
अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति पावसाच्या आदिवासी भागाची उपजीविका डांगी गोवंशावर अवलंबून आहे. संगमनेर येथील लोकपंचायत संस्थेने वेळीच सतर्क होऊन डांगी गोवंश संवर्धन प्रकल्प हाती घेतला.संशोधन, पशुपालक, संस्था यांच्या संघटनेतून प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केली. पशुपालकांचे जीवनमान त्यातून पुन्हा उंचावले. डांगी हा देशी गोवंश प्रामुख्याने डोंगराळ व अति पावसाच्या भागात उत्क्रांत पावलेला आहे. तेलकट त्वचा व मजबूत खुरांमुळे ही जनावरे पुणे, नगर, नाशिक, ठाणे, पालघर जिल्ह्यापर्यंत पाळली जातात. साधारण चौदा तालुके डांगीपालनासाठी प्रसिद्ध आहेत. डांगींच्या अस्तित्वाला बाधा नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात महादेव कोळी व ठाकर समाजाचे आदिवासी शेतकरी मुख्यत्वे डांगीपालन करतात. संगोपन, राजूर-घोटी प्रदर्शनात विक्री, दुधापासून खवा-पेढे तयार करणे अशी त्यांची शाश्वत उपजीविका होती. मात्र २००० मध्ये अति पर्जन्यवृष्टी झाली. साथीचे आजार आले. दहा वर्षांत डांगी गोवंश मोठ्या संख्येने कमी झाला. कळसूबाई-हरिश्चंद्रगड पट्ट्यात त्याची तीव्रता अधिक होती. पशुपालक हवालदिल झाले. संवर्धन प्रकल्प संगमनेर येथील ‘लोकपंचायत संस्थेने डांगी गोवंश संवर्धनाची मोहीम हाती घेतली. ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात जैवविविधता संवर्धन कार्यक्रम सुरु झाला. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने डांगी गोवंश संवर्धनाचे काम ‘लोकपंचायत’ संस्था अकोले तालुक्यात करीत आहे. संवर्धन प्रकल्प उद्दिष्टे
पशुपालक संघ कार्यरत कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरातील डांगी पालकांनी पशुपालक संघाची (Breeders Association) स्थापना केली. त्याद्वारे डांगीकेंद्रित उपजीविका सक्षम होण्यास व दूध प्रक्रिया, खवा उद्योगाचे अर्थकारणही उंचावण्याचा प्रयत्न झाला. प्रकल्पाचे पुढे आलेले परिणाम
राखण रान (Grassy Meadows)-
डांगी जनावरांचे प्रदर्शन
पशुपालकांच्या प्रतिक्रिया सुमारे २५ वर्षांपासून डांगी गोवंश सांभाळतो. आमच्या भागात अतिवृष्टी होते. त्वचा तेलकट असल्याने पावसात हे जनावर चांगले तग धरते. गाय २५ हजारांपर्यंत तर बैलजोडी ९० हजारांपर्यंत मिळते. दूध पौष्टिक असते. वळूलाही अधिक किंमत मिळते. शेतीकामांसाठी ही फायदेशीर जनावरे आहेत. सुनील पाबळकर, पशुपालक चौथ्या पिढीपासून डांगीचे संगोपन आम्ही करतो. दोन बैलजोड्या, सहा गायी व कालवडी आहेत. पाच हजार मिमी. पाऊस पडतो. तरीही पावसाळ्यात गाळ तुडवणे, रोपेवाहतूक ही कामे डांगी अधिक वेगाने करतात. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत न थकता ते औताला जुंपलेले असतात. प्रति लिटर २२ रुपये दराने दुधाची विक्री होते. औषधी असल्याने वळूलाही दूध पाजतो. आमचे सारे कुटुंब या गोवंशावर अवलंबून आहे. जनावरे शक्यतो विकत नाही. गंगाराम धिंदळे- ९४२३१६२७४३ शिरपुंजे राजूर येथे अनेक वर्षांपासून डांगी जनावरांचे प्रदर्शन भरवण्याची परंपरा आहे. राज्याबाहेरील शेतकरीही खरेदी विक्रीसाठी येतात. चार दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शेतकऱ्यांच्या निवासाची सोय ग्रामपंचायत करते. -गणपत देशमुख, सरपंच, राजूर अकोले-जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील आमचे दुर्गम गाव आहे. सह्याद्रीच्या डोंगरांनी वेढलेल्या अति पावसाच्या या भागात डांगीशिवाय अन्य जनावरे टिकणे अवघड आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. -बुधाजी वळे, डांगीपालक, फोफसंडी पाचनई-कोथळे-लव्हाळी या गावातील बहुतांशी जनावरे हरिश्चंद्रगडावर चरायला जातात. तेथील निसर्गनिर्मित गुहांमध्ये त्यांना ठेवले जाते. स्थानिक ‘डांगी मित्र’, पशुसंवर्धन विभाग यांच्या मदतीने लसीकरण शिबिरांमधून गाव पातळीवर प्रथमोपचाराची सोय झाली आहे. -वाळीबा भौरुले, डांगी पालक, लव्हाळी ओतूर दरवर्षी अमृतसागर दूध संघ व जिल्हा सहकारी बँकेकडून गाईंसाठी आर्थिक मदत केली जाते. आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे हा उद्देश असतो. वैभव पिचड, आमदार, राजुरी संपर्क - ९९२२२५५५२१ संपर्क- विजय सांबरे- ९४२१३२९९४४ डांगी गोवंश अभ्यासक, लोकपंचायत
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.