Vegetable farming: वेलवर्गीय भाजीपाला पिके ठरली किफायतशीर

Farming techniques : अन्वी मिर्झापूर (जि. अकोला) येथील पातालबंशी कुटुंबाने वेलवर्गीय पिकांच्या शेतीचे तंत्र चांगलेच अवगत केले आहे. उन्हाळी व रब्बी हंगामात बाजारपेठेतील मागणीप्रमाणे या पिकांचे चांगल्या प्रकारे नियोजन केल्यानेच ही पिके कुटुंबाच्या अर्थकारणाचा प्रमुख स्रोत बनली आहेत.
Success Story
Success StoryAgrowon

Success Story : अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर हे शेतीतील प्रयोगशीलतेत अग्रेसर गाव आहे, सिंचनाच्या सोयीसुविधा असल्याने शेतकऱ्यांना विविध पिके घेणे शक्य होते. गावातील श्यामलाल व रामलाल या पातालबंशी बंधूंची १२ एकर एकत्रित शेती आहे.

पैकी १० एकरांत सिंचनाची सोय आहे. श्यामलाल यांचा मुलगा करण मुक्त विद्यापीठातून कृषी पदवीधर झाला असून, तो काही वर्षांपासून शेतीत कुटुंबीयांसह राबतो. त्यास चुलत बंधू सचिनचे सहकार्य मिळते.

खरिपात कापूस, सोयाबीन आदी पिके होत असली तरी वेलवर्गीय पिके ही या कुटुंबाच्या अर्थकारणाचा मुख्य स्रोत झाली आहेत. या पिकांचे लागवड तंत्रज्ञान कुटुंबाला चांगलेच अवगत झाले आहे.

वेलवर्गीय पिकांचे तंत्रज्ञान

-पातालबंशी कुटुंब प्रामुख्याने उन्हाळी व रब्बी अशा दोन हंगामांत वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे नियोजन करते. दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत लाल व दुधी भोपळा आणि दोडका या पिकांची लागवड केली जाते. पीकनिहाय अर्धा ते एक एकरांपर्यंत क्षेत्र राहते.

- लाल भोपळ्यातील सुमारे १० वर्षांहून अधिकचा अनुभव तयार झाला आहे. त्याचे दरवर्षी एकरी ९ ते साडेनऊ टनांपर्यंत उत्पादन मिळते. उन्हाळ्याच्या दिवसात अन्य भाजीपाला आवक कमी असल्याने भोपळ्याला सरासरी १२, १५ ते २० रुपये प्रति किलो दरम्यान दर मिळतो.

-उन्हाळ्याचा काळ असल्याने वेल जमिनीवरच वाढू दिले जातात. पाटसरीने पाणी नियोजन होते.

Success Story
Vegetable Crop : वेलवर्गीय भाज्यांसाठी मंडप किंवा ताटी पद्धत वापरण्याचे फायदे काय आहेत?

-दोडका पिकात फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी मक्षीकारी सापळ्यांचा वापर होतो.

-बाजारात चालणाऱ्या जातींची निवड केली जाते.

दुधी भोपळ्याचे एकरी १० टनांपर्यंत उत्पादन, दर किलोला १५ रुपये तर दोडक्याचे ५ टनांपर्यंत

उत्पादन व किलोला १८ ते २० रुपये दर मिळतो.

-बाजारपेठेची मागणी पाहून सप्टेंबर- ऑक्टोबरच्या सुमारास वांगी, कारले, चवळी आदी पिके घेतली जातात. वेलवर्गीय पिकांमधून वर्षभरात एकरी दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

-शेतातील कामे प्रामुख्याने घरातील सदस्य करतात. त्यामुळे मजुरांवरील खर्च आटोक्यात ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे.

-पिकविलेल्या भाजीपाला व्यवस्थित प्रतवारी, स्वच्छता करून अकोलासह मूर्तिजापूर, बोरगावमंजू येथील आठवडी बाजारात विक्रीस नेण्यात येतो. त्यामुळे इतरांच्या तुलनेत दर चांगला मिळतो, असे करणने सांगितले.

अर्थकारण सुधारले

कुटुंबाचा उदरनिर्वाह मुख्यतः शेतीतील उत्पन्नावरच चालतो. त्यातूनच घरातील मुलामुलींचे शिक्षण, विवाह झाले. मुख्य शेताला लागून असलेली पडीक जमीन सुपीक झाली. दरवर्षी पुराचे पाणी शेतातून जायचे. त्यासाठी शेतालगतच्या नाल्याचे खोलीकरण करून घेतले.

शेतीचे क्षेत्र वाढले शिवाय पुरापासून शेतीचे संरक्षण होण्यास मदत झाली. सिंचनाच्या उद्देशाने शासनाच्या धडक सिंचन योजनेतून विहीर खोदली. युवा पिढीतील करण यांनी पुढाकार घेत आता शेतकरी गटाची स्थापना केली आहे. कृषी विभाग- आत्माकडे त्याची नोंदणी झाली आहे. गटातील अन्य सदस्यही भाजीपाला उत्पादनासाठी पुढे आले आहेत.

संपर्क - करण पातालबंशी, ७०३०८६६१६९

वेलवर्गीय पिकांतील तंत्र

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील (अकोला) मिरची व भाजीपाला संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. श्याम घावडे यांनी विद्यापीठात झालेला अभ्यास व तंत्रज्ञान या अनुषंगाने माहिती दिली. त्यानुसार भाजीपाला पिके पॉली मल्चिंगला चांगला प्रतिसाद देतात. त्याच्या वापरामुळे प्राथमिक अवस्थेत येणाऱ्या किडींना रोखण्यास मदत होते.

शिवाय आर्द्रताही मिळते. दुसरी बाब म्हणजे वेलींच्या ‘टेंड्रील’च्या स्थितीत शेंडे खुडले तर फांद्याची संख्या वाढते अशी शिफारस विद्यापीठाने केली आहे. बाजारपेठेत बिया नसलेली फळेही आता संकरीकरण तंत्राने विकसित होत आहेत.

यात खासगी कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. दोन ओळींतील अंतर दोन मीटर व दोन वेलींतील एक मीटर असावे. पिकानुसार शिफारशीत मात्रा ही बदलते. त्याचा विचारही करणे गरजेचे आहे.

Success Story
Sugarcane Farming : ऊस शेती करताना माती परीक्षण का असते महत्त्वाचे?

वेलवर्गीय पिकांमध्ये नर व मादी ही फुले एकाच वेलीवर वेगवेगळ्या फांद्यांवर येतात. अशा पिकात मादीवर्गीय फुले जेवढी जास्त तेवढी उत्पादनाची शाश्‍वतता अधिक राहते. बाजारात संकरित जाती सर्वाधिक आहेत. त्यामुळे मादी फुलांचे प्रमाणही वाढलेले दिसते. वेलीवर मादी फुले येईपर्यंत फळधारणा होत नव्हती.

आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ४० ते ४५ दिवसांतच अशी फुले यायला लागतात. विद्यापीठाने सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी पुढाकार घेतला आहे. वेलवर्गीय पिकांत सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व आहे.

विदर्भातील जमिनीत जस्त, लोह, बोरॉन कमी असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी खतमात्रेची जी शिफारस केली आहे ती २० वेळा विभागातून दिल्यास फायदा होतो. दर चौथ्या दिवशी ठिबकद्वारे त्याचा वापर फायदेशीर ठरतो. प्रत व उत्पादन वाढते.

संपर्क - डॉ. श्याम घावडे, ७०२०५७५८६७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com