शेळीच्या लेंडीपासून यशस्वी गांडूळ खत व्यवसाय

अकोला जिल्ह्यातील तामशी येथील गणेश जगन्नाथ काळे या तरुणाने शेळीपालन करण्याबरोबरच लेंडीवर आधारित गांडूळ खत प्रकल्प सुरू करून तो यशस्वी केला आहे. विविध जिल्ह्यांतून त्याच्या या गोदावरी ब्रॅण्ड उत्पादनाला मागणी आहे. शेळीपालकांचे ‘नेटवर्क’, व्यावसायिक शेती, नर्सरी, शेतकरी कंपनी आदी विविध उपक्रमांद्वारे सातत्याने प्रयत्नशील राहून कुटुंबाची आर्थिक व सामाजिक पतही त्याने उंचावली आहे.
शेळीच्या लेंडीपासून गांडूळ खतनिर्मिती.
शेळीच्या लेंडीपासून गांडूळ खतनिर्मिती.

अकोला जिल्ह्यातील तामशी येथील गणेश जगन्नाथ काळे या तरुणाने शेळीपालन करण्याबरोबरच लेंडीवर आधारित गांडूळ खत प्रकल्प सुरू करून तो यशस्वी केला आहे. विविध जिल्ह्यांतून त्याच्या या गोदावरी ब्रॅण्ड उत्पादनाला मागणी आहे. शेळीपालकांचे ‘नेटवर्क’, व्यावसायिक शेती, नर्सरी, शेतकरी कंपनी आदी विविध उपक्रमांद्वारे सातत्याने प्रयत्नशील राहून कुटुंबाची आर्थिक व सामाजिक पतही त्याने उंचावली आहे. अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील तामशी येथील जगन्नाथ काळे यांची ३२ एकर शेती आहे. मुलगा गणेशने बारावी शिक्षणानंतर ‘आयटीआय’मधून ‘डिझेल मेकॅनिकल’चे शिक्षण पूर्ण केले. तालुक्यातील पारस येथील वीजनिर्मिती केंद्रात त्याची निवड झाली. महिन्याला १० हजार रुपये वेतन मिळायचे. मात्र त्यासाठी दररोज आठ ते दहा तास काम करावे लागे. पण एवढेच श्रम व वेळ आपण स्वतःच्या शेती व्यवसायासाठी दिला तर अजून फायदा होईल, असा विचार करून गणेश यांनी नोकरी सोडून शेती व शेळीपालनात उतरणे पसंत केले. सुरुवातीला या निर्णयाला घरच्यांनी तसेच बाहेरच्यांनीही विरोध केला. यासाठीच शिक्षण घेतले काय? नोकरीतच आर्थिक स्थिरता असून, जीवन सुखी होऊ शकते अशी विविध मते व सल्ले ऐकायला मिळाले. पण गणेश आपल्या निर्णयावर ठाम राहिले. घरच्यांची समजून घालून त्यांनी १७ शेळ्या (उस्मानाबादी) व एक बोकडापासून व्यवसाय सुरू केला. सातत्य व चिकाटीतून शेळ्यांची संख्या बघता बघता दीडशेवर पोहोचली. लेंडीपासून गांडूळ खतनिर्मिती शेतकऱ्यांना पैदाशीसाठी शेळ्या देण्यास सुरुवात केली. उत्पन्नही चांगले मिळत होते. वर्षाकाठी काही लाखांपर्यंत नफा पोहोचला. शेळीपालनातले बारकावे समजू लागल्यानंतर बाजारपेठेतील मागणी व संधी लक्षात घेत लेंडीपासून गांडूळ खत (व्हर्मिकंपोस्ट) बनविण्याचे ठरवले. कोणतेही कष्ट व अभ्यास करायची तयारी, त्यात सातत्य व व्यवसायातील तंत्र समजून त्यानुसार नियोजन हे गुण अंगी बाणवले. त्या आधारे मोठे बंधू प्रल्हाद यांच्या जोडीने व्यवसायातही सहा वर्षांच्या अनुभवातून गणेश यांनी चांगली आर्थिक स्थैर्यता मिळवली. आज हा व्यवसाय वर्षाला सुमारे तीन लाखांवर निव्वळ नफा मिळवून देत आहे. ...असे तयार होते ‘व्हर्मिकंपोस्ट’

  • सर्वप्रथम १२ बाय ४ बाय २ फूट आकाराचा बेड तयार केला जातो.
  • यात सर्वप्रथम काडी कचऱ्याचा चार इंची थर घेतला जातो.
  • त्यानंतर किमान दोन महिने कुजलेले लेंडी खत घेतले जाते. या खताचा एक फूट थर टाकला जातो.
  • त्यानंतर पुन्हा दोन इंच काडीकचऱ्याचा थर व त्यावर लेंडी खत वापरले जाते.
  • सतत चार ते पाच दिवस पाणी शिंपडले जाते.
  • बेडमध्ये तापमान कमी झाले, की प्रत्येकी दोन किलो बेसन व गूळ प्रति पाच लिटर पाणी असे मिश्रण करून पूर्ण बेडवर वापरले जाते. त्यात पाच किलो गांडूळ कल्चर सोडले जाते.
  • नंतरच्या काळात दररोज सकाळ- संध्याकाळ दहा लिटर पाणी शिंपडले जाते.
  • दर आठ दिवसांनी गांडूळ खत काढले जाते. सतत तीन महिने ही प्रक्रिया सुरू राहते.
  • प्रति पाच बेडसमध्ये गांडूळ खतनिर्मिती. प्रति बेड सुमारे ८ क्विंटल, तर सर्व बेड मिळून चार टन उत्पादन.
  • सोबत मिळणाऱ्या ‘व्हर्मिवॉश’चा घरच्या फळबागेसाठी वापर.
  • मार्केटिंग व विक्री  

  • विपणनाचे (मार्केटिंग) जाळे उभारले. प्रति शेळीपासून वर्षाला व्हर्मिकंपोस्ट तयार केले, तर आठ ते नऊ हजार रुपये त्यातून कमावणे शक्य होते असे गणेश सांगतात. प्रति शेळीपासून दररोज एक किलोपर्यंत लेंडीखत मिळते.
  • गोदावरी ब्रॅंडने ५० रुपये प्रति किलो दराप्रमाणे विक्री. मागणीनुसार घरपोचदेखील दिले जाते. -शेतकरी, रोपवाटिकाधारक हे मुख्य ग्राहक. अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशीम या चार मुख्य जिल्ह्यांमध्ये विक्री. मुख्यतः फळबागांसाठी त्याचा वापर. हळद, संत्रा, लिंबू, कलिंगड, खरबूज आदी पिकांसाठी शेतकऱ्यांकडून मागणी.
  • मार्गदर्शकाच्या भूमिकेत काळे बंधू ॲग्रो फार्म अंतर्गत विस्तार कराताना गणेश यांनी सुमारे ८० शेळीपालकांना मार्गदर्शन करून त्यांना उभे केले आहे. त्यांना शेळीविक्रीसाठीही संपूर्ण सहकार्य केले जाते. गावातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन ‘भूमिपुत्र शेतकरी गट’ व ‘कृषी अन्नदाता फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिके व प्रशिक्षणही गणेश विनाशुल्क देतात. संस्थांतर्फे आयोजित प्रशिक्षण वर्गातही ते मार्गदर्शन करतात. शेतीही केली फायद्याची  गणेश यांनी शेळीपालन, गांडूळ खत व्यवसाय सांभाळतात आपल्या ३२ एकर शेतीकडेही तेवढेच लक्ष दिले आहे. लिंबू बाग ६ एकर, सोयाबीन २६, तूर १५ एकर (सोयाबीनमध्ये), कांदा बीजोत्पादन ४ एकर, उन्हाळी तीळ १२ एकर असे क्षेत्र असते. आपल्या व्हर्मिकंपोस्टचा फळबागांना उपयोग होतो. कृषी विभागाच्या मदतीने घेतलेल्या शेडनेटमध्ये रोपवाटिका व्यवसायही सुरू केला आहे. कलिंगडाच्या हजारो रोपांची विक्री केली आहे. सोयाबीनचे एकरी ९ क्विंटल, तूर ७ क्विंटल, कांदा बियाणे ४ ते ५ क्विंटल व तीळ ४ ते ५ क्विंटल असे उत्पादन ते घेतात. शेती व सर्व व्यवसायातून वार्षिक ३० लाख रुपयांच्या पुढे उलाढाल होत असून, सुमारे सात मजुरांना कायमस्वरूपी रोजगार दिल्याचे गणेश सांगतात. संपर्क ः गणेश काळे, ९५२७१५६७४७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com