टेरेसवर द्राक्ष बागेचा फिल

कांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या बाजूला द्राक्षाच्या दोन रोपांची लागवड केली. या वेली जमिनीपासून तब्बल ३० फूट उंचीवर गेल्या असून ऐन हंगामात टेरेसवर द्राक्ष घड लगडलेले दिसतात. आज त्यांना या दोन वेलींपासून २५० किलोपर्यंतचे उत्पादन मिळत आहे.
टेरेसवर द्राक्ष बागेचा फिल
Bhausaheb Kanchan showing grapes bunch.

कांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या बाजूला द्राक्षाच्या दोन रोपांची लागवड केली. या वेली जमिनीपासून तब्बल ३० फूट उंचीवर गेल्या असून ऐन हंगामात टेरेसवर द्राक्ष घड लगडलेले दिसतात. आज त्यांना या दोन वेलींपासून २५० किलोपर्यंतचे उत्पादन मिळत आहे.   उरुळी कांचन (ता. हवेली,जि.पुणे) येथील भाऊसाहेब कांचन यांनी घराच्या टेरेसवर द्राक्षाच्या दोन वेली चढविल्या आहेत. ऐन हंगामात द्राक्ष घडांना टेरेस बहरलेली असते. हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे भाऊसाहेब कांचन यांची सव्वातीन एकर शेती आहे. त्यापैकी दोन एकरांत ऊस, तर दहा गुंठ्यांत नारळ, सुपारी, आवळा, जांभूळ, सीताफळ, पेरू, आंबा, डाळिंब, चिंच, चिकू, केळीची प्रत्येकी ५ ते ६ झाडांची आणि द्राक्षाच्या चार जातींची लागवड केली आहे.  कांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या बाजूला द्राक्षाच्या दोन रोपांची लागवड केली. या वेली जमिनीपासून तब्बल ३० फूट उंचीवर गेल्या असून ऐन हंगामात टेरेसवर द्राक्ष घड लगडलेले दिसतात. आज त्यांना या दोन वेलींपासून २५० किलोपर्यंतचे उत्पादन मिळत आहे.   परदेशातून मिळाली प्रेरणा  २०१३ मध्ये भाऊसाहेब कांचन हे शेतकरी सहलीच्या निमित्ताने युरोप दौरा करून आले. तेथे त्यांनी हजारो एकरावरील द्राक्ष शेती पाहिली, तसेच घरासमोर टेरेसवर द्राक्ष वेलींची केलेली लागवड पाहिली. त्यातूनच त्यांनी आपल्या घराच्या भिंतीशेजारी द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला. द्राक्ष वेलीची लागवड 

 • जानेवारी २०१६ मध्ये मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातून बेंगलोर पर्पल (काळ्या-जांभळ्या रंगाचा वाण) या सुधारित वाणाची २ रोपे आणली. घराच्या भिंतीजवळ ३ फूट खोल खड्डा खोदून त्यात शेणखत, पालापाचोळा माती टाकून द्राक्ष रोपे लावली.
 • लागवडीपासून ३ वर्षांपर्यंत वेलींची छाटणी न केल्यामुळे त्यांची जवळपास ५० ते ६० फुटांपर्यंत वाढ झाली. वेलीस भिंत आणि काठीचा आधार देत घराच्या टेरेसवर नेण्यात आले. तेथे मंडप उभारून वेलीला आधार देण्यात आला.
 •  लागवडीपासून आतापर्यंत द्राक्ष वेलींवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून न आल्यामुळे कोणत्याही फवारणीची गरज भासली नाही. टेरेसवर द्राक्ष मण्यांचे पक्ष्यांपासून संरक्षण होण्याकरिता मंडपावर काळ्या रंगाची जाळी टाकण्यात आली आहे. 
 •  सहा वर्षांत दोन वेलींसाठी व्यवस्थापनासाठी साधारण ६ हजार रुपयांचा खर्च आला. त्यात द्राक्षे रोपे, खत, जिब्रेलिक आम्ल, जाळी आणि मंडप उभारणी साहित्य इ.बाबींचा समावेश आहे.
 • द्राक्षाने बहरली टेरेस  दोन द्राक्ष वेलींपासून जानेवारी २०१९ मध्ये साधारण १०८ घड, २०२० मध्ये ३०० घड उत्पादन मिळाले. सध्या लहान-मोठे जवळपास ४५० द्राक्ष घड वेलीवर लगडलेले आहेत. एका घडाचे वजन सुमारे ५०० ग्रॅमपर्यंत आहे.  द्राक्ष वेलींची जोमदार वाढ 

 • बहर धरण्यासाठी २ ऑक्टोबर २०१८ मध्ये वेलीची छाटणी केली. त्यानंतर चांगल्या प्रकारे फुटवे आणि घडनिर्मिती झाली. तयार मणी जिब्रेलिक आम्लाच्या द्रावणात बुडविले. पुढे मण्यांच्या आकार वाढून त्यांना काळा-जांभळा रंग येऊ लागला. साधारण फेब्रुवारी २०१९ मध्ये द्राक्षे खाण्यायोग्य झाली. 
 • दुसऱ्या वर्षीही वेलींवर चांगल्याप्रकारे फळधारणा दिसून आली. तिसऱ्या वर्षी  सेंद्रिय खताची मात्रा देऊन १९ सप्टेंबर २०२१ मध्ये पुन्हा छाटणी केली. सध्या आधीच्या तुलनेत जास्त घड दिसून येत आहेत. यंदा २५ जानेवारीपर्यंत द्राक्ष काढणीस तयार होतील. 
 • - भाऊसाहेब कांचन,  ९४०४९९८९६०, ९८२२४०६८००

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.