
एकच पीक पद्धतीत नैसर्गिक आपत्ती वा कोरोनासारख्या संकटात मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे वर्षभर बहुविध पीक पद्धती निवडून (द्राक्षे, डाळिंब, कारले, टोमॅटो) राहुल रसाळ यांनी ही जोखीम कमी केली आहे. त्यातून खेळते भांडवल व रोजचे ताजे उत्पन्न सुरू राहते. अर्थात, आर्थिक गणित पावसावर अवलंबून असते. प्रत्येक पिकात सरासरी किमान एक ते दोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. शेतमालाचा ‘विंडो पीरियड’ सांभाळल्याने दर चांगले मिळतात. जागेवर येऊन व्यापारी खरेदी करतात. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या विभागानुसार पीक पद्धतीचा ‘पॅटर्न’ आखला पाहिजे, असे राहुल सांगतात. लाल रंगाची पिके राहुल सांगतात, की द्राक्षे, डाळिंब व टोमॅटो ही लाल रंगाची पिके आहेत. अशा फळांमध्ये ‘ॲटिऑक्सिडंट्स’ घटक चांगले असून, त्यात प्रतिकारक गुणधर्म असतात. क्रिमसन रेड हे द्राक्ष वाण कर्करोगाला प्रतिकारक आहे. जगभरातील संशोधन प्रबंधांमधून याबाबत माहिती उपलब्ध आहे. ग्राहकही ते वाचत असतो आणि त्यादृष्टीने या शेतीमालाचे महत्त्व वाढत असते. द्राक्षे
‘सबसरफेस इरिगेशन’चे झालेले फायदे
क्रिमसन सीडलेस वाणच का?
उत्पादकता
करटुलीचे आंतरपीक नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाचे नुकसान मोठे होते. खर्चही जास्त असतो. तो भरून काढण्यासाठी करटुली या रानभाजीचे आंतरपीक घेण्यात येते. कंद स्वरूपात मेमध्ये द्राक्ष बागेत सुमारे १० बाय ५ फुटांवर लागवड होते. एकदा लागवडीनंतर कंद ७ ते ९ वर्षे शेतात राहू शकतो. दरवर्षी नवी लागवड करण्याची गरज नाही. सुमारे महिनाभरानंतर उत्पादन सुरू होते. शक्यतो ऑक्टोबर छाटणीपर्यंत उत्पादन घेतले जाते. त्यानंतर सारे लक्ष द्राक्षावर केंद्रित करता येते. तशी करटुली नोव्हेंबरपर्यंत किंवा तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत असेल तोपर्यंतही घेता येते. पुढे हे पीक सुप्तावस्थेत जाते. हंगामात आठवड्यातून दोन वेळा किंवा दर दोन -तीन दिवसांनी करटुलीची काढणी होते. राहुल म्हणतात, की करटुली हे शेतकऱ्यांचे नियमित वा सरावाचे पीक नाही. नर व मादी रोपे वेगवेगळी असतात. ती ओळखू यावी लागतात. अलीकडे मात्र अनेकांनी लागवड सुरू केली आहे. मधुमेह, कर्करोग यांना प्रतिबंध करण्याचे गुणधर्म करटुलीत आहेत. एकरी एक हजारापर्यंत झाडे असल्यास दोन टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यास मुंबई ही चांगली बाजारपेठ असून, व्यापारी जागेवरून घेऊन जातात. १०० ते १५० रुपये प्रति किलो दर मिळतो. एकरी दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते. संपर्क- राहुल रसाळ, ९७६६५५०६२४
उद्याच्या भागात- तेलकट डागविरहित डाळिंब व हुकमी कारले
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.