Police Bharti News : अन् एकाचवेळी शेतकरी नवऱ्यासोबत कारभारीणही झाली पोलीस भरती

एकीकडे पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने शेतातील काम करण्याचा निर्णय घेतला.
Farmer Couple Police Bharati
Farmer Couple Police BharatiAgrowon

Pune News : असं म्हणतात प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नसते. असाच प्रत्यय आला आहे, शिरूरमधील चांडोह येथील शेतकरी दांम्पत्याला. हे दांम्प्त्य एकाचवेळी पोलीस भरती (Police Bharati) झाले आहे.

शेतात कांदा काढणी (Onion Harvesting) करत असताना भरतीची शेवटची लिस्ट जाहीर झाली आणि दोघांचीही निवड झाली. तुषार शेलार आणि भाग्यश्री शेलार असे या नवरा बायकोचे नाव असून एकाच वेळी पोलीस दलात निवड झाल्याने दोघांही शेतकरी दांमप्त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Farmer Couple Became Police Recruits)

तुषार गेल्या चार वर्षांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता. परंतु त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. एकीकडे पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने शेतातील काम करण्याचा निर्णय घेतला. शेतीच्या कामात पत्नी भाग्यश्रीही साथ देत होती.

Farmer Couple Police Bharati
Success Story : मालेगावच्या मयूरने तयार केले पेरूचा पल्प वेगळे करणारे यंत्र, वापरण्यासही आहे साधेसोपे

याच दरम्यायन, भाग्यश्री हिनेही पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. शेतात खांद्याला खांदा लावून काम करणारे हे शेतकरी दाम्प्त्य एकाच पोलीस भरती झाले. पोलीस भरतीची अंतीम यादी जाहीर झाली, तेव्हा हे दोघेही शेतात कांदा काढणीचे काम करत होते. याचवेळी यादी जाहीर झाली आणि दोघांचीही पोलीस दलात निवड झाली.

Farmer Couple Police Bharati
Farmer Success Story : बांधकाम व्यवसायासोबत मिळवली निर्यातक्षम केळीच्या उत्पादनात ओळख

पोलीस दलातील आपल्या निवडीचा आनंद या दाम्प्त्याने शेतातच साजरा केला. लग्न झाल्यापासून केवळ पोलीस भरतीचाच ध्यास घेतलेल्या या दांपत्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आनंदाच्या भरात तुषारने पत्नीला चक्क उचलून घेत जल्लोष केला.

Farmer Couple Police Bharati
Onion Subsidy : सरसकट कांदा अनुदानासाठी शेतकऱ्यांचा तहसीलवर मोर्चा

अन् पोलीस भरतीचं स्वप्न साकार झालं

तुषार आणि भाग्यश्री विवाह १७ जून २०२० ला झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातील तुषारचे पोलीस दलात नोकरी करण्याचे स्वप्न होते. त्यासाठी लग्नाआधीपासून तो सराव करीत होता. कठोर मेहनत घेत होता.

सातत्यपूर्ण व्यायामाबरोबरच अभ्यासावर लक्ष केंद्रित करूनही अपयश येत असल्याने तो काहीसा खचला होता. विवाह होऊन भाग्यश्री ही अर्धांगिनी म्हणून त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे भाग्यच उजळले.

दरम्यान, पतीची मानसिकता समजून घेत पत्नीने त्याला सर्वतोपरी खंबीर साथ दिली. इतकेच नव्हे तर स्वतःदेखील पोलीस होण्यासाठी पतीच्या मैदानात उतरली. कौटुंबीक आनंदाचा काहीसा अव्हेर करीत या नवदांपत्याने व्यायाम, अभ्यास आणि कठोर मेहनतीने पोलीस भरतीचा सराव केला आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळवत आपले स्वप्न साकार केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com