शेतकऱ्यांच्या खात्रीची, सोयीची जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ

राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ २०१८ मध्ये जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली. त्याची कक्षा विस्तारत असून लवकरच अत्याधुनिक सुविधांसह बाजारपेठ कार्यान्वित होईल. त्यामुळे एक हजार किलोमीटर अंतरावरील कर्नाटकातील रामनगरम येथे कोषविक्रीसाठी जाण्याचा व्याप वाचून आर्थिक बचत साधणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्रीची, सोयीची जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ
रेशीम कोषांचा लिलाव व विक्रीसाठी आलेले शेतकरी.

राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ २०१८ मध्ये जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली. त्याची कक्षा विस्तारत असून लवकरच अत्याधुनिक सुविधांसह बाजारपेठ कार्यान्वित होईल. त्यामुळे एक हजार किलोमीटर अंतरावरील कर्नाटकातील रामनगरम येथे कोषविक्रीसाठी जाण्याचा व्याप वाचून आर्थिक बचत साधणार आहे.   शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची क्षमता असलेला, बागायती पिकांच्या तुलनेत कमी पाणी लागणारा व ताजे उत्पन्न देण्याची शाश्‍वती असलेला रेशीम उद्योग जालना जिल्ह्यात प्रकर्षाने पुढे आला आहे. जिल्ह्यात सुमारे ८०६ शेतकऱ्यांकडे ८०२ एकरांवर तुती लागवड आहे. तुती लागवड व अंडीपुंज वाटपात राज्यात चौथ्या स्थानावर असलेल्या या जिल्ह्यातील घनसावंगी, जालना, परतूर, अंबड, मंठा या तालुक्‍यांत उद्योग झपाट्याने वाढतो आहे. बदनापूर, भोकरदन, जाफराबाद हे तालुकेही उद्योगाच्या कक्षेत कमी अधिक प्रमाणात आहेतच. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये सुमारे एक लाख ६७ हजार ८०० अंडीपुंजांचे वाटप करण्यात आले. तेव्हापासून ८५ हजार ४९७ टन रेशीम कोष उत्पादन झाले. लॉकडाउनच्या काळातही उत्पादन सुरूच होते. राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ २०१८ मध्ये याच जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली. माजी मंत्री तथा विद्यमान बाजार समिती सभापती अर्जुन खोतकर व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा त्यात मोलाचा वाटा राहिला.

नव्या सुविधा जालना येथे राज्य सरकारच्या मंजुरीनुसार रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. सुमारे १३८९ चौरस मीटर क्षेत्रफळात असलेली ही भव्य दुमजली इमारत आहे. कोष खरेदीसाठी भव्य लिलाव हॉल, कोष सुकविण्यासाठी अत्याधुनिक ‘ड्रायर’, साठवणूक सुविधा, कोषांची प्रतवारी ठरविण्यासाठी कोष तपासणी यंत्रणा, शेतकरी प्रशिक्षणासाठी ‘हॉल’, प्रशासकीय इमारत, सभागृह, ई.-नाम कार्यप्रणाली, व्यापाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था आदी सुविधा त्यात असतील. बांधकामासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे रिलिंग युनिट रेशीम कोष बाजारपेठ असलेल्या जालना शहरालगतच सुमारे दोन कोटी रुपये किमतीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वयंचलित ‘रिलिंग मशिनची उभारणी करण्यात आली आहे. त्यातून रोजगार मिळाला असून पैठणीसाठी आवश्‍यक उच्च दर्जाचे सूत तयार होत आहे. सन २०२० मध्ये देवमूर्ती येथील एका उद्योगातर्फे ७९१७३ किलो रेशीम कोष खरेदी करण्यात आली. पैकी सुमारे साडेपाच हजार किलोपर्यंत सूत उत्पादन करण्यात आले.   रेशीम कोष खरेदी -विक्री वर्ष..       . शेतकरी.... विक्री (टन)      रक्‍कम रु.(कोटी) २०१८-१९     २५२५    १५२                 ३. ६५ २०१९- २०    ३८७२     ३१७              १०. ६६ २०२०-२१      ४८७२    ४२९               ११. ९३ २०२१-२२     ३०७९      २७३              ११. ४१ (नोव्हेंबर अखेर) रेशीम कोष बाजार समिती- ठळक बाबी

 • शेतकऱ्यांसाठी कोणतेही शुल्क नाही.
 • प्रतिदिन तीन टनांपर्यंत व सहा ते सात जिल्ह्यांतून आवक
 • सहा ते दहा व्यापाऱ्यांचा लिलावात सहभाग. पारदर्शक प्रक्रिया.
 • प्रतिदिन सरासरी ४० शेतकरी घेऊन येतात कोष.
 • यंदा प्रति किलो सरासरी ४१८ रु. तर सर्वाधिक ७८० रुपये दर.
 • बाजार समितीत कोष सुकवणी यंत्राची सोय.
 • स्वच्छतेसाठी घेतली जाते विशेष खबरदारी
 • ३०० रुपये प्रति किलोपेक्षा कमी दर आल्यास शासन अनुदानाची सोय.
 • २४ तासांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाइन पेमेंट जमा करण्याची सोय
 • कोरोना काळात आगाऊ ऑनलाइन नोंदणी घेऊन शेतकऱ्यांना माल विक्रीची केली सोय.
 •  प्रतिक्रिया सन २०१७ पासून रेशीम उद्योग करतो आहे. साडेतीन एकर तुती आहे. दरवर्षी चार ते पाच बॅचेस घेतो. जालना येथे बाजारपेठ सुरू झाल्याने उत्साह वाढला आहे. इथल्या सुविधा पाहून आणखी दोन एकर तुती वाढवावीशी वाटते आहे. -सचिदानंद केदार परसोडा, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा   सन २०१५ पासून रेशीम उद्योगात आहे. वर्षभरात एकूण दोन क्‍विंटलपर्यंत कोष उत्पादन घेतो. जालना बाजार समितीत पैसे वेळेत व ऑनलाइन मिळतात. या उद्योगामुळे जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. दूरच्या अंतरावरील कर्नाटकातील रामनगरम येथे जाण्याचा त्रास व पैसे यात बचत होत आहे. -पांडुरंग निंबाळकर कडेगाव, ता. बदनापूर ऑनलाइन आगाऊ नोंदणी करण्याची सोय असल्याने आम्हा शेतकऱ्यांना जालना येथील बाजारपेठेत कोणतीही अडचण होत नाही. चोवीस तासांत पैसे मिळतात. -बबन साबळे वालसा डावरगाव, ता. भोकरदन कवच टक्‍केवारी व गुणवत्ता निकष तपासून १०० टक्‍के कोष खरेदी करण्याची व्यवस्था तसेच स्वयंचलित यंत्राद्वारे कोष वाळवून देण्याची सोय उपलब्ध करणार आहोत. -अजय मोहिते-८२०८३५४७९९ रेशीम विकास अधिकारी, जालना लिलावापूर्वी शेतकऱ्यांची नोंदणी घेतली जाते. त्यानंतर लिलाव पावती दिली जाते. साधारणतः सकाळी साडेअकराच्या सुमारास लिलाव सुरू होतो. बाजार समितीचे कर्मचारी ही प्रक्रिया पार पाडताना पारदर्शकतेविषयी विशेष खबरदारी घेतात. राज्याच्या विविध भागांतून तीन हजारांवर शेतकरी आजवर बाजारपेठेत आपले कोष विक्रीसाठी घेऊन आले आहेत. -भरत जायभाये- ९७६४७०६६५२ रेशीम कोष खरेदी नियंत्रण कर्मचारी

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.