
सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके यांनी दहा वर्षांपूर्वी शेळीपालन व्यवसाय सुरू केला. अविरत कष्ट, चिकाटी, शास्त्रीय व्यवस्थापन, कुटुंबातील सदस्यांचा हातभार व बाजारपेठांचा अभ्यास यातून व्यवसायात यश मिळवित त्याचे अर्थकारण त्यांनी सक्षम केले आहे. सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यापासून सुमारे सहा किलोमीटरवर शेळकेवाडी हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. पाण्याची उपलब्धतता असल्याने गावात बहुतांशी बागायत शेती व त्यातही ऊस घेतला जातो. गावातील जितेंद्र सुदाम शेळके हे पदवीधर शेतकरी असून, त्यांची पाच एकर शेती आहे. ऊस, आले व अन्य हंगामी पिके ते करतात. शेतीला पूरक व्यवसायाचा शोध त्यांनी सुरू केला. दुग्ध व्यवसायापेक्षा शेळीपालनाचे अर्थकारण त्यांना भावले. शेळीच्या जातींची पारख सव २०११ मध्ये शेळीपालनाचा श्रीगणेशा केला. शेतात साध्या पद्धतीने शेडची उभारणी केली. १९ उस्मानाबादी जातीच्या शेळ्या व एक बोकड आणला. काही कालावधीनंतर ही जात कमी करून राजस्थान कोटा, सोजत, पंजाबी बीटल आदी जातींचे संगोपन सुरू केले. सर्व जातींची वैशिष्ट्ये व गुमधर्म तपासताना बीटल ही जात तुलनेने फायदेशीर वाटली. सन २०१३-१४ मध्ये पंजाबमध्ये जाऊन सर्वत्र फिरून चांगल्या बीटल शेळ्यांची निवड करत खरेदी केली. बीटल जात का निवडली?
व्यवस्थापनातील बाबी
पूरकला पुन्हा पूरक शेतीला पूरक शेळीपालन व त्याला पूरक म्हणून शेळ्यांची खरेदी- विक्रीचा व्यवसायही सुरू केला. शेळ्यांच्या खरेदसाठी सातत्याने पंजाब प्रातांत जाणे सुरू होते. त्यामुळे तेथील व्यापारी व शेतकरी संपर्कात येत होते. त्यातून जातिवंत शेळ्या मिळू लागल्या. त्यासाठी काही वेळा जास्त पैसेही मोजावे लागले. यातून जितेंद्र यांनी पंजाबात आपले ‘नेटवर्क’ तयार केले. तेथून वाहनाद्वारे दर्जेदार शेळ्या घेऊन येणे, लसीकरण व निर्जंतुकीकरण करून त्या आपल्या वातावरणात ‘सेट’ करणे व विक्री करणे असे या व्यवसायाचे स्वरूप ठेवले आहे. व्यवसायाची नवी सुरुवात करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही बाब फायदेशीर ठरते. दर दोन महिन्यांतून एकदा पंजाबला जाण्याचे कष्ट जितेंद्र उचलतात. अर्थकारण
कुटुंबाची साथ मोलाची जितेंद्र सांगतात, की सुरुवातीच्या काळात व्यवसायात फसवणूकही झाली. मात्र न खचता अनुभवातून पुढे वाटचाल करीत राहिलो. योग्य जातींची निवड, व्यवस्थापन, बाजारपेठ व कष्ट यांचा योग्य मेळ घातल्यास शेळीपालन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होऊ शकतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने या व्यवसायात संधी आहे. कोरोना काळात मला फार झळ बसली नाही. खरेदीदारांची गरज ओळखून त्यांना शेळ्यांचा पुरवठा केला. व्यवसायात पत्नी सुवर्णा, मुले रुद्र व देवेंद्र यांची मोलाची साथ आहे. पंजाबात जाणे होते, त्या वेळी फार्मची जबाबदारी कुटुंबातील सदस्यच पाहत असल्याने व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालवणे शक्य होते असे जितेंद्र सांगतात. - जितेंद्र शेळके, ९८९००२८७५५, ७९७२३९०२६८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.