शेत ते बाजारपेठेपर्यंत युवकांची ‘वेसाटोगो’ कंपनी

नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व सहकाऱ्यांनी कृषी व्यवसायाशी संबंधित ‘वेसाटोगो’ ही ‘स्टार्टअप’ सुरु करून अल्पावधीतच आपल्या कंपनीचे बाजारपेठेत ठळक स्थान निर्माण केले आहे.
शेत ते बाजारपेठ- साखळी प्रणालीचा स्टार्ट अप करणारी वेसाटोगो कंपनीची टीम.
शेत ते बाजारपेठ- साखळी प्रणालीचा स्टार्ट अप करणारी वेसाटोगो कंपनीची टीम.

नाशिक येथील संगणक अभियंता अक्षय दीक्षित व सहकाऱ्यांनी कृषी व्यवसायाशी संबंधित ‘वेसाटोगो’ ही ‘स्टार्टअप’ सुरु करून अल्पावधीतच आपल्या कंपनीचे बाजारपेठेत ठळक स्थान निर्माण केले आहे. ‘ग्रामिक’ व ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट सिस्टीम’ अशी दोन संगणकीय प्रणाली उत्पादने तयार केली आहेत. शेतकरी कंपन्या, निर्यातदार, व्यावसायिक यांच्याकडून या उत्पादनांना चांगली मागणी येत आहे.   नाशिक येथील अक्षय दीक्षित या तरुण अभियंता युवकाने वेसाटोगो ही संगणकीय क्षेत्रातील कंपनी स्थापन केली आहे. वडील वायूसेनेत असल्याने घरची लष्करी पार्श्वभूमी होती. साहजिकच अक्षयची देखील तीच सेवा करण्याची महत्वाकांक्षा होती. काही तांत्रिक कारणामुळे वायुसेवेतील संधी हुकली. सन २०१८ मध्ये नाशिक येथे संगणक अभियांत्रिकीची पदवी संपादन केल्यानंतर “जय किसान जय विज्ञान” हा विचार घेऊन कृषी क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. संकल्पनेला मिळाले पाठबळ सन २०१८ साली ‘टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस फौंडेशन’ व ‘सह्याद्री शेतकरी प्रोड्यूसर कंपनी (मोहाडी यांच्या माध्यमातून कृषीक्षेत्रातील आव्हानांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अडचणींचा शोध घेतला जात होता. शेतमाल वाहतूक व पुरवठा साखळी दरम्यानच्या अडचणी या निमित्ताने समोर आल्या. टाटा समूहाच्या 'डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर' च्या माध्यमातून समस्येवर पर्याय शोधण्यासाठी अभियंत्यांना निमंत्रित केले गेले. अक्षयनेही अर्ज केला. त्या अनुषंगाने वयाच्या २१ व्या वर्षीच पदवी पूर्ण होण्याच्या सहा महिने आधी ‘वेसाटोगो’ या स्टार्टअपचा जन्म झाला. लागवड व शेतमालाचे उत्पादन ते बाजारपेठेत नेण्यापर्यंतची साखळी या संकल्पनेवर आधारित प्रकल्पकाम अक्षयने पूर्ण केले. त्यासाठी देशातील ५० तरुणांत अक्षय व त्यांच्या सहकाऱ्यांची निवड झाली. संशोधन प्रशिक्षक संदीप शिंदे व प्रा.सचिन पाचोरकर यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. ‘वेसाटोगो’ कंपनीची संकल्पना अक्षय सांगतात की ‘वेसा’ म्हणजे संस्कृत भाषेत ‘छोटा (अल्पभूधारक) शेतकरी’ तर ‘टोगो’ म्हणजे जपानी भाषेत ‘एकात्मता’ असा होतो. त्यावरून वेसाटोगो कंपनीची स्थापना छोट्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन झाली. अक्षयसोबत तीन सहकाऱ्यांची मिळून ‘टीम’ तयार झाली. त्याआधारे कृषी व्यवसाय व्यवस्थापन संगणकीय प्रणाली ॲप तयार करण्यात आले. ‘सीड-टू-प्लेट’ म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत माल पोचण्यापर्यंतची साखळी यात समाविष्ट आहे. उत्पादने तयार करून त्यातील उत्पन्न मिळवून आत्तापर्यंत सुमारे ८२ लाख रुपयांची गुंतवणूक त्यातून झाली आहे. ‘स्टार्ट अप’ च्या प्रवासाचे टप्पे संशोधन व संकल्पना विस्तार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ‘लागवड ते काढणीपश्चात बाजारपेठ साखळी दरम्यान प्रमुख समस्या विचारात घेतल्या. १५ हून अधिक गावांतील ३५० हून अधिक शेतकरी व १०० वाहतूकदारांच्या भेटी घेतल्या. बाजार समित्या, शेतकरी उत्पादक कंपन्या, निर्यातदार यांसह संघटित व असंघटित व्यावसायिकांकडून समस्या जाणून घेतल्या. प्रायोगिक तत्त्वावर कामास सुरवात संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी ‘टूल्स’ तयार केले. त्यांचे परिणाम तपासण्यासह शेतकऱ्यांकडून ‘फीडबॅक’ घेण्यात आले. त्यानुसार येणाऱ्या सूचना व तांत्रिक अडचणी सोडवून प्रणाली विकसित केली. प्रत्यक्षात कामात सुरवात मोहाडी- नाशिक येथील प्रसिद्ध सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीसोबत चर्चा झाली. दोघांचे संयुक्त कामकाज सुरु झाले. ‘सह्याद्री’ चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, ‘सप्लाय चेन’ विभागाचे प्रमुख तुषार जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांमुळे वापरकर्त्याला सुलभ अशी प्रणाली कार्यान्वित झाली. शेतमाल खरेदी, बाजारपेठे माहिती व वाहतूक व्यवस्थापनासाठी ‘ग्रामिक’ व कृषी व्यवसाय व्यवस्थापनासाठी ‘एफपीओ मॅनेजमेंट सिस्टीम’ (Agri Management system ) विकसित झाली. ‘स्टार्ट अप’ची वैशिष्ट्ये

  • ग्रामिक व एफपीओ मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीतून २० हजार शेतकऱ्यांची नोंदणी
  • शेतकरी उत्पादक कंपनीशी संबंधित ‘एफपीओ मॅनेजमेंट सिस्टीम’ च्या माध्यमातून ३० हजार शेतमाल व्यावसायिकांची नोंदणी. या सर्वांकडून प्रणालीच्या माध्यमातून ६५० कोटींची उलाढाल (ऑक्टोबर २०२१ अखेर). तर वेसाटोगो कंपनीची वार्षिक उलाढाल ६० कोटी रुपयांपर्यंत.
  • शेतकरी कंपन्या, निर्यातदार, कृषी व्यावसायिकांसाठी उत्पादने फायदेशीर. सध्या ८ ते १० शेतकरी कंपन्या ग्राहक झाल्या आहेत.
  • शेतकऱ्यांसह व्यावसायिकांचे ‘डिजिटल प्रोफायलिंग’
  • -शेतमाल खरेदीत माल पोहोच झाल्यानंतर शेतकऱ्यांना माहितीचे संदेश.
  • खरेदी विक्री व्यवहाराच्या ‘डिजिटल’ नोंदी.
  • मनुष्यबळ कार्यक्षमता विकासाला चालना.
  • कामकाजातील त्रुटी, गैरप्रकार टाळण्यासाठी पडताळणी पध्दत.
  • शेतमाल, खरेदी, दर निश्चिती, काढणी, पुरवठा, साठवणूक, त्यासंबंधित नोंदी, पुरवठा, वाहतूक, विक्री तपशील आदी बाबीं प्रणालीत समाविष्ट.
  • स्टार्टअपचा सन्मान

  • सोशल एंटरप्राईज ऑफ द इअर २०१९ (ॲक्शन फोर इंडिया)
  • टॅकनेट (TACNET) इनिशिएटिव्ह अॅवार्ड २०१९ (टाटा मोटर्स)
  • इमर्जिंग सोशल एंटरप्राईज ऑफ द इयर २०२१ (टीआयई, हैदराबाद )
  • नॅशनल स्टार्टअप ॲवार्ड २०२१ जाहीर (भारत सरकार)
  • ‘इंडिया इनोव्हेशन ग्रोथ प्रोग्रॅम’- पहिल्या ५० स्टार्ट अप मध्ये निवड
  • टीम

  • अक्षय दीक्षित- सह संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी
  • सागनिका चक्रवर्ती, सह संस्थापक-प्रमुख, डिझाईन विभाग
  • आशिष म्हाळनकर, सह संस्थापक व प्रमुख ‘मोबाईल टेक्नोलॉजी’
  • वैभव शेळके, सह संस्थापक-'सिटीओ’
  • प्रतिक्रिया शेत व्यवस्थापन, वाहतूक ते बाजारपेठेसाठी पुरवठा साखळी या पद्धतीने वेसाटोगो सह्याद्रीसोबत कार्यरत आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांती घडू शकते हा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे कृषी व्यवसाय, शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोठा हातभार लागणार आहे. -विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी संपर्क- अक्षय दीक्षित- ८६९८८२९५२५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com