स्ट्रॉबेरी पीक बदलातून मिळवला आत्मविश्‍वास

पुणे जिल्ह्यातील पिंपळोली (ता.मुळशी) डोंगराळ भागात पारंपरिक शेतीमध्ये पीक बदल करत नवनाथ शेळके यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचे धाडस केले. गेल्या तीन वर्षांमध्ये स्ट्रॉबेरी उत्पादनासोबत थेट विक्रीतून पीक यशस्वी करण्यात यश आल्याने आत्मविश्वास दुणावला आहे.
Shelke family engrossed in strawberry harvesting
Shelke family engrossed in strawberry harvesting

पुणे जिल्ह्यातील पिंपळोली (ता.मुळशी) डोंगराळ भागात पारंपरिक शेतीमध्ये पीक बदल करत नवनाथ शेळके यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचे धाडस केले. गेल्या तीन वर्षांमध्ये स्ट्रॉबेरी उत्पादनासोबत थेट विक्रीतून पीक यशस्वी करण्यात यश आल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपळोली (ता.मुळशी) या डोंगराळ भागातील नवनाथ सोपान शेळके हे तरुण शेतकरी. सध्या आपल्या बंधू कृष्णराव आणि गोरख यांच्यासह वडिलोपार्जित शेती पारंपरिक पद्धतीने करतात. भात, काकडी, दोडका इ. पिके घेताना पूरक म्हणून ३० साहिवाल अशा देशी गाईंचे पालनही ते करतात. एखादे नवीन पीक घेण्याची इच्छा नवनाथ यांनी झाली. थोडा अभ्यास केला असता स्ट्रॉबेरी पिकाविषयी समजले. लागवडीपूर्वी पाचगणी, महाबळेश्‍वर येथील शेतकरी, रोपवाटिकांना भेटी देऊन माहिती घेतली. पुरेशी खात्री पटल्यानंतर मुळशीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अप्पासाहेब गुजर आणि पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी दत्तात्रय भालेराव यांच्या मार्गदर्शनानुसार २०१८ मध्ये स्ट्रॉबेरीची १२ गुंठे क्षेत्रामध्ये लागवड केली.पहिल्या वर्षी ५.५ टन उत्पादन मिळाले. मात्र, बाजारसमितीमध्ये सरासरी ४० रुपये प्रति किलो असा दर मिळाला. निव्वळ नफा केवळ ५० हजार शिल्लक राहिला.   लागवड पद्धत आणि केलेले बदल

  • २०१८ च्या प्रयोगानंतर अधिक चांगला दर्जा मिळवण्याच्या उद्देशाने २०१९ मध्ये गादीवाफे तयार करताना शेणखताची मात्रा वाढविली.
  • मल्चिंग आणि ठिबक सिंचनाच्या वापरावर लागवड 
  • दरवर्षी साधारण ऑक्टोबर महिन्यात लागवड 
  • ऑक्टोबरमध्ये लागवड केल्यानंतर ४५ ते ६० दिवसांत उत्पादन सुरू होते. पुढे एप्रिलपर्यंत उत्पादन मिळते. 
  • उत्पादन खर्च 

  • १२ गुंठे क्षेत्र 
  • स्वीट सेशन्स वाणाची ६ हजार रोपे - ७ रुपये प्रति रोप याप्रमाणे - ४२ हजार रुपये 
  • मल्चिंग - ४ हजार ५०० रुपये 
  • ट्रॅक्टरद्वारे  मशागत - ४ हजार रुपये 
  • बेड निर्मिती, लागवड, मजुरी -  ३५०० रुपये
  • विद्राव्य खते इ.- ७ हजार ५०० रुपये
  • फवारणीसह अन्य खर्च - १० हजार रुपये  
  • असे मिळते उत्पन्न आणि उत्पादन   ऑक्टोबरमध्ये लागवड केल्यानंतर डिसेंबर महिन्यापासून उत्पादन सुरू होतो. पुढे दीड महिना एका दिवसाआड ६० किलो उत्पादन मिळते. त्यानंतर फेब्रुवारी ते मार्चपर्यंत प्रति दिन सरासरी ४० किलो उत्पादन मिळते. नंतर एप्रिलमध्ये उत्पादन कमी होत २० किलोपर्यंत मिळते. स्ट्रॉबेरीच्या दरामध्ये चढ उतार प्रचंड असतात. प्रति किलो ७० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळतात. एकूण उत्पादनातील ५० टक्के फळांना १५० रुपये, ३० टक्के फळांना ७० रुपये असे दर मिळतात. हंगामाच्या सुरुवातीच्या येणाऱ्या पहिल्या २० टक्के उत्पादनाला २०० रुपये प्रति किलो दर मिळतो. एकूण पिकाला सरासरी १०० ते १२५ रुपये दर मिळतो. हंगामात सरासरी ५ टन उत्पादन मिळते. त्यातून सरासरी ५ लाखांचे उत्पन्न मिळते.  अशी आहे विक्री व्यवस्था  पहिल्या वर्षी पुणे बाजार समितीमध्ये माल पाठवला. दीड किलोच्या ट्रे ला १५० रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र, त्यात वाहतूक, हमाली, अडत इ. अनेक खर्च होते. बाजारातील आवक वाढली की दर कोसळत होते. यामुळे दुसऱ्या वर्षी थेट विक्री करण्याचा प्रयत्न नवनाथ यांनी केला. यासाठी त्यांनी रावेत, हिंजवडी, बाणेर परिसरातील फळ विक्रेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी त्यांनी पनेट, बॉक्स ऐवजी सुटा स्ट्रॉबेरी पुरवठा सुरू केला. फळ विक्रेते स्वतः पॅकिंग करून विक्री करत असल्याने त्यांचाही नफा वाढला आणि नवनाथ यांचाही खर्च वाचला. सध्या हंगामानुसार ७० ते २०० रुपयांपर्यंत फळ विक्रेत्यांना दुकानावरच पुरवठा केला जात आहे. यामुळे फळ विक्रेत्यांना बाजार समितीमधून दोन दिवसांची मिळणारी स्ट्रॉबेरी आता थेट ताजी मिळू लागली.  स्ट्रॉबेरी काढणीसाठी कुटुंबाची मदत स्ट्रॉबेरी पीक खूप संवेदनशील आहे. त्यात काढणी खूप काळजीने करावी लागते. यासाठी आई, पत्नी शीला, भाऊ कृष्णराव आणि गोरक्ष यांची मदत होते. तसेच गोठ्यावरील व शेतीच्या कामांसाठी एक कुटुंब कायमस्वरूपी कामाला आहे. त्यांचीही मदत होते.   विविध पुरस्कारांनी गौरव 

  • राज्य शासनाच्या कृषी विभागाचा २०१६ चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार 
  • पुणे जिल्हा परिषदेचा २०१६-१७ चा अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ पुरस्कार 
  • आत्माचा २०१६-१७ चा जिल्हा कृषी विभागाचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार 
  • लुपीन फाउंडेशनचा भरतपूर (राजस्थान) येथे आदर्श गोपालक पुरस्कार.
  • ठिबकद्वारे जिवामृताचा वापर  घरी ३० साहिवाल या देशी गायींचे पालन केले आहे. त्यासाठी मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केला आहे. या गोठ्यातील शेण आणि गोमूत्र पाइपद्वारे एका ठिकाणी संकलित केले जाते. या खड्ड्यातील शेण, गोमूत्राच्या वापरातून जिवामृत तयार केले जाते. हे जिवामृत ठिबक द्वारे देण्यासाठी  सॅण्ड फिल्टरचा वापर केला जातो. स्ट्रॉबेरी पिकामध्ये रासायनिक खतांवरील खर्चात बचत झाली आहे. जिवामृताच्या वापरामुळे स्‍ट्रॉबेरी रोपे निरोगी राहून, फळे दर्जेदार मिळतात. उत्पादनातही वाढ मिळत असल्याचा शेळके यांचा अनुभव आहे.  संपर्क- नवनाथ शेळके  ९९२११८०५२७,  ८८३०३८७३३५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com