
शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी धडपडत असतात. पारंपारिक पाटपाण्यावरील लागवडीला फाटा देत मल्चिंग पेपर व ठिबक सिंचना आधारे कांद्याचे दर्जेदार उत्पादन घेण्यात पुणे जिल्ह्यातील धामणखेल (ता.जुन्नर) गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या या यशस्वी प्रयोगाचे अनुकरण पंचक्रोशीतील गावे करू लागली आहेत. यावर्षी सुमारे २०० एकरांवर या तंत्रज्ञानावर आधारित कांदा लागवडीची लगबग सुरु आहे. पुणे जिल्ह्यात धामणखेल (ता. जुन्नर) येथील शेतकरी मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन या तंत्राआधारे कांद्याची आधुनिक शेती करू लागले आहेत. गावातील प्रयोगशील शेतकरी राजू कोंडे यांनी गेल्या वर्षी यू ट्यूब चॅनेलवर राजस्थान येथील मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीचा प्रयोग पाहिला. ही प्रेरणा घेऊन राजू तसेच गावातील दिवंगत शेतकरी रवी जाधव, सचिन भोर, संदीप खंडागळे, मंगेश सोमोशी, प्रदिप बोंबले यांनी प्रत्येकी दोन ते तीन एकरांवर प्रयोग केला. त्यातून एकसारख्या आकाराचा वजनदार कांदा मिळाला. दरही चांगला मिळाला. यावर्षी दोनशे एकरांवर लागवड गेल्यावर्षी प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गावासह परिसरातील शेतकऱ्यांनी देखील मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीचा निर्णय घेतला. मल्चिंग पेपरला मोठी मागणी झाल्याने कागदाला छिद्रे पाडून देण्याची विनंती संबंधित कंपनीलाच करण्यात आली. त्यानुसार यावर्षी दीडहजार बंडलची एकत्रित खरेदी झाली. त्याचा फायदा कागदाची किंमत आणि वाहतूक खर्चाची बचत होण्यात झाला. यावर्षी सुमारे २०० एकरांवर या तंत्रज्ञानानुसार कांदा लागवडीची तयारी झाली आहे. लागवडीविषयी ठळक बाबी
तंत्र वापराचे झाले हे फायदे
अर्थकारण लागवडीपासून ते काढणी पर्यंत विविध टप्प्यांत खते, मजुरी, रोपे, फवारणी, काढणी आदींसाठी एकरी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. एकरी उत्पादन १२ टन व सरासरी १५ ते २० रुपये प्रति किलो दर मिळतो. त्यातून एकरी एक ते दोन लाख रुपयांपुढे उत्पन्न मिळत असल्याचे कांदा उत्पादक कोंडे सांगतात. वीजभारनियमन आणि बिबट्यांपासून बचाव पाटपाण्यावर कांदा उत्पादन घेताना थंडीत रात्री अपरात्री पिकाला पाणी द्यावे लागत होते. जुन्नर तालुका आणि विशेषतः खानापूर, धामणखेल, वडज, पारुंडे, कुसुर हे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे रात्री पाणी देण्यासाठी जायला भीती वाटायची. बिबट्यांचे हल्ले आणि प्रसंगी शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावरील पद्धतीमुळे पाणी देण्याच्या वेळा व वापर पद्धतीत बल झाला. कष्ट कमी झाले. वीजभारनियमन आणि बिबट्याची भीती कमी झाल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. प्रतिक्रिया दरवर्षी एक एकरवर पाटपाण्यावर कांदा लागवड करतो. आमच्या गावात गेल्यावर्षी काही शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. तो पाहून यावर्षी मी देखील त्याच पद्धतीने लागवडीचा निर्णय घेतला आहे. माझे हे पहिलेच वर्ष असून चांगल्या उत्पादनवाढीचा विश्वास आहे. -महेंद्र रोहिदास वर्पे, धामणखेल ९८९०१२७३६६ मी दरवर्षी दोन तीन एकरांवर वर कांदा उत्पादन घेतो. माझ्यागावा शेजारी असणाऱ्या धामणखेल गावात रवी जाधव, राजू कोंडे यांनी गेल्यावर्षी मल्चिंग पेपरवर कांदा लागवड केली होती. त्यांना चांगले उत्पादन मिळाले. ते पाहून यावर्षी मी देखील त्या तंत्रानुसार तीन एकरांवर कांदा उत्पादन घेत आहे. रामभाऊ वाळुंज, खानापूर, ता.जुन्नर ९८६०८५५३१७ संपर्क- राजू कोंडे - ९८५००४९५०७
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.