देशी गोवंशावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती

तरसाळी (ता.सटाणा, जि. नाशिक) येथील स्थापत्य अभियंता अनिरुद्ध पाटील यांनी पूर्णवेळ देशी गोवंश संगोपनाला वाहून घेतले आहे. दीडशे जनावरांचे शास्त्रीय व पंचसूत्री पद्धतीने व्यवस्थापन करताना दूध, तूप विक्रीसह विविध गोमूत्र अर्क, खरवस पावडर, व्हे प्रोटीन पावडर आदी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती करून त्यासाठी बाजारपेठही मिळवली आहे.
देशी गोवंशावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती
Desi Cow BreedAgrowon

तरसाळी (ता.सटाणा, जि. नाशिक) येथील अनिरुद्ध पाटील यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयातून पदवी घेतली. सन २००८ मध्ये ‘बांधकाम व्यवस्थापन’ विषयात सुवर्णपदकासह पदव्युत्तर पदवी मिळविली. पुण्यात दीड वर्षे नोकरी व काही वर्षे बांधकाम व्यवसायाचा अनुभव घेतला. शेती व त्यातही देशी गोवंश (Desi Gowansh) हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने पाटील यांनी २०१६ पासून आपल्या गावीच शेतीतील करिअरला सुरवात केली.

सुरवातीचे अनुभव

पुस्तकांचे वाचन, विविध ठिकाणी भेटी देत देशी गोवंश प्रकल्प अभ्यासले. बडोदा येथून १० गीर गायी (Gir Cow) खरेदी केल्या. सुरवातीला अनेक चढउतार आले. फसवणूक झाली. जातिवंत गायी न मिळाल्याने अपेक्षित दूध उत्पादन मिळेना. मग सूक्ष्म अभ्यास, बारकावे, दैनंदिन व्यवस्थापनात सुधारणा केल्या. अनुभवातून २०१७ मध्ये गायींची संख्या १०० पर्यंत पोचली. भावनगर, जुनागढ भागांतून गीर गायी खरेदी केल्या. व्यवसाय विस्ताराच्या टप्प्यावरच भीषण दुष्काळ पडला. चाऱ्याची टंचाई असल्याने २५ लाखांचा हिरवा चारा विकत घ्यावा लागला. आर्थिक घडी कोलमडली.

डेअरी फार्म नावारूपाला

चिकाटी, दुर्दम्य इच्छाशक्ती व संकटांतून संयमाने मार्ग काढत पाटील यांनी आज आज्जीच्या नावाने ‘सारजा डेअरी फार्म’ म्हणजे गीर गाय संवर्धन केंद्र नावारूपास आणले आहे. त्यांना कृषी पदवीधर चुलतभाऊ शशिकांत पाटील, पत्नी प्रियदर्शिनी व कुटुंबीयांची मोठी मदत होते. चुलते सुधाकर पाटील, वडील भागा पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. १७ वर्षांपासून ॲग्रोवन मार्गदर्शक मित्र असल्याचे पाटील सांगतात.

दुग्ध व्यवसाय दृष्टीक्षेपात

-१७० बाय ३५ फूट आकाराचा गोठा. मुक्त संचार पध्दत.

-सुमारे १५० जनावरे. (लहान-मोठी) चार राठी, उर्वरित गीर गायी.

-सुमधुर बासरी वादनाचा दिवसभर आनंद. तणावमुक्त, आनंदी वातावरण.

--प्रत्येक गायीचे नामकरण, इ-नाफ टॅगिंग.

-स्वच्छतेची काटेकोर अंमलबजावणी, विशेष जैवसुरक्षा

- हा मजुरांचा राबता.

-दुभत्या, भाकड गायी व गाभण गायी व वासरांसाठी स्वतंत्र कक्ष.

-चारा व पशुखाद्यासाठी ३२ लाख, मनुष्यबळासाठी १० लाख, रोग व्यवस्थापन, तपासणी व लसीकरणासाठी ८ लाख असा वार्षिक सुमारे ५० लाखांचा खर्च

व्यावसायिक पंचसूत्री:

१.दूध उत्पादन व विक्री:

-दररोज सरासरी १७० लिटर दूध उत्पादन. पैकी ७० लिटर दुधाची सटाणा येथे विक्री.

-वासरू पूर्णपणे संतुष्ट झाल्यानंतर दूध काढणी.

-गायींची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासह पौष्टिक व गुणवत्तापूर्ण

दुधासाठी आहारात शतावरी, अश्वगंधा, गुळवेल यांची मात्रा. संतुलित खाद्य व्यवस्थापन. मुरघास निर्मितीही. ४.२ पर्यत फॅट तर ३.५ पर्यंत प्रथिन दुधात मिळते.

२.प्रक्रियायुक्त उत्पादने:

-सुमारे ९० लिटर दुधापासून वैदिक बिलोना पद्धतीने तूपनिर्मिती. त्यास २५०० रू. प्रति लिटर दर. ताकाची स्थानिक पातळीवर २० रुपये प्रति लिटरप्रमाणे विक्री.

-गोमूत्र व वनस्पतींपासून ८ प्रकारचे अर्क विकसित व उत्पादन. उदा. चंद्रमा, हरसिंगार, सप्तरंगी,

सर्पगंधा, अर्जुना, गोखरू, तुलसी, पुनर्नवा. ४०० ते १००० रुपयांपर्यंत दर. वार्षिक विक्री ८०० लिटर.

३.ऊर्जानिर्मिती:

-तीन गोबरगॅस संयंत्रे. त्यातून घरगुती व मजुरांना स्वयंपाकासाठी इंधन. त्यामुळे इंधनबचतीसह वार्षिक ६० हजार रुपयांची बचत.

४.शेणस्लरी:

-शेणस्लरी व गोमुत्राचा वापर घरच्या ७० एकर शेतीत. (शेवगा, डाळिंब, कांदा, चारापिके)

-पूर्वी जमिनीचा सेंद्रिय कर्ब ०.८ होता. अलीकडे तपासणीतून तो १.३ टक्के. त्यामुळे जमीन सुपीकता वाढीसह खतांवरील वार्षिक ३ लाखांचा खर्च कमी झाला.

५.गोवंश संवर्धन, पैदास

-नैसर्गिक रेतन पद्धतीसह ‘सेक्स सॉर्टेड सिमेन्स’ व ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाद्वारे गोवंश पैदास. त्यासाठी काही संस्थांची मदत घेतली आहे. या तंत्राद्वारे दरवर्षी ७० वासरांना जन्म दिला जातो.

-गीर गोवंशाचे गुणधर्म, उच्च गुणसूत्र असलेल्या रोगमुक्त गीर गोवंशाची निवड करून संवर्धन.

वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने

१)त्वचेवरील आजारांसाठी (उदा. सोरायसिस व कोरड्या त्वचेवर उपाय) एका औषधाचे उत्पादन आयुर्वेदिक वैद्यकांच्या मागणीनुसार तयार केले जाते.

२)खरवस भुकटी- देशी गो दुधावर आधारित खरवसपासून भुकटी तयार करण्याची उत्पादन प्रक्रिया यशस्वी केली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासह आरोग्यवर्धक व पौष्टिक गुणधर्म त्यात आहेत तीन वर्षांपासून त्यावर संशोधन करण्यात आले. कॅप्सूल’ही तयार केल्या आहेत. एका प्रक्रियादाराकडून ही उत्पादने तयार करून घेण्यात येतात. भुकटी ५ हजार रुपये प्रति किलो तर ६० कॅप्सूलचा डबा १ हजार रुपये असे दर आहेत. आगामी काळात ३० लाख रुपयांचा संबंधित प्रकल्प उभारण्याची तयारी सुरु आहे.

३) व्हे प्रोटीन पावडर

देशी गाईच्या दुधापासून ‘व्हे प्रोटीन पावडर’ बनविली आहे. अशा प्रकारचे हे भारतातील पहिलेच उत्पादन असण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपासून त्यावर संशोधन सुरु होते. त्यात ६६.४० टक्के प्रथिनांचे प्रमाण आहे. मानवी शरीरातील प्रथिनांची गरज पूर्ण करणे, स्नायू बळकट व हाडे मजबूत करण्यासह पचनक्रिया सुधारण्यासाठी हे उत्पादन उपयुक्त असल्याचा दावा केला आहे. एका प्रमाणित संस्थेकडून उत्पादनाचे परीक्षण २०१८ मध्ये केले आहे. उत्पादन निर्मितीत ‘सौर ड्रायर’ चा वापर केला आहे. दैनंदिन दोन किलो उत्पादनक्षमता आहे. ३५ लिटर ताकापासून एक किलो भुकटी होते. प्रति किलो ३,५०० रुपये दर असून दोन वर्षांत १०० किलो विक्री केली आहे.

विक्री व्यवस्था

स्थानिक पातळीवर सटाणा शहरासह नाशिक, मुंबई, पुणे, नंदुरबार, लातूर, बिहार, कर्नाटक राज्यात मागणीनुसार उत्पादने पाठवली जातात. ‘मार्केटिंग’ व विक्रीची जबाबदारी अनिरुद्ध सांभाळतात. भारतभर ‘होम डिलिव्हरी सेवा कुरिअरने दिली जाते.

प्रमुख उत्पादनांची विक्री (प्रतिमहिना)

उत्पादने...लिटर...दर (रू.)

दूध...२,१००...७०

तूप...८० ते ९०...२,५००

ताक...३००....२०

गोमूत्र...१,०००...५०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com