
लोणी मसदपूर (ता. कर्जत, जि. नगर) येथील एकनाथ कारभारी होले आणि किसनराव खासेराव रणसिंग यांनी योग्य व्यवस्थापनातून तसेच इतर पिकांचेही उत्पादन वाढवले आहे. कृषी विभागाच्या पुढाकाराने सुधारित जातींच्या लागवडीतून कर्जत तालुक्यात तुरीचे क्षेत्र वाढत आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत हा तसा दुष्काळी तालुका. काही भागाला कुकडी कालव्याचे पाणी मिळत असले, तरी बहुतांश भागात पाणी टंचाई असते. तालुक्यात खरिपात बाजरी, कांदा, तूर लागवड असते. जिथे पाण्याची पुरेशी उपलब्धता आहे तेथे लिंबू बागायती आहे. लोणी मसदपूर येथील एकनाथ कारभारी होले हे प्रयोगशील शेतकरी. त्यांच्याकडे १७ एकर शेती असून, यंदा त्यांनी दीड एकरावर तूर, दीड एकरावर ऊस, अडीच एकरावर कांदा, दीड एकरावर लिंबू लागवड आहे. याच बरोबरीने ज्वारी व इतर पिकांची लागवड असते. होले शेतीत सातत्याने वेगवेगळे प्रयोग करतात. विशेषतः तुरीसारख्या पिकांत प्रयोगातून त्यांनी उत्पादनवाढ केली आहे. यंदा बदलत्या वातावरणामुळे नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात तुरीवर मर, रोग आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले असले, तरी होले यांनी व्यवस्थापनातून हे नुकसान टाळले आहे. लोणी मसदपूर व परिसरातील शेतकऱ्यांना तूर व्यवस्थापनाबाबत तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ मस्के, कृषी सहायक अनिल तोडकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. योग्य व्यवस्थापनातून उत्पादनवाढ लोणी मसदपूर परिसरात ज्वारी हे पारंपरिक पीक असले, तरी एकनाथ होले तूर पिकाकडे वळले आहे. गेल्या पाच वर्षांपासून तूर लागवड करतात.
ऊस, लिंबातील आंतरपीक प्रयोग
दुष्काळी भागात तूर क्षेत्रात वाढ कर्जत तालुक्यात पूर्वी पाच हजार हेक्टरवर तूर लागवड होती. गेल्या दोन वर्षांत वाढ होऊन तुरीचे क्षेत्र दहा हजार हेक्टरवर गेले आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकार आणि कृषी विभागाच्या मदतीने प्रत्येकी तीन गावांत एक खरीपपूर्व आढावा बैठक, प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. त्यातून तुरीच्या सुधारित जातींची लागवड, व्यवस्थापन यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. या प्रयत्नामुळे पारंपरिक जातींऐवजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ‘बीडीएन ७११’ या जातीची लागवड वाढली आहे. त्यामुळे उत्पादन वाढ झाली आहे. यंदा अजून क्षेत्र वाढण्याचा अंदाज उपविभागीय कृषी अधिकारी अनिल गवळी, तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ मस्के, कृषी सहायक अनिल तोडकर यांनी व्यक्त केला. संपर्क : एकनाथ होले, ९६३७६१४४४५
लिंबामध्ये तुरीचे आंतरपीक लोणी मसदपूर येथील किसनराव खासेराव रणसिंग हे ज्येष्ठ शेतकरी. त्यांना अण्णासाहेब, अतुल व चरण ही मुले. अण्णासाहेब व अतुल हे व्यवसायानिमित्त सोलापूरला असतात. चरण हे पेशाने शिक्षक आहेत. पाहतात. रणसिंग कुटुंबाची साडेतेरा एकर शेती. स्वतः किसनराव, पत्नी रतनबाई व मुलगा चरण हे शेतीचे व्यवस्थापन पाहतात. गेल्या पंधरा वर्षांपासून तुरीचे पीक घेतात. पूर्वी ते तिफणीने पारंपरिक पद्धतीने ‘खडका’ जातीची पेरणी करत. मात्र दोन वर्षांपासून त्यांनी तुरीच्या लागवड पद्धतीत आणि व्यवस्थापनात बदल केला. आता पेरणीऐवजी ‘बीडीएन ७११’ या सुधारित जातीच्या बियाण्यांची टोकण करतात. टोकण पद्धतीत दोन ओळींतील अंतर सहा फूट, तर दोन रोपांतील अंतर एक फूट ठेवले. त्यामुळे तुरीची वाढ होण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली. योग्य व्यवस्थापनातून रणसिंग यांनी एकरी ७ ते ८ क्विंटलने वाढ केली आहे. गेल्या वर्षी एकरी साडेदहा क्विंटल उत्पादन मिळाले. लिंबू बागेचे व्यवस्थापन
- चरण रणसिंग ः ८६६९३७६०३७
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.