सूर्यवंशी बंधूंनी साधली फळबागांतून प्रगती

वडिलोपार्जित शेतीत वीस वर्षे अतोनात कष्ट उपसून पिंपळगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील सूर्यवंशी कुटुंबाने उल्लेखनीय कौटुंबिक व आर्थिक प्रगती साधली आहे.
Fruit Crop Farming
Fruit Crop FarmingAgrowon

वडिलोपार्जित शेतीत वीस वर्षे अतोनात कष्ट उपसून पिंपळगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील सूर्यवंशी कुटुंबाने उल्लेखनीय कौटुंबिक व आर्थिक प्रगती साधली आहे. मोसंबी, डाळिंबाची चांगली शेती करण्याबरोबर आता जांभूळ, सीताफळाची कासही धरली आहे. बाजारपेठांचा अभ्यास करून विक्री व्यवस्थाही सक्षम केली आहे.

Fruit Crop Farming
फळबाग, शेळीपालनातून शेतीचे स्वप्न साकार....

पिंपळगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील प्रल्हादराव नाथा पाटील सूर्यवंशी व बंधू अर्जूनराव
यांच्या एकत्रित कुटुंबाची वडिलोपार्जित ३५ एकर शेती होती. वडील व आई सौ. सुभद्राबाई दोघेही काटकसरीने संसाराचा गाडा रेटीत शेतीत कष्ट करीत. गावातील इतरांची शेती बटाईने करून उत्पन्नात भर घालण्याचा ते प्रयत्न करीत. दहावीचे शिक्षण झाल्यानंतर दोघा बंधूंनी शेतीतच काम करायला सुरूवात केली. पीकपद्धतीत बदल करतांना टोमॅटो, भेंडी, कोबी, कारले आदी पिके निवडली.
दोन ते पाच एकरांपर्यंत हे क्षेत्र असायचे. ‘वाल्मी’ संस्था, कृषी विद्यापीठ यांच्या सहवासातून
व अभ्यासातून त्यांनी शेती प्रगत करण्यावर भर दिला. विविध बाजारपेठांचा आढावा घेऊन विक्रीचे तंत्र अवलंबिले. मुंबईच्या बाजारपेठेत त्या वेळी ते शेतीमाल पाठवायचे. द्राक्ष व ऊसपीकही घेतले. वडिलांप्रमाणे काटकसरीचे सूत्र स्वीकारण्यासह शेतीक्षेत्रात वाढ करण्याचा प्रयत्न केला.
आजघडीला त्यांच्या एकत्र कुटुंबात जवळपास शंभर एकरांपेक्षा जास्त शेती आहे.

शेतीचे व्यवस्थापन

वाढती मजूरटंचाई पाहता सूर्यवंशी बंधू आता यांत्रिकीकरणाकडे वळले आहेत. मोसंबी हे तसे पूर्वापार चालत आलेले फळपीक. दुष्काळात अनेकदा बागा काढाव्याही लागल्या. तरीही संघर्ष सुरू आहे. डाळिंबाचीही कास धरली. सध्या १४ एकरांपर्यंत डाळिंब आहे. या दोन पिकांना जोड म्हणून
तीन एकर जांभूळ व चार एकरांवर केसर आंब्याची लागवड केली आहे. जमीन सुपीक राहावी म्हणून शेणखत व स्लरीचा वापर करण्यावर भर असतो. फळपिकांना एकरी ४ ते ५ ट्रॉली शेणखत व
४ ते ५ वेळा शेणस्लरी देण्यात येते. विविध बाजारपेठांमधील दरांचा आढावा घेऊन
तेथे प्रत्यक्ष जाऊन विक्रीला प्राधान्य दिले आहे. डाळिंबाची विक्री नाशिक व सोलापूर येथील बाजारपेठेत तर मोसंबीची पुणे, मुंबई आदी बाजारपेठांत विक्री होते.

मुलांच्या शिक्षणावर भर

सूर्यवंशी बंधूंनी शेती कसत असताना मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित केले. पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या शिक्षण घेऊन पायावर उभे राहण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण केली. औरंगाबाद-बीड मार्गालगत असलेल्या शेतात २०१४ मध्ये कुटुंबाने पेट्रोल पंप उभारला आहे. सन २०१९ मध्ये पेपर मिलची उभारणी केली. कुटुंबातील नवी पिढीही शेतीत प्रगतिपथावर आहे.

Fruit Crop Farming
Horticulture : वयाच्या शहात्तरीत समृध्द फळबाग, लाखीबाग

शेतातील ठळक बाबी

-पाण्याची शाश्‍वत सोय करण्यासाठी सात विहिरी आहेत. अडीच ते तीन एकरांत मिळून शेततळी उभारली आहेत. सात किलोमीटर अंतरावरील सुखना नदीवरील धरणाखाली पाच गुंठे जमीन घेऊन
विहिर खोदून पाइपलाइनद्वारे पाणी शेतात आणले आहे. पाऊस चांगला झाला तर जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च, एप्रिलपर्यंत पाण्याची व्यवस्था होते.
-शेतातील मध्यभागातून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी ठिकठिकाणी अडवून जिरविण्याचे काम.
-शेणखत व स्लरीच्या वापराने रासायनिक खतांवरील खर्च झाला कमी.
- प्रत्येकी ३० एकरांवर कपाशी व सोयाबीन.
-सहा स्थानिक देशी गायींसह गीर गायीचा आधार. चार बैलही दिमतीला.
-बांधावर सागवानाची ४०० झाडे.
-एकूण क्षेत्रापैकी ५० ते ५५ एकर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली.
-डाळिंबाचे एकरी ५ ते ६ टन तर मोसंबीचे ७ ते ८ टन उत्पादन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com