हिरव्या मिरचीची पुणे मार्केटमध्ये मोठी उलाढाल

या बाजार समितीत विविध वाणांची परराज्य व राज्यातून आवक होत वार्षिक उलाढाल ५० कोटींच्याही पुढे पोहोचली आहे.
Chilli Market
Chilli MarketAgrowon

पुणे गुलटेकडी बाजार समितीत (Market committee) मिरचीला वर्षभर मागणी असते. सध्या चांगले दर मिळत असून,
पुढील काही महिने ते टिकून राहणार असल्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतात. या बाजार समितीत विविध वाणांची परराज्य व राज्यातून आवक होत वार्षिक उलाढाल ५० कोटींच्याही पुढे पोहोचली आहे.
सध्या तीव्र उन्हाळ्याचा काळ सुरू आहे. पुणे- गुलटेकडी (Pune - Gultekadi) येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीमध्ये बाजारात बहुतांशी फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मिरचीही (Chili) त्यास अपवाद नाही. वर्षभरात दर कमी- अधिक होत असले तरी चालू वर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये सर्वाधिक प्रति किलो ८० ते १०० रुपये दर मिरचीला (C मिळाला. सध्या मार्केटमध्ये परराज्यांतून दररोज ८ ते १० गाड्यांची आवक सुरू असून, दरही चांगले मिळत आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये पश्‍चिम महाराष्ट्रासह, मराठवाड्यात मुसळधार पाऊस (Rain) झाला. डिसेंबर, जानेवारीत अवकाळी परिस्थिती तयार झाली. मिरचीचे मोठे नुकसान झाले. परिणामी, बाजारातील आवक कमी झाली.

आवक परिस्थिती

पुणे हे राज्यातील मोठ्या मार्केटपैकी (Market) असल्याने येथे राज्यभरातील शेतकरी माल घेऊन येतात.
जून ते नोव्हेंबर कालावधीत मराठवाडा व विदर्भातून मोठी आवक असते. डिसेंबर ते मे कालावधीत परराज्यांतील हवेरी (कर्नाटक), गुंटूर, दिल्ली, मध्य प्रदेश या भागांतून ८० टक्के आवक होते. सध्या मिरचीचे विविध वाण कंपन्यांनी विकसित केले आहेत. त्यामुळे त्यांची विविधता दिसून येते. परराज्यांतून आवक होणाऱ्या काळ्या मिरचीला (Black Chili) सध्या प्रति किलो ५५ ते ६० रुपये दर मिळत आहे. दररोज १० ते १२ गाड्या आवक होते. या वाणाची लांबी कमी, रंग हिरवा, वजनदार व चमक जास्त आह. तिखटही जास्त आहे. मागणी चांगली आहे. मसाल्यासाठी वापर होतो. निर्यातीसाठीही तिचे महत्त्व आहे. आवकेतील अन्य एका वाणाची लांबी थोडी जास्त, बऱ्यापैकी वजनदार, कमी तिखट, चमक थोडी कमी- अधिक आहे. पहिल्या वाणाच्या तुलनेत मागणी कमी आहे. निर्यात (Export) नाही, मात्र स्थानिक बाजारात बऱ्यापैकी मागणी आहे. यासही ५० ते ६० रुपये दर असून, दररोज २ ते ३ गाड्या आवक होते. तिसरे वाण कमी तिखट असून, त्याचा लोणच्यासाठी वापर होतो. त्यास ४० ते ४५ रुपये दर मिळतो. पुणे शहर, जिल्ह्यासह सातारा, कऱ्हाड, वाई, बुलडाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, कोलकाता, पश्‍चिम बंगाल आदी भागांतही मिरची पाठवण्याची व्यवस्था केली जाते.

दर व कालावधी

कालावधी --- आवक (गाड्या संख्या) --- सरासरी दर (रु.) प्रति किलो
जुलै ते सप्टेंबर --- १२ ते १३ --- २० ते ३०
ऑक्टोबर ते डिसेंबर ८ ते १० - ३० ते ४०
जानेवारी ते जून ५ ते ६ ५० -६०

उलाढाल

-पुणे मार्केटमध्ये वर्षभर प्रति किलो सरासरी दर- ३० ते ४० रुपये.
वर्ष आवक सरासरी दर(रु.) उलाढाल सुमारे (रु.)
२०१७-१८ --- ३,०२,०५४ --- ३००० --- ९० कोटी ६१ लाख ६२ हजार
२०१८-१९ --- ३,०९,८२७ --- २५०० --- ७७ कोटी ४५ लाख ६७ हजार
२०१९-२० --- ३,११,४५८ --- २४५० --- ७६ कोटी ३० लाख ७२ हजार
२०२०-२१ --- १,७८,८८५ --- २८६५ --- ५१ कोटी २५ लाख ५ हजार

-आवक व दर प्रति क्विंटलमध्ये -स्रोत- गुलटेकडी बाजार समिती, पुणे

शेतकरी अनुभव
शरद गायकवाड व मित्र गणेश मोरे केडगाव (ता. दौंड. जि. पुणे) आठ- दहा वर्षांपासून मिरची
घेत आहेत. प्रतिकूल हवामानात चांगल्या प्रकारे येणारे, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी असलेले वाण त्यांनी निवडले आहे. मार्केटमध्ये त्यास चांगली मागणी आहे. ही मिरची तोडणीसाठी सोपी आहे. पट्टा पद्धत, ठिबक व मल्चिंग पेपरच्या साह्याने त्याचे उत्पादन घेण्यात येते. दहा, पंधरा किलोच्या पॅकिगमधून त्याची विक्री होते. पॅकिंगचा आकार लहान असल्याने वाहतुकीसाठी तसेच व्यापाऱ्यांमार्फत किरकोळ ग्राहकांना खरेदी करण्यास सोयीचे होते. आतापर्यंत स्थानिक बाजारपेठ असलेल्या केडगाव, शेवाळवाडी, मांजरी येथे अडीच टन विक्री केली आहे. प्रति किलो ८० रुपये दर मिळाला आहे. दर वर्षीच्या नियोजनानुसार यंदाही एकरी २० ते २५ टन उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. सरासरी दरानुसार तीन ते चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत या पिकातून चांगला आर्थिक फायदा होत असल्याने मुलांचे शिक्षण, सर्व सुविधांसह कुटुंबाचे राहणीमान उंचावण्यास मदत झाली आहे.

मिरचीच्या व्यवसायात आमची दुसरी पिढी कार्यरत आहे. पुणे मार्केटमध्ये परराज्यातून सुमारे ७० ते ८० टक्के, तर उर्वरित आवक राज्यातून होते. पुणे शहर, उपनगरे, पिंपरी- चिंचवड, चाकण, भोसरी, हडपसर आदी भागांतून चांगली मागणी असते. गेल्या काही दिवसांपासून दर टिकून आहेत. येत्या काळातहीकमी होतील असे वाटत नाही.

अरविंद वाडकर, व्यापारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com