Contract Farming : भूमिहीन शेतकऱ्याची जिद्द!

कराराच्या शेतीत भाजीपाला, मधमाशीपालनातून मिळवले स्वावलंबन
Self-reliance gained from vegetables, beekeeping in contract farming
Self-reliance gained from vegetables, beekeeping in contract farmingAgrowon

बांबुळी (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील भूमिहीन असलेल्या नारायण चेंदवणकर (Narayan Chendvankar) यांनी नाममात्र करारावर शेती घेत भाजीपाला उत्पादन (Vegetable Production) सुरू केले. त्याला मधमाशीपालनाची (Beekeepng) जोड देत उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत तयार केला आहे. अल्पावधीतच  हे कुटुंब स्वावलंबी झाले आहे.  

Self-reliance gained from vegetables, beekeeping in contract farming
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर बांबुळी हे गाव आहे. हे गाव जैवविविधतेने समृद्ध असून, गावसीमेत विविध पक्षी आढळून येतात. पावलोपावली पक्ष्यांचा मधुर आवाज ऐकायला मिळतो. येथेच नारायण तुकाराम चेंदवणकर राहतात. वयाच्या सहाव्या वर्षी वडीलांचे निधन झाल्यानंतर शिक्षणासाठी एका नातेवाइकाने त्यांना मुंबईला नेले. कसेबसे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोव्यामध्ये ५ ते ६ वर्षे नोकरी केली. २००० रोजी पुन्हा आपल्या गावी आल्यानंतर काही काळ एका दुकानात नोकरी केली. मात्र, नोकरीतून घरखर्चही भागत नसल्याने पत्नी उज्ज्वला यांच्या साथीने करारावरजमीन घेत भाजीपाला उत्पादनासह मधमाशीपालन यशस्वी केले आहे.

Self-reliance gained from vegetables, beekeeping in contract farming
मधमाशीपालन अन् संवर्धनही...

करारावर घेतली जमीन
बांबुळी हे नारायणराव यांच्या वडिलांच्या मामाचे गाव. नारायणरावांच्या स्वतःच्या नावावर १ गुंठाही जमीन नाही. वडिलांच्या मामांची अवघी ५ गुंठे जमीन. त्यातच छोटेसे घर आहे. घरगुती वापरासाठी दोन गुंठे क्षेत्रात भाजीपाला लागवड केली जात असे. खतांचा कमी वापर करून देखील दर्जेदार भाजीपाला उत्पादन मिळते हे लक्षात आल्यानंतर करारावर जमीन घेत भाजीपाला लागवड करण्याचे ठरविले. त्यासाठी गावातील काही शेतकऱ्यांकडे करारावर जमिनीची विचारणा केली. त्यातून १ एकर पडीक जमीन नाममात्र दराने लागवडीसाठी मिळाली. तत्पूर्वी यशस्वी भाजीपाला उत्पादकांच्या बांधावर जात त्यातील बारकावे समजून घेतले. पुरेशी तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर भाजीपाला लागवडीचा श्रीगणेशा केला. एक एकरांमध्ये दोडका, पडवळ, काकडी, मिरची, कारली, भोपळा, वाल, भेंडी अशा विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. त्यातून वर्षाला साधारण दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांना मिळते.

Self-reliance gained from vegetables, beekeeping in contract farming
हायड्रोपोनिक तंत्राने करा भाजीपाला व्यावसायिक शेती

भाजीपाला लागवडीत मधमाशीपालनाचा प्रयोग
भाजीपाला लागवडीतून चांगले उत्पन्न मिळाल्यामुळे नारायणरावांचा शेतीमधील रस वाढू लागला. विविध ठिकाणी शेतीविषयक चर्चासत्रांना ते जाऊ लागले. त्यातूनच एका चर्चासत्रामध्ये ‘फळभाज्यांमध्ये परागीकरणाचे महत्त्व’ या विषयी माहिती मिळाली. त्यातून फळभाज्या आणि मधुमक्षिका यांच्यात किती घट्ट नाते आहे हे उमगले. त्याचवेळी भाजीपाला लागवडीत मधमाशीपालनाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २०१६ मध्ये पुण्यात येऊन मधमाशीपालनाचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला सांगलीहून मधमाशांच्या ४ पेट्या आणल्या. या पेट्या घराजवळील भाजीपाला लागवडीत ठेवत प्रयोग केला. परंतु अपुऱ्या ज्ञानाअभावी आणलेल्या चारही पेट्या नाश झाल्या. परंतु त्यांनी हार मानली नाही. जिल्ह्याबाहेरील विविध मधमाशीपालन प्रकल्पास भेटी देत बारकावे, तंत्रशुद्ध माहिती घेतली. पुन्हा ८ महिन्यांनंतर ५ पेट्या मागविल्या. या पेट्यादेखील घराजवळील भाजीपाला लागवडीत ठेवल्या. वेळोवेळी फळभाज्यांचे निरीक्षण केले. उत्पादनात प्रचंड वाढ झाल्याचे निर्दशनास आले. सध्या त्यांच्याकडे मधमाशांच्या सुमारे २५ पेट्या आहेत. आता गावपरिसरातील शेतकऱ्यांकडून मधपेट्यांसाठी मागणी वाढते आहे. या पेट्यांच्या विक्रीसह काही प्रमाणात मधाचे उत्पादनही मिळते. मधमाशीपालनातून वर्षाला साधारण ८० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळते.

गावात प्रथमच मल्चिंगचा वापर
करारावर जमीन घेऊन भाजीपाला लागवड करीत असल्यामुळे लोकांमध्ये तो चर्चेचा विषय झाला. त्यातच श्री. चेंदवणकर यांनी मल्चिंगचा वापर करून भाजीपाला लागवडीचा प्रयोग केला. त्यामुळे अनेकांकडून त्यांची चेष्टा करण्यात आली. मात्र पहिल्याच प्रयत्नात दर्जेदार भाजीपाला त्यांनी पिकविला. तेच लोक आता आता मल्चिंगवरील भाजीपाला लागवड पाहायला येतात.

पेट्या शेतात ठेवण्यासाठी आग्रह  
करारावर घेतलेल्या जमिनीत खरिपात पाण्याच्या उपलब्धतेवर भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र रब्बीत पाण्याची पुरेशी उपलब्धता नसते. त्यामुळे रब्बीत गावातील इतर शेतकऱ्यांच्या शेतात मधपेट्या ठेवल्या जातात. सुरुवातीला लोकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र मधमाश्यांच्या पेट्या ठेवल्यामुळे उत्पादनात भर मिळण्यास मदत होते हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आता शेतात मधपेट्या ठेवण्यासाठी शेतकरी आग्रह करत असल्याचे ते आवर्जून सांगतात.

Self-reliance gained from vegetables, beekeeping in contract farming
शिंदेंच्या सुना बनल्या भाजीपाला बीजोत्पादनाचा कणा

भाजीपाला प्रशिक्षणासाठी पुढाकार
जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना भाजीपाला उत्पादन आणि मधमाशीपालन याविषयी प्रशिक्षण श्री. चेंदवणकर देतात.  अलीकडेच भगीरथ प्रतिष्ठानने सुधारगृहातील कैद्यांना भाजीपाला प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या कैद्यांना प्रशिक्षणाचे धडे नारायणराव देतात.
--------------------
- नारायण चेंदवणकर  ९७६४२४४९४७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com