Bee Keeping : विजय महाजन यशस्वी मधमाशीपालन उद्योजक कसे बनले?

पुणे शहरातील तळेगाव दाभाडे येथील विजय महाजन यांनी शास्त्रशुद्ध प्रशिक्षणातून मधमाशीपालन सुरू केले. अनेक वर्षांचे सातत्य, कष्ट व धडपडीतून उद्योगाचा विस्तार साधला.
Beekeeping Business Success Story
Beekeeping Business Success StoryAgrowon

Beekeeping Business Success Story: पुणे शहरातील तळेगाव दाभाडे या उपनगरातील (ता. मावळ) यांची ओळख आज यशस्वी मधमाशीपालन उद्योजक अशी झाली आहे. त्यांचा प्रवास रंजक आहे.

त्यांनी १९७० मध्ये गिरिभ्रमण नावाची संस्था स्थापन केली. गड, किल्ले भ्रमण आणि मुलांना घेऊन ट्रेकिंग, ‘रिव्हर क्रॉसिंग’ आदींचे प्रशिक्षण ते देत. त्या वेळी मधमाश्‍या व मधाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले. काही ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने व मधमाश्‍यांना हानी पोहोचवून मध संकलन केले जात असल्याचे आढळले.

त्यातून त्यांना शास्त्रीय पद्धतीने मधमाशीपालन करण्याची कल्पना सुचली. सन १९९७ च्या दरम्यान पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन संस्थेत रीतसर प्रशिक्षण घेतले.

संबंधित विविध ठिकाणी भेटी दिल्या. ‘रूडसेट’ (सातारा) येथील संस्थेतही प्रशिक्षण घेतले. खादी ग्रामोद्योग विभागाकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेत २५ मधपेट्यांची खरेदी व एकूण ३५ पेट्यांद्वारे मधमाशीपालन सुरू केले.

पेट्या सुरवातीला घराजवळच ठेवल्या जायच्या. टप्प्याटप्प्याने अनुभव, कौशल्यवृद्धी व परिश्रमातून व्यवसाय चांगलाच विस्तारला.

Beekeeping Business Success Story
Honey : मध पंचामृतातील एक अमृत

आजचा व्यवसाय दृष्टिक्षेपात

-एपीस मेलिफेरा (इटालियन), सातेरी, ट्रायगोना आदी मधमाश्‍यांचे पालन.

-सद्य:स्थितीत १३० पेट्या.

-पाच ते सहा कामगारांचे बळ. हंगामात मधपेट्यांचे स्थलांतर, मधकाढणी, परागकण संकलन, वसाहतींची निगराणी, मधमाश्‍यांचे रोग, उपाययोजना अशी कामे त्यांच्याकडून होतात.

-फुलोरा व मधसंकलनासाठी पेट्या स्थलांतर हंगाम फेब्रुवारी ते मे.

-जालना, औरंगाबाद- कडुनिंब

-पुणे-मावळ- जांभूळ, हिरडा, बेहडा व जंगली झाडे

-सर्वेक्षण करून फुलोरा उपलब्धता. त्यासाठी पूर्वनियोजन.

-एखाद्या पेटीत मधमाशांचा अधिवास जास्त झाल्यास ऑक्टोबरमध्ये विभागणी.

-वेळोवेळी वसाहतींची स्वच्छता

-फुलोरा कमी असताना पर्यायी खाद्य- साखरपाणी

‘मार्केट’

- वर्षभर सुमारे २० टन मध संकलित. ७० टक्के जागेवरच विक्री. स्वतःचे आउटलेट.

-‘शिवसागर मावळ हनी’ ब्रॅण्ड. २०० ते ५०० ग्रॅम, एक किलो बरण्यांमधून विक्री

-स्थानिक ग्राहकांसह आयुर्वेदिक डॉक्टर, व्यापारी यांच्याकडून खरेदी. नाशिक, पुणे, डहाणू, मुंबई येथे आगाऊ मागणी.

-फुलोऱ्यानुसार मधाचे दर

फुलोरा – प्रति किलो (रु.)

तुळस, ओवा, आंबा ७००, ‘मिक्स’ ५००, जांभूळ १०००, कडुनिंब व नारळ १२००

अन्य उत्पादने

-मधपेट्यांचा पुरवठा प्रति पेटी ५ ते ७ हजार रुपये. (कॉलनीसह)

- मोहरी, सूर्यफूल, बाजरी, मका, डाळिंब आदींमधून परागकण (पोलन्स) मिळतात. ते संकलित करण्यासाठी ‘पोलन ट्रॅप’ पेटीसमोर बसविले आहेत. त्यातून ४०० किलोपर्यंत संकलन होते.

आरोग्यदायी अन्न म्हणून त्याचे महत्त्व आहे. डॉक्टरांकडून खरेदी होते. दोन हजार रुपये प्रति किलो दर मिळतो.

-हनी कोंब, मेण, व पोळ्याच्या स्वरूपातील लवचिक भागाची प्रक्रिया न करता चॉकलेटच्या तुकड्याप्रमाणे काढून प्रति किलो ५०० रुपये प्रमाणे विक्री.

-आयुर्वेदिक शाखेतील विद्यार्थ्यांकडून शिकण्याच्या दृष्टीने ‘बी व्हेनम’लाही (मधमाश्‍यांचे विष) मागणी.

-व्यवसायातील आजची एकूण वार्षिक उलाढाल ३० लाखांपर्यंत.

मधावर प्रक्रिया

मधावर प्रक्रिया करणारे यंत्र महाजन यांनी आपल्या कल्पनेतून साडेतीन लाख रुपयांत तयार केले आहे. यात ॲश, मेण, माती, परागकण हे घटक मधापासून वेगळे करण्यासाठी प्रक्रिया केली जाते.

४५ अंश से. तापमानात मध बाजूला होतो, तर ६५ अंश से. तापमानास पातळ होऊन ‘फिल्टर’मधून बाहेर येतो. दोन दिवस थंड केल्यानंतर पॅकिंग होते.

महाजन झाले प्रशिक्षक

मधमाश्‍यांचा अधिवास टिकवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शेतकरी व इच्छुकांना परागीभवन, माशांची हाताळणी करताना घ्यावयाची काळजी, कीडनाशक फवारणी व एकूणच व्यवसायाचे इत्थंभूत प्रशिक्षण महाजन देतात.

त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, बिहार, जम्मू-काश्मीर आदी ठिकाणी व्याख्याने देत स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आहे.

Beekeeping Business Success Story
Honey bee : मधमाश्यांच्या वसाहती वाढवल्या पाहिजेत

समस्या :

-फुलोरा लक्षात घेता एका ठिकाणी राहून व्यवसाय करता येत नाही.

- पेट्या स्थलांतराच्या पाच ते सहा खेपांमागे ‘लोडिंग’, ‘अनलोडिंग’ यावर दीड लाख रुपये खर्च होतो. दोन महिने राहण्या-खाण्याचा वेगळा खर्च असतो.

-ऊन, पाऊस, थंडी कशाचीही तमा न बाळगता काम करावे लागते.

विजय महाजन, ९२२६४५८८२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com