ठोंबरे फार्म अॅण्ड नर्सरी सीताफळ, पेरूसाठी खात्रीचं नाव!

सीताफळ, पेरू, आंबा, लिंबू यांसारख्या विविध वाणांच्या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार फळ रोपांसाठी बार्शी तालुक्यातील खामगाव येथील राजेंद्र रावसाहेब ठोंबरे यांची ‘ठोंबरे फार्म अॅण्ड नर्सरी’ राज्यासह परराज्यांतील शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरली आहे. विशेषतः सीताफळ आणि पेरूसाठी ठोंबरे नर्सरीचा ब्रॅण्ड सर्वाधिक विश्‍वासार्ह बनला आहे.
Custard Apple
Custard Apple Agrowon

खामगाव (ता. बार्शी) येथे राजेंद्र ठोंबरे यांनी बंधू संतोष ठोंबरे यांच्यासह सीताफळ (Custard Apple),पेरू (Guava) या फळपिकांसह (Fruit Crop) शेतीत विविध प्रयोग केले आहेत. त्यांच्याकडे सुमारे २५ एकरवर सुपर गोल्डन सीताफळ (Super Golden Custard Apple) आहे. तर १५ एकरवर व्हीएनआर वाणाचा पेरू (Guava) आहे. अडीच एकरवर त्यांची नर्सरी उभारली आहे. प्रयोगशीलतेवर आणि विश्वासार्हतेवरच त्यांनी नर्सरी उद्योग उभारला. आज राजेंद्र ठोंबरे हे पूर्णवेळ शेती आणि नर्सरी उद्योग पाहतात, तर बंधू संतोष ठोंबरे यांच्याकडे कुबोटा या ट्रॅक्टरची सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याची डीलरशीप आहे. ट्रॅक्टरची विक्री आणि विक्रीपश्चात सेवा या दोन्हींमध्ये कंपनीकडून त्यांना उत्कृष्ट सेवा देणारे विक्रेते म्हणून देशातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला आहे. दोन्ही बंधूंनी आपापल्या व्यवसायात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या सगळ्यात दोघांचीही नाळ मात्र शेतीशी अगदी घट्ट जुळलेली आहे.

सीताफळ शेतीतून नर्सरी उद्योगाचा श्रीगणेशा

ठोंबरे यांच्याकडे आधी द्राक्षबाग होती. पण द्राक्षशेतीतील वाढता उत्पादनखर्च आणि बदलत्या वातावरणात द्राक्षबागांमध्ये अडचणी येऊ लागल्याने त्यांनी बाग काढली. त्यानंतर मध्यम, हलक्या जमिनीवर येणारे, कमी पाण्यावर, कमी खर्चात आणि वातावरणाला काटक ठरणाऱ्या सीताफळाकडे ते वळले. त्यातून २०१५ मध्ये पहिल्यांदा त्यांनी दहा एकर क्षेत्रावर सुपर गोल्डन सीताफळाची लागवड केली. पुढच्या दोन वर्षांत त्यांना सीताफळाने सुमारे १८ लाखांपेक्षाही अधिक उत्पादन दिले. प्रतिझाड पाच ते सहा किलो प्रमाणे दहा एकरांतून सुमारे १५ टन उत्पादन मिळाले आणि प्रतिकिलो सुमारे १२५ ते १६० रुपयांपर्यंत दर मिळाला. पुढे त्यांची प्रगतीशील सीताफळ उत्पादक हीच ओळख बनली. शेतकऱ्यांची भेटी वाढल्या. सीताफळाचे व्यवस्थापन, नियोजन याची माहिती घेताना शेतकरी रोपांची मागणी करायचे. यातून प्रेरणा घेत ठोंबरेंनी रोपे तयार करायचे ठरवले. त्याच वर्षी ‘ठोंबरे फार्म अॅण्ड नर्सरी’ या उद्योगाचा श्रीगणेशा झाला.

‘रेसिड्यू फ्री’ उत्पादन, ‘क्यूआर कोड’चा वापर

सीताफळासाठी खत, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करताना रासायनिक अवशेष मुक्त (रेसिड्यू फ्री) उत्पादन घेतले. त्याचे प्रमाणीकरण करून प्रमाणपत्रही घेतले. ग्राहकांना खात्री पटावी, यासाठी बॉक्सवरच छापलेला ‘क्युआर’कोड स्कॅन करून रेसिड्यू फ्री प्रमाणपत्र पाहणे शक्य झाले. विश्वासार्हता वाढली. रेसिड्यू फ्री उत्पादन आणि त्याचे प्रमाणीकरण अशा दोन्ही तंत्रज्ञानाच्या वापराचे त्यांनी स्वतंत्रपणे आणि नेमकेपणाने मार्केटिंग केल्याने त्यांच्या सीताफळाला अन्य सीताफळापेक्षा बाजारात चांगली

मागणी राहिली.

Custard Apple
Dragon Fruit: 'ड्रॅगन फ्रुट'च्या शेतीचा एवढा बोलबाला का?

सीताफळ, पेरूसह आंबा, लिंबू रोपे

नर्सरीसाठी खास दीडएकरचे ग्रीनहाऊस त्यांनी उभारले आहे. आज त्यांच्याकडे सुपर गोल्डन, बाळानगरी सीताफळ, व्हीएनआर पेरू, कागदी लिंबू, चिंच, अॅपल बोर, नारळ यासारखी विविध कलमी आणि देशी वाण उपलब्ध आहेत. ग्रीनहाऊसमुळे रोपांची वाढ एकसारखी होते, रोपांच्या पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होते, तसेच पाने तजेलदार दिसतात. शिवाय ऊन, सावलीचे नियंत्रण योग्य पद्धतीने होते, अर्थातच, रोपे कायम ताजीतवानी दिसतात.

Custard Apple
Dragon Fruit: ड्रॅगन फ्रुटसाठी हरियाणात सव्वा लाखाचे अनुदान

...म्हणून गुणवत्ता आणि दर्जा

विविध प्रकारची फळरोपे त्याच्यांकडे उपलब्ध आहेत, तरी त्यांच्याकडील सीताफळ आणि पेरूला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असते. त्यातही सुपर गोल्डन सीताफळाला सर्वाधिक उठाव मिळतो. कलमे भरण्यासाठी त्यांना काड्या बाहेरून आणाव्या लागत नाहीत. त्यांच्याकडे स्वतःचीच बाग असल्याने आणि आधीच ही बाग रेसिड्यू फ्री असल्याने उपजतच काड्याही तेवढ्याच शुद्ध आणि खात्रीच्या मिळतात. त्यामुळे त्यांच्या रोपांना एक गुणवत्ता आणि दर्जा मिळतो. रोपांना मागणी चांगले असण्याचे हे एक कारण आहे.

शासनमान्य नर्सरी

शेतकऱ्यांना फलोत्पादन योजनेतून लाभासाठी सीताफळ वा अन्य रोपे शासन मान्य नर्सरीतून घ्यावी लागतात. ठोंबरे फार्म अॅण्ड नर्सरीची कृषिविभागाकडे अधिकृत नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे कृषी विभागाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, भाऊसाहेब फुंडकर योजना, रोजगार हमी योजना यासारख्या विविध फलोत्पादन योजनांसाठी आवश्यक असणारे शासकीय बिल शेतकऱ्यांना मिळते.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाची मान्यता

शासनमान्य असणाऱ्या देशभरातील विविध भाजीपाला, फळभाज्यांच्या नर्सरीची नोंदणी राष्ट्रीयस्तरावर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडेही (एनएचबी) केली जाते. जेणेकरून देशभरातील अशा मान्यताप्राप्त नर्सरीमध्ये उपलब्ध असलेल्या रोपांची माहिती आणि खरेदी शेतकऱ्यांना करता यावी, यासाठी ही नोंदणी केली जाते. एनएचबीच्या वेबसाइटवर ठोंबरे फार्म अॅण्ड नर्सरीकडील रोपे आणि रोपांच्या उपलब्धतेची माहिती पाहायला मिळते. तसेच शासकीय योजनेतून सीताफळ लागवडीसाठी शेतकऱ्यांना रोपे आणि त्याचे अधिकृत बिलही मिळू शकते.

रोपविक्रीबरोबर मार्गदर्शन...

केवळ रोपे विक्री करुन जबाबबदारी संपली, असे केले जात नाही. तर राजेंद्र ठोंबरे हे स्वतः शेतकऱ्यांना सीताफळाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन करतात. अनेक वेळा शेतकऱ्यांच्या बांधावर ते जातात. एवढ्यावरच ते थांबत नाहीत, अगदी कुठले मार्केट चांगले आहे, सीताफळातील व्यापारी कोणते आहेत, याची माहितीही ते शेतकऱ्यांना देतात.

कुटुंबाची साथ महत्त्वाची

शेती, नर्सरीची सर्व जबाबदारी राजेंद्र हे सांभाळत असले, तरी बंधू संतोष यांचेही शेती आणि नर्सरीमध्ये तेवढेच लक्ष असते. त्याशिवाय आई-वडील आणि कुटुंबातील अन्य सर्व सदस्यांचाही शेतीकामासह नर्सरीच्या कामात सक्रीय सहभाग असतो. अर्थात, संपूर्ण कुटुंबियांच्या सहकार्यामुळेच हा सर्व व्याप सांभाळता येतो, असे राजेंद्र ठोंबरे आवर्जून सांगतात.

- राजेंद्र ठोंबरे

९६७३६०६३८७, ९१४६१८५९५९

गुणवत्ता आणि विश्‍वास या बळावरच आमच्या रोपांना शेतकऱ्यांकडून मागणी होते. त्यांच्या या विश्‍वासाचे बळच आम्हाला आणखी प्रेरणा देते, त्यांची विश्वासार्हता आम्हाला महत्त्वाची वाटते. त्यामुळे जे द्यायचे ते उत्तमच, या भावनेतून काम करतो.
राजेंद्र ठोंबरे, ठोंबरे फार्म अॅण्ड नर्सरी, खामगाव

ठोंबरे नर्सरीची वेबसाइट, फेसबुक पेज

सीताफळ, पेरूसह अन्य सर्व रोपांची बुकिंग करण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मवर येण्याची गरज नाही. त्यासाठी स्वतंत्र तीन वेबसाइट तयार केल्या आहेत. www.sitaphalnursery.com, www.thombarenursery.com आणि www.custardapplenursery.com या वेबसाईटवर जाऊन शेतकरी आपली मागणी नोंदवू शकतात. त्याशिवाय नर्सरीचे स्वतंत्र फेसबुक पेज असून, युट्युबरवरही नर्सरीसंदर्भातील अनेक व्हिडिओ व माहिती उपलब्ध आहे.

सहा राज्यांतून रोपांना मागणी

दरवर्षी सोलापूरसह मराठवाडा, विदर्भ, खानदेश अशा राज्याच्या विविध भागात ठोंबरे नर्सरीची रोपे जातात. पण अलीकडच्या काही वर्षांत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही सीताफळ, पेरू रोपांना मागणी वाढली आहे. केवळ गुणवत्ता आणि विश्‍वासार्हतेमुळेच हे शक्य झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com