Spices Production : हळद पावडरीसह शेतकरी गटाचा मसाले निर्मिती उद्योग

बुलडाणा जिल्ह्यात मकरध्वज खंडाळा येथील पैनगंगा शेती उत्पादक व प्रक्रिया उद्योग शेतकरी गटाने हळद पावडर निर्मिती व विक्रीव्यवस्थेतून चांगली उलाढाल केली. त्यातून आत्मविश्‍वास आल्याने गटाने धणा, मिरची पावडरींसह गरम व काळा मसाला उत्पादन सुरू करून उद्योगाचे विस्तारीकरण साधले आहे. थेट शेतकऱ्यांकडून कच्च्या मालाची खरेदी होत असल्याने त्यांनाही दरांचा लाभ मिळणे शक्य झाले आहे.
Spices Production
Spices ProductionAgrowon

बुलडाणा हा प्रयोगशील व प्रयत्नवादी शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा येथे पैनगंगा शेती उत्पादक व प्रक्रिया उद्योग (Processing Industry) शेतकरी गट (Farmer Group) कार्यरत आहे. शेतकऱ्यांचे संघटन व त्यांना आर्थिक बळकट करण्याच्या उद्देशाने २०१७ मध्ये गटाची स्थापना झाली. त्याचे २० संचालक असून, सचिन गोविंदराव देशमुख अध्यक्ष आहेत.

Spices Production
Spices : शेतकरी कंपनीद्वारे मसाल्यांना दिली बाजारपेठ

गटाचे प्रामाणिक प्रयत्न पाहून कृषी विभागानेही (Agriculture Department) योजनांच्या माध्यमातून सातत्याने पाठबळ दिले. शेतीमालाचे मूल्यवर्धन केल्यास अधिक पैसा हाती येऊ शकतो हे ओळखून गटाने प्रक्रिया उद्योगात प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याचा उद्देशही त्यातून पूर्ण होणार होता. हळद पावडर (Turmeric Powder )निर्मितीपासून सुरुवात झाली. त्यापुढील पाऊल म्हणून अलीकडेच धणे, मिरची पावडरसहित काळा व गरम मसाला निर्मिती (Spices Production) सुरू केली आहे.

थेट शेतकऱ्यांकडून खरेदी

परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांकडून कच्च्या मालाची थेट खरेदी होते. बाजारपेठेतील दरांपेक्षा क्विंटलला ५०० ते एक हजार रुपये दर अधिक दिला जातो. बियाणे तसेच प्रात्यक्षिके, तज्ज्ञांचे मार्गदर्शनही उपलब्ध केले जाते. शेतकऱ्यांसोबत करार करून प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची उपलब्धता सुद्धा करून घेतली जात आहे. काही शेतकऱ्यांना धण्याचे बियाणे देण्यात येते. काही शेतकरी हरभरा पिकात धण्याची लागवड करतात. त्यांना एकरी दोन ते तीन क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. त्यांच्याकडूनही खरेदी होते. या वर्षी ७००० रुपये प्रति क्विंटल दर देण्याचा करार करण्यात आला. आजमितीला गटाशी दोनशेपर्यंत शेतकरी जोडले गेले आहेत.

Spices Production
Spice congress: जागतिक मसाला संमेलन फेब्रुवारीत नवी मुंबईत

प्रक्रिया युनिट उभारणी

मसाला उद्योग उभारण्याचे निश्चित केल्यानंतर चिखली तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे व तेथून बुलडाणा जिल्हा आत्मा प्रकल्प संचालकांकडे प्रस्ताव गेला. ३० जानेवारी २०१८ मध्ये त्यास मंजुरी दिली. त्यानंतर गटाचे काम सुरू झाले. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनातून गोदाम उभारणी, यंत्रांची जुळवाजुळव, पॅकेजिंग साहित्य उपलब्ध करण्यात आले.

गटाने पाचशे रुपयांचा ‘शेअर’ तयार केला आहे. सुमारे ३१० भागधारक बनले असून, त्यातून भांडवल उभारणीचे काम सुरू आहे. चिखली येथील औद्योगिक वसाहतीत प्रक्रिया युनिट उभारले आहे. सुमारे ७० लाख रुपयांचे अनुदान मिळाले असून, त्यातून मोठे गोदाम, यंत्रांची उपलब्धता करण्यात आली.

Spices Production
Spices Production: मसाला निर्मितीमध्ये ‘संस्कृती’ची ओळख

यंत्रांमध्ये प्रामुख्याने ‘पल्वरायझर’, मोठा मिक्सर, मिरची कांडण, पॅकेजिंग’ यंत्र आदींचा समावेश आहे. मसाले तयार करण्यासाठी स्वतंत्र यंत्र आहे. युनिटच्या आवारात सौर वाळवणी यंत्र (ड्रायर) आहे. यामध्ये धणे, हिरवी मिरची, लसूण हे विशिष्ट तापमानात सुकवण्यात येतात. हळदीतील उतारा शोधण्यासाठीही या यंत्राचा वापर होतो. लाल मिरची पावडर तयार करण्यासाठी ती सूर्यप्रकाशात वाळवली जाते. यासाठी आवारात स्वतंत्र व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ओल्या हळदीवर शिजवणे, ‘पॉलिशिंग’ आदी प्रक्रिया केल्या जातात.

पॅकेजिंग’ व विक्रीव्यवस्था

उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘पैनगंगा’ ब्रॅण्ड तयार करण्यात आला असून, सर्व प्रकारच्या ग्राहकांना समोर ठेवून दहा ग्रॅम ते अर्धा किलो वजनाचे आकर्षक पॅकिंग तयार करण्यात आले आहे ‘फूड सेफ्टी’सह विक्रीसाठी आवश्‍यक सर्व परवाने व प्रमाणपत्रे घेण्यात आली आहे. सध्या ३०० क्विंटल हळद, मिरची ५० क्विंटल, धने २० क्विंटल यांची साठवणूक केली आहे. बुलडाणा जिल्ह्यासह अकोला, वाशीम, अमरावती तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये उत्पादनांची विक्री रिटेल व वितरक अशा माध्यमांतून केली जाते. गटाकडे दोन चारचाकी वाहनेही सुद्धा आहेत. प्रत्येक तालुक्यात दुचाकीद्वारे काही तरुणांमार्फत दुकानदारांना थेट माल पोच करण्यात येतो. त्यातून रोजगार निर्मितीही केली आहे.

उलाढाल

गटाच्या पुढाकाराने सन २०२०-२१ मध्ये सुमारे सहा हजार क्विंटल ओली हळद ८०० ते १३५० रुपये प्रति क्विंटल दराने प्रतिक्विंटल खरेदी करण्यात आली. कोरोना काळात बाजारपेठा बंद होत्या. त्या काळात हळदीला मागणी चांगली वाढली होती. गटाने ही संधी ओळखून हळकुंड व हळद पावडर यांच्या विक्रीतून सुमारे ५२ लाख ४० हजार १५७ रुपयांची यशस्वी उलाढाल केली. पुढील वर्षी हळदीची साडेसात हजार क्विंटल खरेदी होऊन उलाढालही ७० लाखांवर पोहोचली. आज मसाले विक्रीसाठी याच हळद विक्रीचा अनुभव व खरेदीदारांचा उपयोग होत आहे. सध्या प्रति दिन दोन क्विंटलपर्यंत मसाला विक्री होत असल्याचे गटाचे अध्यक्ष श्री. देशमुख यांनी सांगितले.

- सचिन देशमुख, ९८२२२७२१७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com