Organic Farming : सेंद्रिय शेतीने मिळवली सुपीकतेसोबतच खर्चात बचत

अकोला येथील दिग्रस (बु) (ता. पातूर) येथील राजेंद्र ताले हे शेती शाश्‍वत करण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळले. उत्पादन खर्चात बचतीसोबत बाजारात प्रीमिअम दरही मिळू लागला. कोणत्याही मध्यस्थाविना शेतीमाल विक्रीचे एक मॉडेल त्यांनी बसविले आहे. त्यामुळे शेती फायद्यात राहण्यास मदत होत आहे.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

पातूर तालुक्यातील वाडेगावपासून साधारणपणे पाच कि.मी. अंतरावरील दिग्रस बुद्रुक शिवारात राजेंद्र महादेव ताले यांची शेती (Agriculture) आहे. त्यांच्याकडे सहा एकर शेती असून, संपूर्ण शेतात सिंचनाची सोय (Irrigation Facility) आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपालावर्गीय पिके (Vegetable Crop), फळपिके, हळद (Turmeric) अशी पिके ते घेतात. बहुतांश शेतकरी रासायनिक घटकांचा अनावश्यक आणि अमर्याद वापर करतात. त्यामुळे जमिनीचे आणि माणसाचे आरोग्य धोक्यात येत आहे. १९९९ पासून शेतीत रासायनिक खते (chemical Fertilizer) व कीडनाशकांचा (Pesticide) वापर पूर्णतः बंद केला आहे. सेंद्रिय प्रमाणीकरण प्रमाणपत्र २००६ मध्येच प्राप्त झाले आहे. त्यामुळे उत्पादन खर्च मर्यादित ठेवणे शक्य झाले.

बहूपीक पद्धतीला सेंद्रियची जोड ः

राजेंद्र ताले यांचे शिक्षण केवळ नववीपर्यंत झाले असले तरी आपल्या जिज्ञासू, चिकित्सक आणि प्रयोगशील वृत्तीमुळे शेतीतील अनेक विषयांमध्ये पारंगत झाले आहेत. नवनवीन पिके, पद्धतींचे प्रयोग करून त्यातील चांगले वाईट स्वतः तपासण्याच्या पद्धतीने त्यांचा अनुभव अन्य बोलघेवड्यांच्या तुलनेमध्ये खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरतो.

Organic Farming
Organic Farming : विषमुक्त अन्नधान्यासाठी सेंद्रिय शेती गरजेची

शेती ही निसर्गापेक्षा वेगळी नाही. आपल्या शेतात पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरताना एकल पीक पद्धतीऐवजी एकावेळी अनेक पिके घेण्याकडे त्यांचा कल असतो. सहा एकर शेतीमध्ये ३५ ते ४० प्रकारची पिके. प्रामुख्याने हळद, आले, केळी, पपई, सोयाबीन, हरभरा, ऊस, तूर, वांगी, टोमॅटो, मिरची, भेंडी, अंबाडी, वाल, लिंबू, शेवगा ही पिके. त्यांच्याकडे रोपे आहेत.

काही विशिष्ट प्रकारच्या वनस्पती उदा. स्टिव्हिया (०% कॅलरी साखर) (५० झाडे), आसमंतारा (एक दोन वाफे), भुईनिम (कडुनिंबाच्या २०० पट कडू, ५०० झुडपे), बिग्झा (जैविक रंग, एक झाड), बरसेरा (अत्तर, एक झाड), ड्रॅगन फ्रूट (१० झाडे), हनुमान फळ (२ झाडे), मटारू-गरजफळ (सात वेल), लाल अंबाडी (शेतात पसरून), सहतुती (२ झाडे), चिया, केनवा इ. वनौषधी त्यांच्या शेतात, बांधावर बघायला मिळतात.

Organic Farming
Organic Farming : सेंद्रिय शेतीकडील मार्गक्रमण

वेगवेगळ्या पिकांना जोड म्हणून गावरान कोंबड्या ५० आणि एक गाय व दोन वासरे आहेत. शेतीमाल विक्रीसाठी स्वतःची चारचाकी घेतली असून, त्यातून तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी विक्री केली जाते. मुख्य उत्पादनासोबत नेलेले अन्य छोट्या मोठ्या भाजीपाल्याच्या उत्पन्नातून त्याचा इंधनखर्च भागतो.

केळी पिकातही बसवले उत्पन्नाचे गणित

ताले हे मागील दोन वर्षांपासून केळीचे पीक घेत आहेत. एक एकरात पाच बाय चारवर केळीची १८०० झाडे लावली आहेत. प्रत्येक झाडावर एक घड, त्यावर किमान ८ फण्या, तर एका फणीमध्ये एक ते दीड डझन केळी राहतात. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या या केळीची विक्री ५० रुपये डझन प्रमाणे करतात. केळीची रोपेही स्वतःच तयार केल्याने खर्चात बचत झाली. शिवाय केळीमध्ये गावरान पपईचे आंतरपीकही घेतात. केळीचा पहिलाच हंगाम त्यांना सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देणारा ठरला. आता खोडव्याची बाग उभी आहे. लवकरच या केळीची विक्री सुरू होणार आहे.

Organic Farming
Organic Farming : सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देऊ ः मुख्यमंत्री शिंदे

कुटुंबीयांची साथ ः

आजवर प्रयोग आणि अनुभवातून शेती यशस्वी केली आहे. राजेंद्र यांनी त्यांच्या पत्नी सौ. सुलभा, मुलगा श्रीकांत, मुलगी वैष्णवी आणि आई शकुंतला यांची विविध कामात मदत होते. मुलगा श्रीकांत हा कृषी पदवीधर व एमबीए झाला आहे, तर मुलगी वैष्णवी ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत आहेत. शेतीतील गौरवपूर्ण कामगिरीसाठी त्यांना आतापर्यंत तब्बल १८ पुरस्कार मिळाले. यात प्रामुख्याने वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, चेन्नईच्या स्वामिनाथन फाउंडेशनची फेलोशिप यांचा समावेश आहे. आई व पत्नी लाल अंबाडीचा जाम तयार देतात. त्याची विक्री २४० रुपये किलो प्रमाणे केली जाते.

स्वतःची प्रयोगशीलता ः

सर्व शेती ही सेंद्रिय पद्धतीने करतात. पिकांच्या पोषणासाठी गांडूळ खत, कोंबडी खत, जिवामृत, गोकृपा अमृत अशा विविध सेंद्रिय खतांचा वापर करतात.

कीड, रोगाच्या नियंत्रणासाठी बाजरी पिठाचे द्रावण, लमित (लसूण, मिरची, तंबाखू) अर्क, दशपर्णी अर्क, कळीचा चुना व राख यांचा उपयोग करतात.

पिकांच्या वाढीसाठी गांडूळपाणी (व्हर्मिवॉश), अमिनो आम्ले, नारळ पाणी अशा नैसर्गिक घटकांचा वापर करतात.

शेतमशागतीसाठी सायकल डवरा, पॉवर टिलर, सायकलचलित फवारणी यंत्राचा वापर केला जातो.

या वर्षीचे त्यांनी एका खासगी कंपनीचे फवारणी यंत्र विकत घेतले असून, त्या स्वतःच्या गरजेनुसार नोझलची रचना केली आहे.

गाजर गवत निर्मूलनासाठी त्यांनी गेल्या वर्षी परभणीच्या कृषी विद्यापीठातून मेक्सिकन भुंगे आणून सोडले होते. ही मोहीम त्यांनी स्वखर्चाने राबवली होती.

सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात. यासाठी त्यांच्याकडे नेहमी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, केव्हीकेमधील विविध शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या भेट, प्रशिक्षण सुरू असतात.

ताले यांच्या शेतीची वैशिष्ट्ये ः

सेंद्रिय उत्पादने असल्यामुळे बाजारदरापेक्षा अधिक किमतीने शेतीमाल विकला जातो. कोणत्याही मध्यस्थाविना स्वतः विक्री करत असल्यामुळे अन्य शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये दुपटीने फायदा होतो. सेंद्रिय शेती करायला सुरू केल्यापासून २२ वर्षांत एकाही सबसिडीसाठी अर्ज केलेला नाही. पीक कर्जही घेत नाही. त्यामुळे कोणत्याही बाबतीत कुणाशीही मिंधेपणा नाही.

मागील तीन हंगामांतील खर्च-उत्पन्नाचा ताळेबंद

पीक क्षेत्र

(हेक्टर) खर्च

(रुपये) उत्पादन व विक्री उत्पन्न

(रुपये)

वर्ष २०१९-२०

सोयाबीन १.१ २८,००० २० क्विंटल उत्पादन, दर ३००० प्रति क्विंटल. ६०,०००

हरभरा १.१८ ३२,००० पीकेव्ही हरिता वाण, डाळ व बेसन हिरवे होते. त्याचे ४.५ क्विंटल उत्पादन, दर १०० प्रति किलो. १,९०,०००

हळद ०.२ १०,००० घरगुती बियाण्यांसाठी.

उडीद ०.२ ५००० दोन क्विंटल, दर १५० रुपये प्रति किलो. ३०,०००

मूग ०.२ ५००० २ क्विंटल, दर १५० रुपये प्रति किलो. २५,०००

तूर १.१ २५,००० १६ क्विंटल. त्यातील १० क्विंटल डाळ तयार करून ११० रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री. उर्वरित तूर मार्केटला विकली. १,५०,०००.

एकूण ०० १,०५,००० ०० ४,५५,०००

वर्ष २०२०-२०२१

हळद १.१ ७०,००० ३५ क्विंटल (सुकी), त्यातील २० क्विंटल हळद पावडर तयार करून २४० रु. प्रति किलो दराने विकली. १५ क्विंटल हळद ९५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकली. ५,५२,५००.

अश्‍वगंधा ०.४ १५,००० कमी अनुभवामुळे २.५ क्विंटल, दर ३३००० रुपये प्रति क्विंटल. ४९५००

आले ०.२ ८००० ३ क्विंटल, दर २० हजार प्रति क्विंटल. ५२,०००

केळी ०.४ ४५,००० उत्पादन पुढील वर्षी.

पपई ०.१ १०,००० उत्पादन पुढील वर्षी.

एकूण ०० १,४८,००० ०० ६,५४,०००

वर्ष २०२१-२२

केळी ०.४ १०,००० केळी स्वतः ५० रुपये डझन प्रमाणे सुमारे चार महिन्यांमध्ये विकली. ८,००,०००

पपई ०.१ ३००० स्वतः विक्री केली. ३०,०००

हळद १.१ ७०,००० ३० क्विंटल. त्यातील ५ क्विंटलची हळद पावडर २०० रुपये किलो प्रमाणे विक्री सुरू. आतापर्यंत ६५००० रुपये मिळाले. विक्री सुरू.

राजेंद्र ताले, ९८९०८९५७०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com