Goat Farming : शेळीपालनाला मिळाली सोशल मीडियाची साथ...

उज्वला यांचे पती शशिकांत हे डेक्कन मिलमध्ये वायरिंगचे काम करत होते. डेक्कन मिल बंद झाल्यानंतर त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिला.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

Agriculture Success Story : नेज (ता. हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सौ. उज्वला चव्हाण यांनी कुटुंबीयांच्या साथीने गेल्या बारा वर्षापासून पंजाबी बिटल्स जातीची शेळी (Beetal Goat) आणि बोकडाचे यशस्वी व्यवस्थापन (Goat Farming Management) करून आर्थिक उन्नती साधली आहे.

शेळी व बोकडाची सोशल मीडियाद्वारे विक्री करून त्यांनी या व्यवसायात स्थिरता मिळवली आहे. शेळीपालनाबरोबरच कुक्कुटपालन (Poultry Farming) करून ताजा पैसा मिळवण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. शेळीपालनासाठी भाड्याच्या जागेत त्यांनी पत्रावजा शेड उभे केले आहे.

उज्वला यांचे पती शशिकांत हे डेक्कन मिलमध्ये वायरिंगचे काम करत होते. डेक्कन मिल बंद झाल्यानंतर त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिला. घरची केवळ १३ गुंठे शेती यात काय करायचे असाही प्रश्न होता.

शेळीपालनाचा पर्याय त्यांनी निवडला. एका शेळी पासून सुरू झालेला हा व्यवसाय अनेक अडचणींचा सामना करत ४० शेळ्यांपर्यंत पर्यंत जाऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे घरचे सर्व जण यात सहभागी आहेत.

Goat Farming
Goat Farming : शेतकरी नियोजनः शेळीपालन

मंगलाताई दिवसभर थांबून गोठ्याचे व्यवस्‍थापन करतात. पती शशिकांत चाऱ्याची व्यवस्था करतात. सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व कुटुंब गोठ्यात असते. एकत्रित रित्या काम करत असल्याने शेळ्या वर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले आहे.

सुरवातीच्या काळात मार्केटिंगसाठी खूप प्रयत्न करावे लागले. कुटुंबातील सदस्यांच्या साहाय्याने स्थानिक जनावरे बाजारात बोकडांची विक्री केली जात असे. या बाजारात संपर्क झालेले काही लोक शेडवरून येऊन शेळ्या घेऊन जात. यानंतर त्यांनी विक्रीच्या पद्धतीत बदल केला.

गौरव व अभिजित ही दोन मुले आता विक्रीचे नियोजन करतात. मुलांच्या मदतीने त्यांनी सोशल मीडिया वरून शेळी, बोकडाच्या विक्रीस त्यांनी प्राधान्य दिले. नवीन पिले झाल्यानंतर तातडीने फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. यातून बाहेरचे ग्राहक मिळवले जातात.

राज्यभरातील ग्राहकांना हातकणंगले व मिरज रेल्वे स्थानकावरून शेळ्या, बोकड पाठवले जातात. पहिल्यांदा ग्राहकाकडून पाच हजार रुपयांचे टोकन घेतले जाते. ग्राहकाला शेळी, बोकड पाठवत असल्याचे छायाचित्र पाठवले जाते.

Goat Farming
Goat Farming : शेतकरी नियोजन- शेळीपालन

तिकिटाचे फोटोही पाठवले जातात. यानंतर ग्राहक पैसे ट्रान्स्फर करतो. पैसे मिळाल्यानंतर शेळी, बोकड रेल्वेतून पाठवले जातात. सोशल मीडिया हा त्यांच्या शेळ्यांच्या विक्रीचा प्रमुख मार्ग आहे.

अतिशय साधे राहणीमान उज्वलाताईंचे आहे. पतीची नोकरी गेल्यानंतर त्यांनी अतिशय कष्‍टाने त्यांनी संसार उभारला.

सध्या व्यवसाय स्थिरावला आहे. कष्‍टाशिवाय पर्याय नसल्याचे त्या सांगतात. शेळीपालना बरोबरच पूरक व्यवसाय म्हणून शेडमध्येच पन्नास गावठी कोंबड्यांचे त्यांनी संगोपन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com