com