Poultry : ग्रामीण उद्योजकतेला ‘मिनी इनक्युबेटर’ मुळे मिळाला वाव

ग्रामीण पातळीवर गावरान कोंबडी व बदल पालनाचा प्रसार वाढवण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटावरील केंद्रीय बेट कृषी संशोधन संस्थेच्या वतीने एक प्रशिक्षण व प्रसार कार्यक्रम राबवण्यात आला. त्यातून लोकांमध्ये मिनी इनक्युबेटरबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यातून उद्योजकता विकास घडला असून, महिला आणि शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
Poultry
PoultryAgrowon

अंदमान आणि निकोबार बेटांवर (Andaman Nikobar Island) ग्रामीण भागांमध्ये पोल्ट्री (Poultry Industry) हा फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. अंडी (Eggs) आणि मांसाच्या विक्रीतून होणाऱ्या फायद्यासोबतच सामान्यांची प्रथिनांची गरज सहजतेने भागू शकते. सामान्यतः कोणत्याही खेड्यांमध्ये घरगुती पातळीवर सहा ते बारा कोंबड्या पाळणाऱ्यांचे (Chicken Farming) प्रमाण ७५ टक्के इतके आहे. या ग्रामीण घरगुती उद्योगातून दरवर्षी एका कोंबडीपासून ४० ते ८० अंडी मिळतात. त्यातील ३१ टक्के अंडी ही घरांमध्येच खाल्ली जातात, ५७ टक्के अंड्यांची विक्री केली जाते, तर १२ टक्के अंडी उबवून पुढील पुनरुत्पादन केले जाते.

Poultry
Poultry : ब्रॉयलर पक्षी संगोपनातून अर्थकारणाला गती

सामान्यतः अंडी उबवण्यासाठी खुडूक कोंबड्यांचा वापर केला जातो. ही कामे साधारणपणे महिलावर्गाकडून केली जातात. त्यामुळे महिला वर्गाशी ग्रामीण गावरान पोल्ट्री उद्योगाची नाळ जोडली गेली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र अंदमान, निकोबार सारख्या बेटावर व्यावसासिकरित्या कोंबडीची पिल्ले पुरवणाऱ्या व्यक्ती फारशा उपलब्ध नाहीत. ग्रामीण पातळीवर कोंबडीची लहान पिल्ले स्वस्तामध्ये उपलब्ध झाल्यास हा उद्योग अत्यंत वेगाने पुढे जाऊ शकतो, हे लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटावरील केंद्रीय बेट कृषी संशोधन संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरू केले. त्यांनी शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे या संकल्पनेवर काम सुरू केले--.

Poultry
Poultry : पक्ष्यांमधील आजारांवर वेळीच करा उपचार

सलग कोंबडी पिल्ले उत्पादनाच्या उद्देशाने सर्वसामान्यांना परवडतील, अशी लहान आकाराचे अंडी उबवण यंत्र (मिनी इनक्युबेटर कम हॅचर) वापरण्याचे ठरवले. संस्थेने या यंत्राचा वापर, उत्तम अंड्याची निवड करणे, स्वच्छता, रोगविरहित हाताळणी यासाठी अनेक प्रशिक्षणे घेतली. त्यात बेटांवरील २५ गावांमधील २२०२ शेतकरी व महिलांनी भाग घेतला. सामुदायिक प्रशिक्षणासाठी डीबीटी- बायोटेक किसान हब प्रोजेक्ट अंतर्गत २४० प्रति बॅच क्षमतेचे ७ मिनी इनक्युबेटर कम हॅचर येथे ग्रामीण पातळीवर बसवण्यात आले. त्यातील तीन युनिट हे पोर्ट ब्लेअर येथील आयसीएआरच्या संस्थेमध्ये ३ युनिट आणि केव्हीके सिप्पीघाट आणि प्रादेशिक केंद्र, मिनिकॉय, लक्षद्विप येथे प्रत्येकी एक बसवली. गावरान सुधारित जातींच्या अंड्याचे उत्पादन, वितरण, पिल्लांचे वितरण आणि अन्य पोल्ट्री उत्पादनाची विक्री याची शेतकऱ्यांमधूनच साखळी तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना तयार करण्यात आले.

यशस्वी महिला आणि शेतकरी ः

- दक्षिण अंदमानातील जोयशना, मिनाक्षी, रानी अंबूमलार आणि बिनिथा सिंग आणि मध्य अंदमानातील असिमा रॉय यांनी मिनी इनक्युबेटर विकत घेतली. त्यांना मागणीनुसार शेतकऱ्यांची कोंबडी व बदकाची अंडी उबवून पिल्ले देण्याची सेवा सुरू केली. तसेच स्वतः पिल्ले उत्पादन आणि विक्रीचेही काम सुरू केले. दोन वर्षामध्ये अंदाजे १००० शेतकऱ्यांनी (त्यात ६५० महिला) या सेवेचा लाभ घेतला. कोंबडी आणि बदल मिळून आजवर २५ हजार पिल्ले उत्पादन घेऊन वितरित केली.

- तंत्रज्ञानाचे आडव्या पातळीवर होणारा प्रसार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण तो अत्यंत वेगाने होत जातो.

- उत्तर मध्य अंदमान जिल्ह्यातील कमल बिस्वास यांनी दोन मध्यम क्षमतेचे इनक्युबेटर ( ६००० अंडी) खरेदी केले. आणि बदकाच्या अंड्याची उबवण करून पिल्लांची विक्री सुरू केली.

- आजवर १५ महिला आणि बेरोजगार तरुणांना मिनी इनक्युबेटर विकत घेऊन व्यवसाय सुरू केला. हे इनक्युबेटर ८० ते २५० अंडी उबवण क्षमतेची असून, त्यातून स्थानिक पातळीवर त्यांना रोजगार मिळू लागला आहे.

- या महिला उद्योजकांना मिनी इनक्युबेटर च्या माध्यमातून दरमहा ११ ते १३ हजार रुपये इतके उत्पन्न मिळू लागले आहे. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे.

अर्थशास्त्र ः

मिनी इनक्युबेटर तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे या महिलांचे अर्थशास्त्र असे बदलले

- मिनी इनक्युबेटर ची सरासरी उबवण क्षमता ः २४० अंडी (एकूण क्षमतेच्या ८५ टक्के)

- दरवर्षी एकूण उबवली जाणारी अंडी - २,४४८

- एक दिवसाची पिल्ले विक्रीतून मिळणारे उत्पन्न - ६७,२०० रुपये ( ७० रुपये प्रति पिल्लू X ८० पिल्ले प्रति महिना X १२ महिन्याचे उत्पन्न)

- अन्य शेतकऱ्यांची अंडी उबवून देण्याच्या सेवेतून मिळणारे उत्पन्न - २१,६०० रुपये. (Rs. २० प्रति अंडे X ९० अंडी प्रति माह X १२ महिने)

- पक्ष्यांची विक्री (खाण्यासाठी) - ४२,१२०० रुपये. (५४० प्रति वर्ष X १.५ किलो प्रति पक्षी X ५२० रुपये प्रति किलो)

- उत्पादन खर्च ( पुनरुत्पादनक्षम अंडी, विद्यूत खर्च, निर्जंतुकीकरण, खाद्य इ.) - ३,५०,६४० रुपये.

- निव्वळ वार्षिक उत्पन्न - १,५९,३६० रुपये.

- निव्वळ मासिक उत्पन्न - १३,२८० रुपये.

(स्रोत ः केंद्रीय बेटे कृषी संशोधन संस्था, पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com