स्ट्रॉबेरीसह अन्य फळांपासून यशस्वी प्रक्रिया उद्योग

सातारा जिल्ह्यातील अवकाळी (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) येथील मनोहर भिलारे यांनी स्ट्रॉबेरीसह विविध फळांवर प्रक्रिया करून पल्प, क्रश, जॅम आदींची निर्मिती केली आहे. कोरोना संकटापूर्वी सुमारे १५० ते २०० टन एकूण उत्पादन तर दीड कोटी रुपये उलाढालीपर्यंत मजल मारत कोरोनानंतरही मोठ्या उमेदीने त्यात स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
‘Crush’ of various fruits in attractive packing.
‘Crush’ of various fruits in attractive packing.

सातारा जिल्ह्यातील अवकाळी (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) येथील मनोहर भिलारे यांनी स्ट्रॉबेरीसह विविध फळांवर प्रक्रिया करून पल्प, क्रश, जॅम आदींची निर्मिती केली आहे. कोरोना संकटापूर्वी सुमारे १५० ते २०० टन एकूण उत्पादन तर दीड कोटी रुपये उलाढालीपर्यंत मजल मारत कोरोनानंतरही मोठ्या उमेदीने त्यात स्थिरता मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरी दर्जेदार चवीसाठी प्रसिद्ध आहे. येथील स्ट्रॉबेरीस ‘जीआय’ (भौगोलिक निर्देशांक) मिळाला आहे. स्ट्रॉबेरी थेट विक्री करण्याबरोबर स्ट्रॉबेरीवर प्रक्रिया करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल आहे. तालुक्यातील अवकाळी गावातील मनोहर सीताराम भिलारे यांचीही सुमारे साडेसहा एकर शेती आहे. ते देखील परंपरेपासून स्ट्रॉबेरीचे पीक घेतात. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर व व्यवस्थापनातून हे पीक त्यांनी यशस्वी केले आहे. स्ट्रॉबेरी विक्री व्यवसाय

  • स्ट्रॉबेरी शेती करत असताना मालाची विक्री करण्याच्या अडचणी शेतकऱ्यांना येत असल्याचे मनोहर यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वतःच्या शेतातील तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांकडील स्ट्रॉबेरी खरेदी करून प्रक्रिया उद्योग करणाऱ्या कंपन्यांना विकण्याचा व्यवसाय सुरू केला. सन २००७ ते २०१२ या कालावधीत हा व्यवसाय त्यांनी सुरू ठेवला. या दरम्यान कंपन्यांकडून स्ट्रॉबेरी साठवणुकीसाठी ‘कोल्ड स्टोअरेज यंत्रणा फायदेशीर ठरत असल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनीही बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्ज घेऊन आपल्या जागेत ७० लाख रुपये किमतीचे ५० टन क्षमेतेचे कोल्ड स्टोअरेज २०१३ मध्ये उभारले. पुढे स्ट्रॉबेरीपासून पल्पचे उत्पादनही घेण्यास सुरुवात केली.
  • मुलगा नीलेश यानेही ‘बी टेक’ची (फूड सायन्स) पदवी घेतली. कार्यानुभव म्हणून काही दिवस अन्न प्रक्रिया उद्योग कंपनीत चार वर्षे नोकरी केली. हा अनुभव घेतल्याने घरच्या प्रक्रिया व्यवसायाला पूर्ण चालना देणे शक्य झाले.
  • कार्यान्वित प्रक्रिया उद्योग मनोहर यांनी मुलगा नीलेश आणि बंधू सुनील यांच्या मदतीने प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीस सुरुवात केली. मेघा फार्म प्रोसिंसिग या नावाने नोंदणी केली. प्रथम प्रक्रियेसाठी लागणारे कॅटल, बॉयलर, पल्प व सीलिंग मशिन, ड्रम, वजनकाटे, बॉटल्स आदी सामग्री खरेदी केली. उद्योगासाठी लागणारे सर्व परवाने व नोंदणी यांची पूर्तता केली आहे. ‘एफएसएसएआय’ संस्थेचे प्रमाणपत्र घेतले आहे. हंगामानुसार तालुका परिसरातील सुमारे ४०० शेतकऱ्यांकडून थेट बांधावर स्ट्रॉबेरी व अन्य फळांची खरेदी केली जाते. काही माल गरजेनुसार वाशी मार्केटमधून घेतला जातो. इतर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिला जातो. एप्रिलअखेर स्ट्रॉबेरीची खरेदी होते. खरेदी केलेली सर्व फळे स्वतःच्या ‘कोल्ड स्टोअरेज’मध्ये ठेवली जातात. वर्षभर व्यवसाय सुरू राहील या पद्धतीने सर्व नियोजन केले जाते. व्यवसायातील उलाढाल स्ट्रॉबेरी, रासबेरी, ब्लूबेरी, आंबा, पेरू आदी फळांवर प्रक्रिया होऊन क्रश, पल्प, जॅम आदी उत्पादने तयार केली जातात. भिलारे सांगतात की सातत्य, आर्थिक नियोजन व बाजारपेठांचा अभ्यास यावरून वर्षाकाठी एकूण मिळून दीडशे ते २०० टन उत्पादने निर्मितीपर्यंत आम्ही पोहोचलो. वर्षाला एक ते दीड कोटी उलाढाल करण्याच्या क्षमतेपर्यंत पोहोचलो होतो. मात्र कोरोना संकट सुरू झाल्यानंतर मागणी कमी होऊन उद्योगाचा वेग मंदावला. स्ट्रॉबेरी उत्पादकांच्या शेतीवरही परिणाम झाला होता. आता मार्केट पुन्हा पूर्वपदावर येत आहे. ७० ते १०० टन उत्पादनापर्यंत पोहोचलो आहोत. या वर्षी जोमाने काम सुरू असून, २०० टनांचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे भिलारे सांगतात. बाजारपेठ सातारा शहरासह, मुंबई, पुणे, रायगड, नगरसह, सुरत या शहरापर्यंत उत्पादने पोहोचली आहेत. काही वितरक तयार केले आहेत. मुलगा व बंधू यांच्याबरोबरीने पत्नी कमल या देखील उद्योगात कार्यरत असतात. सुमारे सात कामगारांना रोजगार देण्यात आला आहे. पल्पचे २००, ५०० मिलि तसेच एक, दोन, पाच लिटरचे तर क्रश, जॅम, जेलीचे अर्धा व एक किलोचे पॅकिंग केले जाते. उत्पादनांचा दर्जा तर सांभाळला आहेच शिवाय सर्व उत्पादनांचे आकर्षक पॅंकिग केले असल्याने बाजारपेठेत मागणी चांगली राहते. भांडवल व वृद्धी

  • भिलारे सांगतात, की प्रकल्प उभारणीत कसलेही अनुदान घेतलेले नाही. जसजसे पैसे उपलब्ध होईल त्या पद्धतीने व्यवसाय वाढ करीत गेलो. घरातील सर्व सदस्यांचे आपापल्या पद्धतीने योगदान असल्याने भांडवली खर्चात बचत होते. आतापर्यंत एकूण भांडवल सुमारे सव्वा कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सुमारे ४० लाख रुपयांचे कर्ज बॅंकेकडून घ्यावे लागले. व्यवसायातून खर्च वजा जाता १० टक्क्यापर्यंत नफा मिळतो. शेतीला पूरक म्हणून भिलारे यांनी कृषी पर्यटन व्यवसायही सुरू केला आहे.
  • तेथे विविध फळझाडांची लागवड केली आहे. पर्यटकांना उत्पादनाची विक्री करणे त्यामुळे सोपे होते. कृषी पर्यटनातील उल्लेखनीय कामाबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. तर कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात पीक स्पर्धेत सन्मान झाला आला आहे. शेती व प्रक्रिया उद्योगास कृषी सचिव एकनाथ डवले यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.
  • संपर्क ः मनोहर भिलारे, ९४२२४०४१३४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com