Rupamata Sugar : दूध, ऊस उत्पादकांचा आधारस्तंभ : रुपामाता

कौटुंबिक पार्श्‍वभूमी शेतकरी कुटुंबातली. एक यशस्वी वकील. पण आपण ज्या जन्मभूमीत जन्मलो वाढलो तेथील शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे परीसराचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपण काहीतरी केले पाहिजे या कल्पनेतून १५ ऑगस्ट २०१६ला दूध संघाची स्थापना केली.
Rupamata Sugar
Rupamata SugarAgrowon

कौटुंबिक पार्श्‍वभूमी शेतकरी कुटुंबातली. एक यशस्वी वकील. पण आपण ज्या जन्मभूमीत जन्मलो वाढलो तेथील शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे परीसराचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपण काहीतरी केले पाहिजे या कल्पनेतून १५ ऑगस्ट २०१६ला दूध संघाची स्थापना केली. या भागातील शेतकरी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविले पाहिजेत, शेतीसाठी कर्जपुरवठा (Loan Supply) व शेतकऱ्यांना दरमहा पगार मिळेल या स्वरूपात रक्कम त्यांना उपलब्ध व्हावी या हेतूने दूध व्यवसायाच्या (Dairy Business) विकासाला चालना देण्याची कल्पना त्यांच्या मनात सुचली.

Rupamata Sugar
Sugar Industry : साखर उद्योग नियंत्रणमुक्त करा

रोजगारनिर्मितीला मर्यादा आहेत. रोजगार न देता दरमहा पगाराप्रमाणे रक्कम मिळावी म्हणून दूध व्यवसाय विकसित करावा असे वाटले. रूपामाता मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्‍स संघाची स्थापना केली. पाच हजार लिटर दूध संकलनापासून सुरुवात झाली. आज पन्नास हजार लिटरपर्यंत दूध संकलन होत आहे. दरमहा पाच, १५ आणि २५ तारखेला दूध उत्पादकांच्या बँक खात्यात दुधाच्या पेमेंटचे रक्कम जमा होते. तीनशेपेक्षा ही अधिक दूध संकलन केंद्राद्वारे दुधाचे संकलन होते.

Rupamata Sugar
Sugar Export : आर्थिक ताळेबंदावर नकारात्मक परिणाम शक्य

उमरगा तालुक्यात २५ हजार लिटर दूध क्षमतेचा चिलिंग प्लांट निर्माण झाला आहे भविष्यात धाराशिव, लातूर आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात चिलिंग प्लांट उभारण्याची योजना आहे. दुधाबरोबरच उपपदार्थांची निर्मिती सुरू केली. श्रीखंड, पनीर, ताक, लस्सी, दही, तूप या माध्यमांतून दुधाची व उपपदार्थ एक मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. उपपदार्थ निर्मितीमुळे मूल्यवर्धन झाले. दूध उत्पादकांना योग्य दर मिळतो आहे.संकरित गाई घेण्यासाठी कर्जपुरवठा केला.

गाईंचे गोठे बांधण्यासाठी कर्ज दिले. उसाची रक्कम ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उपयोगी पडावी तर दरमहाच्या उत्पन्नातून त्याचा रोजीरोटीचा खर्च भागवावा या कल्पनेतून दूध व्यवसायाच्या विकासाला मोठी चालना दिली गेली. गाय लक्ष्मी स्वरूप असून, महिन्याचा पगार त्याला दरमहा हातात येत आहे. आज दूध व्यवसायाची उलाढाल २०० कोटी रुपयांवर गेली आहे. तीनशे ते साडेतीनशे गावांमध्ये दूध उत्पादकांशी उद्योग समूहाचा संपर्क येतो आहे.

Rupamata Sugar
Sugar Export : गतीने पाच लाख टनांचे साखर निर्यात करार

केवळ कुटुंबाच्या गरजेपुरतेच दूध या संकल्पनेला व्यापारी तत्त्वावर दूध उत्पादन असे व्यापक व व्यापारी स्वरूप प्राप्त झाले आहे. पशुधनाची संख्या वाढली आहे. दूध उत्पादकता वाढली आहे. त्यातून दूध उत्पादकांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. श्‍वेतक्रांतीने दूध उत्पादकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. दूध व्यवसाय हा एका व्यापारी पद्धतीने होत आहे. छोटे छोटे दूध उत्पादक आज उद्योजक झाले आहेत. दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे.

रूपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि मल्टिस्टेटच्या माध्यमातून ३०,००० पेक्षा अधिक सभासद आहेत. वेअर हाउस उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले. मेंढा येथे दहा हजार मेट्रिक टन क्षमतेचे वेअर हाउस उभारले आहे. शेतीमाल साठवणुकीची व्यवस्था झाली आहे. सोयाबीन त्या ठिकाणी साठवले जाते. बाजारभावाने ७० टक्के कर्ज उपलब्ध करून दिले.

त्यामुळे शेतीमालाला योग्य बाजार भाव मिळणे शक्य झाले आहे. मिळेल त्या भावाने सोयाबीन विकण्यातून होणार नुकसान टळले. प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे गोदाम बांधण्याची योजना विचाराधीन असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमाल साठवणुकीची मोठी व्यवस्था करण्याचा विचार आहे. नाफेडच्या धर्तीवर शेतीमाल खरेदी करण्याची ही योजना सुरू करण्याचा मानस आहे.

मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ऊस निर्माण झाला. ऊस उत्पांदकांचे आर्थिक नुकसान कमी करण्याच्या कल्पनेतून साडेबाराशे मेट्रिक टन दैनंदिन गाळप क्षमतेचा गूळ पावडर निर्मितीचा प्रकल्प रूपामाता नॅचरल शुगर्स युनिट एक, पाडोळी आकुबाई तालुका उस्मानाबाद येथे सन २०१८ सुरू झाला. त्यासाठी ३० ते ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रने अर्थसाह्य केले. ऊस ऊत्पादकांना जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्याचे बरोबरीने उसाला भाव मिळाला. प्रति मॅट्रिक टन गतवर्षी २१०० रुपये भाव ऊस उत्पादकाला मिळाला.

उसाचे गाळप झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत ऊस उत्पादकाला पेमेंट दिले जाते. प्रकल्पाची वार्षिक उलाढाल ३० ते ३५ कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. माजलगाव जिल्हा बीड येथे रोशन पुरी येथे दोन हजार मेट्रिक टन दैनंदिन गाळप क्षमतेचे या उद्योग समूहाचे दुसरे युनिट उभारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या महिन्यात प्रत्यक्ष गाळप सुरू होईल. तर मनोरमा रूपामाता नॅचरल शुगर्स संचलित रूपामाता नॅचरल शुगर्सचे तिसरे युनिट तुळजापूर येथे येत्या जानेवारीत सुरू होईल.

याची क्षमता प्रतिदिन दोन हजार मेट्रिक टन गाळपाची आहे. ही दोन युनिट्‍स सुरू झाल्यानंतर रूपामाता उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल १००० कोटींच्या घरात जाईल. सल्फरयुक्त साखरेला सक्षम पर्याय रूपामाताची आरोग्यदायी गूळ पावडर ही टॅग लाइन मार्केटमध्ये ग्राहक प्रिय झाली आहे. थेट शेतकऱ्यांकडून घेतलेलं दूध स्वच्छ आणि स्वादिष्ट ही दूध व्यवसायातली टॅगलाइन अशीच ग्राहक प्रिय झाली आहे. पतंजली, डाबर आयुर्वेद औषध निर्मिती उद्योग, तसेच पशुखाद्य अल्कोहोल अन्न प्रक्रिया कॅडबरी या उद्योगांमध्ये या आरोग्यदायी गूळ पावडरला बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

आगामी काळात ही पावडर निर्यात करण्याचा संस्थेचा मानस आहे. ही गूळ पावडर रसायनयुक्त साखरेला पर्याय असून, थेट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.ग्रामीण भागात रिटेल सेल उपलब्ध आहे. रूपामाताची आरोग्यदायी गोड पावडर ही टॅगलाइन झाली असून, दुधाच्या बाबतीमध्ये थेट शेतकऱ्यांकडून घेतलेले दूध स्वच्छ आणि स्वादिष्ट ही टॅगलाइन आज दूध उत्पादकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली आहे.

सन २००३ मध्ये रूपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी व सन २०१२ मध्ये मल्टिस्टेटच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती झाली आहे. तीस हजार शेतकऱ्यांशी थेट संपर्क येत असून, त्यांच्या आर्थिक स्तर उंचावण्यास रूपामाता उद्योग समूहाचा मोठा हातभार लागला आहे. एक आर्थिक क्रांती या निमित्ताने अग्रेसर होते आहे. रूपामाताची वार्षिक उलाढाल ५५० कोटींपेक्षाही अधिक टप्प्यावर पोहोचली आहे.

अनेक सामाजिक उपक्रमातही संस्था, उद्योग समूह अग्रेसर असून, कोविड काळात ऑक्सिजन प्लाँटची उभारणी केली. ३०० पेक्षा ही अधिक गरजूंना उद्योग समूहामार्फत सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ जेवण दिले गेले. किराणा किट्‌स दिली गेली. दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी चारा छावणी उभारण्यात आली. महिला सक्षमीकरणावर संस्थेमार्फत अधिक भर दिला जात आहे. नोकरीत महिलांना प्राधान्य दिले जात आहे. संस्थेत

महिला मॅनेजर म्हणून कारभार बघत आहेत. महिला बचत गटांना दूध व्यवसायासाठी कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. शैक्षणिक संस्थांद्वारे शैक्षणिक क्रांतीस हातभार लावला आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय संस्थेने केली आहे. पत्नी सुलभा व्यंकटराव गुंड, मुलगी अंजली गुंड व मुलगा अॅड. अजित गुंड या उद्योग समूहाच्या व्यवस्थापनात जबाबदारी पार पाडत आहेत. आज या कुटुंबात सात इंजिनियर व चार वकील आहेत. आजी रूपाबाई विश्‍वनाथ गुंड यांचे सन २००३ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या नावाने सुरू झालेला रूपामाता उद्योग समूह हा या परिसरातील उद्योजकतेचा विकासाच्या उद्योजकतेच्या विकासाचा मानदंड आधारस्तंभ बनला आहे.

अॅड. व्यकंटराव गुंड

रूपामाता उद्योग समूह

९१६८९९१९१९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com