‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठ

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख यांनी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून नैसर्गिक पद्धतीने गूळनिर्मिती यशस्वी केली आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार चौकोनी आकार, क्यूब्ज, पावडर आदी उत्पादने ‘त्रिवेणी नॅचरल’ ब्रॅण्डने सादर केली आहेत. विशेष मेहनत घेत विपणन व्यवस्था तयार करून राज्यात विविध ठिकाणी थेट ग्राहक बाजारपेठ तयार केली आहे.
Dr. Mohanrao Deshmukh's jaggary preparation plant.
Dr. Mohanrao Deshmukh's jaggary preparation plant.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख यांनी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून नैसर्गिक पद्धतीने गूळनिर्मिती यशस्वी केली आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार चौकोनी आकार, क्यूब्ज, पावडर आदी उत्पादने ‘त्रिवेणी नॅचरल’ ब्रॅण्डने सादर केली आहेत. विशेष मेहनत घेत विपणन व्यवस्था तयार करून राज्यात विविध ठिकाणी थेट ग्राहक बाजारपेठ तयार केली आहे. परभणी जिल्ह्यात सोनपेठ येथे डॉ. मोहनराव अण्णासाहेब देशमुख यांचे वास्तव्य आहे. त्यांनी होमिओपॅथी पदवी (बीएचएमएस) संपादन केली आहे. सन १९९३ पासून ते सोनपेठ शहरात ‘प्रॅक्टिस’ करतात. त्यांचे कुटुंब औरंगाबाद येथे वास्तव्यास आहे. दहिखेड (ता. सोनपेठ) शिवारात देशमुख यांची १४ एकर शेती आहे. वैद्यकीय व्यवसाय सांभाळून शेतीकडेही ते दररोज अत्यंत बारकाईने लक्ष देतात. मातीची खोली ३० ते ४० फूट असल्याने विहिरी खोदणे कठीण होते. त्यामुळे दोन बोअर घेतले आहेत. मानवी व शेतीचे आरोग्य लक्षात घेऊन २०१३ नंतर नैसर्गिक शेती पध्दतीचा अंगीकार केला. दोन गायी व शेणखताचा शेतीला आधार झाला. सिंचनाची सुविधा केल्यानंतर पीक पद्धतीत बदल केला. बाजारपेठेतील संधी ओळखून सन २०१५ ते २०१६ च्या सुमारास देशमुख गूळनिर्मितीकडे वळले. नैसर्गिक पद्धतीने उत्पादन

  • १० एकर ऊस असून व्यवस्थापन पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने.
  • नैसर्गिक गूळ तयार करण्यासाठी आवश्‍यक ऊसही तसाच तयार केला जातो.
  • टप्प्याटप्याने आज उसाखालील क्षेत्र १० एकरांपर्यंत.
  • मित्र वांगीकर यांचाही १५ एकर ऊस. ते देखील नैसर्गिक पद्धतीनेच पिकवतात. गरजेनुसार त्याचीही तीनहजार रुपये प्रति टन दराने खरेदी.
  • ऊस गाळप, रस उकळणे, पाक तयार करणे, साठवण या प्रक्रिया सुलभतेने करता याव्यात यासाठी १० एचपी क्षमतेचा चरक, चुल्हांगण, पाक साठवण ट्रे यांची रचना विशिष्ट पद्धतीने.
  • गूळनिर्मितीसाठी भेंडीच्या रसाचा वापर होतो. त्यासाठी अर्ध्या एकरावर भेंडी लागवड.
  •  प्रतिदिन दहा टन ऊस गाळप क्षमता.
  • व्यवस्थापन- ठळक बाबी

  • पहिल्या वर्षी (२०१६) ४० टन उसापासून चार टन गूळनिर्मिती.
  • टप्प्याटप्प्याने क्षमता वाढवीत २०१९ मध्ये ५०० टन उसापासून ५० टन तर २०२० मध्ये ५३० टन उसापासून ५३ टन गूळ उत्पादन.
  • गुऱ्हाळाचा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी कालावधीत.
  • शेतीकामे करण्यासाठी सालगडी, छोटा ट्रॅक्टर. वर्षभर चार महिलांना रोजगार उपलब्ध.
  • गुऱ्हाळावर उत्तर प्रदेशातील सहा मजूर कार्यरत. देशमुख तसेच मुलगा धर्मराज देखील उत्पादनासह विक्री- विपणन जबाबदारी पाहतो.
  • विविध आकारांतील उत्पादने

  • देशमुख यांनी बाजारपेठ व ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गुळाची विविध आकारांत निर्मिती केली आहे. यात चौकोनी स्वरूपात म्हणजे ६ बाय ६ बाय दोन इंच आकार तसेच ८ व १४ ग्रॅम च्या आकारात क्यूब्ज, शिवाय गोळी (५०० ग्रॅम वजन) व पावडर असे विविध प्रकार तयार केले आहेत.
  • पावडरीचे अर्धा किलो पॅकिंग आहे. पॅकिंगसाठी कॅण्डी पाऊचचा वापर होतो. काकवीची बाटलीमधून (२०० ग्रॅम वजन) विक्री होते. व्हॅनिला, सुंठ, ड्रायफ्रूट अशा विविध प्रकारच्या स्वादांत (फ्लेवर) क्यूब्ज तयार होतात. त्रिवेणी नॅचरल हा ब्रॅण्ड तयार केला आहे.
  • गूळनिर्मितीसाठी प्रति किलो सुमारे ४६ रुपये, तर पावडर तयार करण्यासाठी हाच खर्च ५५ रुपये येतो. बाजारपेठेतील स्थितीनुसार खर्चाचे गणितही बदलते. विविध आकारांनुसार, वाहतूक व ठिकाणानुसार गुळाचे दर अर्धा किलो ते किलोला १०० पासून ४०० रुपयांपर्यंत आहेत. प्रदर्शनात गूळ १०० रुपये प्रति किलो, पावडर १६० रुपये किलो व क्यूबची २०० रुपये प्रति किलो दराने विक्री होते.
  • विपणन व्यवस्था सोनपेठ शहरात महिन्याला दोन ते तीन क्विंटल गूळ विक्री होत असे. दोन वर्षात गुळाच्या चहाचा ‘ट्रेन्ड’ निघाल्यामुळे हॉटेल्स चालकांकडून गुळाला मागणी वाढली. आता शहरात महिन्याला एक टन तर वर्षभरात १० ते १२ टन विक्री होते. याशिवाय परभणी, पुणे, ठाणे, औरंगाबाद, मुंबई आदी ठिकाणीही उत्पादने पाठवली जातात. प्रभावती नैसर्गिक धान्य समुहामार्फत बारामती येथील कृषी प्रदर्शन, पुणे येथील भीमथडी जत्रा, मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर आदी विविध प्रदर्शनांत स्टॉल उभारून थेट ग्राहक विक्री होते. गृहसोसायट्यांना विक्री सुमारे नऊ व्हॉटस ॲप ग्रूपद्वारे ग्राहकांचे ‘नेटवर्क’ उभारले आहे. ग्राहकांच्या माहितीसाठी स्वतःच्या शेतातील पिकांच्या विविध अवस्थांची छायाचित्रेही ग्रूपवर ‘शेअर’ केली जातात. पुणे शहरात काही गृह सोसायट्यांना महिन्यातील एका रविवारी सकाळी ६ ते दुपारी १ या कालावधीत घरपोच विक्री होते. लग्न व अन्य समारंभावेळी ग्राहकांच्या मागणीनुसार गुळाची विविध उत्पादने असलेले खास पॅकिंग करून ते वितरित केले जाते. औषधी उद्योगांनाही गूळ पुरवठा होतो. सेंद्रिय धान्य उत्पादक गट

  • ‘आत्मा’ अंतर्गत वाणगंगा सेंद्रिय धान्य उत्पादक शेतकरी गटाचे देशमुख सदस्य. याद्वारे विविध धान्यांची विक्री.
  • ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक संतोष आळसे, तालुका कृषी अधिकारी गणेश कोरेवाड, मंडळ कृषी अधिकारी कौलगे, कृषी सहाय्यक जी.के.खटींग यांचे मार्गदर्शन.
  • देशमुख आपल्या शेतातच विविध सेंद्रिय घटक तयार करतात. एक एकरांत एनएमके गोल्डन सीताफळाची लागवड.
  • संपर्क- डॉ. मोहनराव देशमुख-९७६४२७८५५९, ७०५८१४८८८८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com