शेतकऱ्यांची अर्थवाहिनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक

शेतकऱ्याची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी सुलभ व माफक व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे, या भूमिकेतून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी (Satara District Central Bank) बँकेची स्थापना झाली. स्थापनेपासून बँकेने ‘सहकाराच्या माध्यमातून शेतकरी व समाजाचा विकास’ हे ध्येय कायम जपले आहे.
Satara District Central Bank
Satara District Central BankAgrowon

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (Satara District Bank) स्थापना १५ ऑगस्ट, १९४९ रोजी झाली. जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या यशस्वी वाटचालीमध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मोलाचे योगदान आहे. त्यांच्या भक्कम नेतृत्व अन् मार्गदर्शनामुळे बँकेची सर्वांगीण प्रगती झाली. अनुभवी संचालक मंडळ, कार्यक्षम प्रशासन, उत्कृष्ट निधी व्यवस्थापन, पारदर्शक आणि भविष्यवेधी सकारात्मक धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणीद्वारे बँकेच्या उत्कर्षाचा आलेख कायम चढता ठेवला आहे.

बँकेने ३२० शाखांमधून ६२ एटीएम, ६५० मायक्रो एटीएम माध्यमातून बँकिंग सुविधा (Banking Facility) उपलब्ध केल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ‘बँक आपल्या दारी’ ही संकल्पना मोबाईल बँकिंग एटीएम व्हॅनच्या (Mobile Banking ATM Van) माध्यमातून बँकेने साकार केली. त्यातून दुर्गम डोंगरी भागातील ग्राहकांना एटीएमसह सर्व बँकिंग सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. त्रिस्तरीय बँकिंग रचनेनुसार पीक कर्ज व कृषिपूरक व्यवसायासाठी ९५३ संलग्न प्राथमिक विकास संस्थांच्या माध्यमातून बँकेचे कामकाज चालते. बँकेचे एकूण २७१२ सभासद असून, त्यापैकी २६२५ संस्था व ८७ व्यक्ती सभासद आहेत.

ठळक वैशिष्ट्ये -

  • भाग भांडवल : २४१ कोटींहून अधिक.

  • बँकेस ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त.

  • सुरुवातीपासून वसुली टक्केवारी ९५ टक्क्यांहून अधिक.

  • १४ वर्षे एनपीए ‘शून्य’ टक्के राखण्यात यशस्वी.

  • शैक्षणिक, सोसायटी इमारत व गोडाउन बांधकामासाठी ‘शून्य’ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा.

  • कोअर बँकिंग प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी.

  • आंतरराष्ट्रीय ‘आयएसओ ९००१:२०१५’ मानांकन प्राप्त.

ग्राहकांसाठी विशेष योजना -

  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील नव-उद्योजकांना कृषिपूरक तसेच इतर व्यवसायांसाठी ६० लाखांपर्यंत कर्जपुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

  • विकास संस्थांमार्फत वितरित पीककर्जाचे वेळेत परतफेड करणाऱ्या सभासदांना ३ लाखांपर्यंतचे पीककर्ज ‘शून्य’ टक्के दराने उपलब्ध. कृषिपूरक व्यवसायासाठी मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत दिली जाते.

  • देशांतर्गत, परदेशी शिक्षणासाठी रुपये २० ते ३० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध केले जाते. वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या कर्जदार विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असेपर्यंत व्याजसवलत. आजवर बँकेने स्वतःच्या नफ्यातून एकूण ५७४.७३ लाख रुपये एवढी व्याज सवलत दिली आहे.

  • महिला सबलीकरण व सक्षमीकरणांतर्गत ३३,१५७ स्वयंसाह्यता बचत गट बँकेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. या गटांना २००८ पासून जिल्हा बँकेने राज्यात सर्वप्रथम ४ टक्के इतक्या अल्प व्याजदराने कर्जपुरवठा केला.

  • सर्व खातेदारांना विमा संरक्षण मिळावे, याकरिता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा प्रीमिअम बँकेमार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुमारे १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातून सुमारे १० लाखांपेक्षा जास्त खातेदारांच्या वारसांना दोन लाखांपर्यंत अपघात विमा संरक्षण मिळणार आहे.

  • जानेवारी २०१६ पासून आजअखेर बँकेने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये ३ लाख व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये एक लाख खातेदारांना सहभागी करून घेतले आहे.

सोसायटी सक्षमीकरणासाठी योगदान -

  • जिल्ह्यातील एकूण ९५३ विकास सेवा संस्थांचे खर्चावरील नियंत्रण, व्यवसाय वृद्धी, कर्जवाटपात वाढ करणे, संस्था सक्षमीकरण यासह अन्य व्यवसाय सुरू करण्याविषयी मार्गदर्शन केले जाते. चालू आर्थिक वर्षाअखेर प्रथमच ८६८ विकास सोसायट्या नफ्यात आणण्यात बँकेस यश मिळाले आहे. भविष्यात सर्व विकास संस्था नफ्यात आणण्याचा बँकेचा मानस आहे.

  • अहवाल वर्षात सभासदांना १५ टक्के लाभांश. सोसायटी कर्जदार सभासदांना वसुली प्रोत्साहन योजनेतंर्गत बँक पातळीवर १०० टक्के वसुली करणाऱ्या विकास संस्थांना रुपये २९ हजार ५०० प्रमाणे वसुली प्रोत्साहन रक्कम अदा केली. याशिवाय सभासद पातळीवर १०० टक्के कर्जवसुली करणाऱ्या विकास संस्थांना बक्षीस म्हणून संस्थेच्या आर्थिक उलाढालीच्या प्रमाणात १८ हजारांपर्यंत रक्कम दिली जाते. त्यामुळे संस्थांच्या भाग भांडवलात वाढ होऊन संस्था सक्षम होण्यास मदत झाली आहे.

  • सन २००८-०९ पासून आतापर्यंत बँकेने संलग्न विकास संस्थांना वसुली प्रोत्साहनपर प्रत्येकी तीन लाख १३ हजार प्रमाणे रक्कम अदा केली आहे. तसेच विकास संस्थांना इमारत बांधकाम व गोडाउन बांधकामासाठी शून्य टक्के दराने अर्थसाह्य उपलब्ध केले आहे.

तंत्रज्ञानातही आघाडी -

  • बँकेच्या संचालक मंडळाने भविष्याचा वेध घेऊन बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञान आत्मसात करत सन २००५ मध्ये ‘टीबीए’च्या माध्यमातून ग्राहकांना जलद सेवा उपलब्ध करून दिली.

  • ग्राहकांना कॅशलेस बँकिंगसाठी प्रोत्साहित केले आहे.

  • शेतकरी सभासदांना सर्व शाखांमध्ये ७/१२ व खाते उतारा मिळण्याकरिता सुविधा उपलब्ध केली आहे.

सामाजिक बांधिलकी -

  • कोरोना काळात मुख्यमंत्री साह्यता निधीस १ कोटी १६ लाख रुपयांची मदत.

  • कोरोना काळात रुग्णालयांना तीन कोटी रुपयांची व्हेंटिलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन अशी यंत्र उपलब्ध केली.

  • सातारा येथे नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी १५ लाख रुपयांची मदत.

  • २०१८ मध्ये पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना जलसंधारणासाठी रुपये १ कोटीचा निधी.

  • दुष्काळग्रस्त भागात २ कोटी रुपये खर्च करून टॅंकरने पाणी वितरण.

मिळालेले पुरस्कार -

आजपर्यंत बँकेस महाराष्ट्र शासन, नाबार्ड, राज्य बँक, नॅफस्कॉब, राज्य बँक असोसिएशन व इतर नामांकित संस्थांतर्फे सुमारे ९९ पुरस्काराने सन्मान. त्यात सहकार भूषण पुरस्कार, उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार, ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये ‘को-ऑपरेटिव्ह बँकिंग टॉपर’ म्हणून नोंद. नाबार्डतर्फे बँकेस ‘विशेष स्मृती पुरस्कार २०२१’ सन्मान.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com