उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस?

या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे उद्या 22 तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानसहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यतामुंबई वेधशाळेने वर्तवली आहे.
Weather Forecast
Weather Forecast

सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर इशान्य मॉन्सून (North East Monsoon) दक्षिण भारतातून 22 तारखेला पाय काढता घेऊ शकतो, असे हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे. तर दुसरीकडे उत्तर अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आलाय.

Under the influence of the approaching western disturbance clouding/light rainfall expected over parts of North Konkan and North Madhya Maharashtra during next 2 days. Gradual fall in minimum temperatures expected over the region by 2-4 deg C from 23rd Jan. pic.twitter.com/IxZC4Fhm4r

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai)

या वाऱ्यांच्या प्रभावामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे उद्या 22 तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानसहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता (rainfall forecast) मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो. त्यानंतर मात्र 25 तारखेपर्यंत राज्यातले हवामान प्रामुख्याने कोरडे (dry weather) राहिल, असेही वेधशाळेने म्हटले आहे. राज्यात किमान तापमानात चढ उतार सुरू असून कमाल तापमान मात्र तीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. तसेच सध्या राज्यात विदर्भातला काही भाग वगळता इतरत्र दिवसाची थंडीही ओसरली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com