पणन मंडळाच्या मोबाइल ॲपचे उद्‍घाटन 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सुधारित मोबाइल ॲपचे उद्‍घाटन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
Marketing Board launches mobile app
Marketing Board launches mobile app

पुणे ः महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सुधारित मोबाइल ॲपचे उद्‍घाटन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपमुळे शेतकऱ्यांना शेतीमालाचे बाजारभाव घरबसल्या पाहता येणार असून, कृषी पणन विषयक माहिती ही त्यावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन पाटील यांनी या वेळी केले. 

पणन मंडळ राबवीत असलेले विविध प्रकल्प, योजना, उपक्रम आणि बाजारभावांची माहिती शेतकरी, बाजार समित्या, बाजार घटक व सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कृषी पणन मंडळाने हे ॲप अद्ययावत केले आहे. त्याच्या उद्‍घाटन प्रसंगी आमदार दिलीप मोहिते, सहकार आयुक्त अनिल कवडे, पणन संचालक सुनील पवार, पणनचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे आदी उपस्थित होते. 

सुनील पवार म्हणाले, ‘‘राज्यातील सर्व बाजार समित्यांना त्यांच्या आवारात होणाऱ्या शेतीमालाची दैनिक आवक व बाजारभाव या ॲपवर सहज भरता येणार आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील बाजारभावाची माहिती एकत्रित मिळणे सोयीचे होणार आहे. शेतीमालाची थेट विक्री अथवा खरेदी करण्यासाठी विक्रेता व त्याचा शेतीमाल आणि खरेदीदार आदींबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची सुविधाही या ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘गुगल प्ले स्टोअर’वर MSAMB या नावाने मराठी व इंग्रजी भाषांत हे ॲप विनामूल्य उपलब्ध आहे. 

ही माहिती मिळणार  - शेतीमालाची दैनिक आवक व बाजारभाव  - शेतकरी उत्पादक कंपन्या  - कृषी पणन मित्र मासिक  - राज्यातील सर्व बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती  - शेतीमाल विक्रेता व खरेदीदार  - कृषी पणन मंडळ राबवीत असलेले विविध प्रकल्प, योजना व उपक्रम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com