
चांदूररेल्वे (जि. अमरावती) येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्थेने लोक सहभागातून शाश्वत ग्रामीण विकासासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये जलसंधारण, पाणीवाटप आराखडा, ग्रामीण महिलांना रोजगार, मुलांना शिक्षण तसेच शाश्वत शेती विकासासाठी विविध गावांमध्ये उपक्रम राबविले जातात. ग्रामीण भागातील वंचित घटक, आरोग्य, शेती, पर्यावरण, स्वयंरोजगार, महिला अशा समाजातील सर्व घटकांच्या सक्षमीकरणासाठी चांदूररेल्वे (जि. अमरावती) येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे. १७ सप्टेंबर २००२ मध्ये धर्मदाय कायद्यान्वये संस्थेची नोंदणी झाली. सध्या बंडू आंबटकर संस्थेचे अध्यक्ष असून, त्यांच्यासह सात सदस्य कार्यरत आहेत. गेल्या वीस वर्षात संस्थेने ग्रामविकास, शेतीविकास तसेच महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गावांचा शाश्वत विकास आराखडा गावाच्या शाश्वत विकासासाठी जल, मृद्संधारणाची कामे करावी लागतात. त्याकरिता प्रकल्प आराखडे तयार करून देण्याचे काम संस्था करते. गेल्या सतरा वर्षांत १२० पेक्षा अधिक गावांकरिता प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले आहेत. प्रकल्प आराखडा प्रभावी असल्यास त्याला शासनाकडून निधीची तरतूद होते. गावातील उपलब्ध संसाधनाची ओळख देखील या माध्यमातून ग्रामस्थांना करून दिली जाते. गावाचा शाश्वत विकास साधण्याचे काम याव्दारे होत असल्याची माहिती अध्यक्ष बंडू आंबटकर यांनी दिली. ग्रामसेवा लोक अभियान संस्थेच्या माध्यमातून २०१४ मध्ये ‘ग्रामसेवा लोक अभियान’ ही चळवळ सुरू करण्यात आली. याव्दारे गावातील नागरिकांना एकत्रित करून गावातील पाणी उपलब्धतेचे अंदाजपत्रक तयार केले जाते. गावशिवारातील पाणी साठ्याची उपलब्धता, लोकसंख्या आणि जनावरांची संख्या लक्षात घेऊन त्याआधारे गावाची एकूण पाण्याची गरज शास्त्रोक्त पद्धतीने काढली जाते. या अंदाजपत्रकाच्या आधारे गावातील शेतकऱ्यांचे पाणी आणि पीक नियोजन ठरते. अमरावती जिल्ह्यातील सोनगाव, निमगव्हाण, भंडारा जिल्ह्यातील उसेगाव येथे याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. घर आणि शाळेत शाश्वत परसबाग घर आणि शाळेच्या परिसरात रसायन अवशेषमुक्त शाश्वत परसबागेची संकल्पना संस्थेद्वारे राबविण्याचे प्रस्तावीत आहे. त्याकरिता अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील १३०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिक्षकांच्या माध्यमातून या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. परसबागेच्या माध्यमातून एका कुटुंबाला लागणाऱ्या भाजीपाल्याची सोय करणे शक्य होणार आहे. सोनगाव, सातेफळ, निमगव्हाण, मांजरखेड कसबा या गावांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे. ‘हात मदतीचा’ उपक्रम
ग्रामीण महिलांना प्रशिक्षण गावपातळीवर महिला स्वयंसाह्यता समूहांची संख्या वाढली आहे. परंतु त्याप्रमाणात महिला समूहाचे व्यवसाय मात्र उभे राहिले नाही. ही बाब लक्षात घेता संस्थेकडून ग्रामीण महिलांना उपजीविका प्रशिक्षण दिले जाते. ब्यूटी पार्लर, शिवण क्लास, कापडी पिशव्या निर्मिती असे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या महिलांना निःशुल्क प्रशिक्षण दिले जाते. संस्थेच्या प्रोत्साहनातून सोनगाव येथे भरारी महिला स्वयंसाह्यता समूहाने गांडूळ खत उत्पादन आणि घाऊक किराणा पुरवठा असे उपक्रम राबविले आहेत. जल परिषदेतून जलव्यवस्थापनाचा विस्तार
गाव तेथे ऑक्सिजन पार्क कोरोनामुळे ‘गाव तिथे ऑक्सिजन पार्क’ अशी संकल्पना संस्थेने मांडली आहे. प्रत्येक गावात किमान ५०० निंबोळी, १०० पिंपळ वृक्ष असावेत असे संस्थेचे नियोजन आहे. वृक्षारोपणाकरिता युवकांमध्ये जागृती करण्यावर संस्थेने भर दिला आहे. गाव तेथे धान्य आणि बीज बँक येत्या काळात संस्थेने ‘गाव तिथे धान्य आणि बीज बँक’ या संकल्पनेवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या बँकेत सुरुवातीला गावातील प्रत्येकाने धान्य जमा करावे, ज्याला गरज भासेल त्या वेळी त्याने या बँकेतून धान्याची उचल करावी. एक क्विंटल गहू बँकेतून घेतल्यास परत करताना एक क्विंटल दहा किलो परत द्यावा, अशी संस्थेची संकल्पना आहे. संस्थेचा गौरव
संपर्क ः बंडू आंबटकर, ७७९८२१०२४९
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.