खायला कोणती अंडी चांगली?

अंडी देणं हि कोंबडीची नैसर्गिक क्रिया आहे. कोंबडी साधारणपणे चार ते पाच महिन्याची झाल्यावर मग ती गावरान असो कि लेयर ती अंडी द्यायला सुरुवात करते.
Which Egg Taste Good?
Which Egg Taste Good?

तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी कि बाजरात उपलब्ध असलेली? कोणत अंड अधिक पोषक? याबाबत शंका आहे... बर याबद्दल आज आपण जाणून घेऊया. अंडी देणं हि कोंबडीची नैसर्गिक क्रिया आहे. कोंबडी साधारणपणे चार ते पाच महिन्याची झाल्यावर मग ती गावरान असो कि लेयर ती अंडी द्यायला सुरुवात करते.

गावरान कोंबड्या आपल्या परसाच्या परिसरात मुक्तपणे वावरून त्यांच्या खाद्याची गरज घराच्या, आजूबाजूच्या परिसरातील उकिरड्यावरील, टाकाऊ पदार्थ खाऊन करत असतात. या उलट लेयर कडून मिळणारी अंडी हि त्यां कोंबड्याचे योग्य आहार व्यवस्थापन करून अंड्याच उत्पादन घेतलं जात. गावरान अंडी आणि बाजारात उपलब्ध अंड्याचा आकार हा कोंबड्यांच्या आहारातील कमी जास्त प्रमाणामुळे लहान मोठा होताना दिसतो. कोंबड्यांच्या विविध जातीनुसार अंड्याचा आकार थोडाफार बदलत असतो. बर या दोन प्रकारच्या अंड्यामध्ये पोषणमुल्यांमध्ये काही फरक असतो का? ते आता पाहूया...सुरुवातीला तर दोन्ही अंड्याभोवती कवच असते. आतमध्ये पिवळा आणि पांढरा बलक असतो. त्यातही पिवळा बलक मध्ये आणि पांढरा बलक त्याच्या सभोवताली असतो.

अंड्यांच्या आकारमानानुसार आणि वजनानुसार एका अंड्यापासून सुमारे ७० ते १०० किलो कॅलरी उर्जा मिळत असते. गावरान असो कि बाजारातील उपलब्ध असलेलं अंड असो...अंड हे अंड असत...पण ते शरीरासाठी चांगल आहे...म्हणून कोणतही अंड खा...पण खात जा...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com