
माडसांगवी (ता.जि. नाशिक) येथील बापू बर्वे यांनी विविध जातींचे शेळीपालन, लेअर पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म, बोअर जातीच्या शेळीचे संवर्धन व श्वानपालन असे विविध पूरक व्यवसाय अत्यंत कौशल्याने व शास्त्रीय पद्धतीने हाताळून यशस्वी केले आहेत. कष्ट, संघर्ष, चिकाटी, प्रयत्न व प्रसंगी नुकसान व जोखीम सोसून नोकरी सांभाळत शेतीचे अर्थकारण भक्कम केले आहे. माडसांगवी (ता.जि. नाशिक) येथील बापू बर्वे यांचे बारावी इयत्तेत असताना वडील वारले. पुढे वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात रोजंदारी करण्याची वेळ आली. पदवीनंतर जिद्दीने शैक्षणिक कर्ज काढून काढून ‘एमबीए’ची पदवी घेतली. आज ते औषधनिर्मिती कंपनीत विपणन विभागात नोकरी करीत आहेत. ती सांभाळून विविध शेतीपूरक व्यवसायही कौशल्याने हाताळत आहेत. लहानपणापासूनच त्यांना जनावरांचा लळा होता. आज त्याचाच उपयोग व्यवसायात होत आहे. संकटांनी शिकवले, उभे केले
‘लकी गोट फार्म’ बर्वे कुटुंबात ‘लकी’ नावाचे पाळीव श्वान होते. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘लकी गोट फार्म’ असे नामकरण केले आहे. व्यावसायिक कौशल्यातून ग्राहक साखळी जोडल्याने राज्यभरातील शेतकरी बर्वे यांच्याकडून शेळ्या खरेदी करतात. अर्धबंदिस्त पद्धत, लसीकरण, एक एकरात चारा, त्यात दशरथ, मेथी घास, शेवरी, तुती आहे. मका, तूर, मसूर, सोयाबीन भुसा यांची साठवणूक होते. आई शांताबाई, भाऊ किरण व भाचा आकाश मदत करतात. व्यवसाय- ठळक बाबी
लेअर पक्ष्यांचा फार्म
व्यवसायातील प्रमुख बाबी
‘बोअर’ शेळ्यांचे संगोपन बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन दोन वर्षांपासून आफ्रिकन ‘बोअर’ जातींच्या शेळ्यांचे संगोपन सुरी आहे. शुद्ध व निरोगी वंशावळ, चारा-पाणी व आरोग्याचे चोख व्यवस्थापन व सोशल मीडियाद्वारे मार्केटिंगमुळे बाजारपेठ मिळविली आहे. प्रति महिन्याला ६ ते ७ किलो वजनवाढ होते. त्यामुळे शेळ्यांना मागणी आहे. चार शेळ्यांची अलीकडेच नगर व जालना जिल्ह्यांतील शेळीपालकांना प्रत्येकी १ लाख ११ रुपये दराप्रमाणे विक्री केली आहे. सध्या पैदास कार्यक्रमासाठी १० शेळ्या आहेत. श्वानसंगोपन शहरातील नागरिकांकडून परदेशी जातीच्या कुत्र्यांना मागणी असते. हे लक्षात घेऊन लॅब्रॅडॉर व जर्मन शेफर्ड यांचे पालन केले जात आहे. दोन वर्षांत १५ ते १८ हजार रुपयांप्रमाणे १९ पिलांची विक्री केली आहे. शहरातील पाळीव पशुप्रेमींची मागणी बघता पर्शियन जातीच्या मांजरीचे संगोपन व विक्रीही सुरू केली आहे. ससेपालन, बदकपालनही होते. संपर्क : बापू बर्वे- ९८२२४४५९९६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.