Bamboo : संपूर्ण बांबू केंद्राद्वारे आदिवासींना मिळाला रोजगार

अमरावती जिल्ह्यात लवादा (पो. दुनी, ता. धारणी) येथे कै. सुनील व निरुपमा या देशपांडे दांपत्याने संपूर्ण बांबू केंद्राची उभारणी केली.
Tribals got employment through the entire bamboo centre
Tribals got employment through the entire bamboo centreAgrowon

अमरावती जिल्ह्यात लवादा (पो. दुनी, ता. धारणी) येथे कै. सुनील व निरुपमा या देशपांडे दांपत्याने संपूर्ण बांबू केंद्राची उभारणी केली. त्याद्वारे दुर्गम मेळघाटातील आदिवासींना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन बांबूपासून वौशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती केली जाते. त्यातून होणाऱ्या उलाढालीतून आदिवासींना कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.

Tribals got employment through the entire bamboo centre
Bamboo : बांबू कोंबांपासून लोणचे, बिस्कीट

अमरावती जिल्ह्यात दुर्गम मेळघाटात लवादा (पो. दुनी, ता. धारणी) येथे कै. सुनील व निरुपमा या देशपांडे दांपत्याने उभारलेले संपूर्ण बांबू केंद्र प्रसिद्ध आहे. जिद्द व अथक प्रयत्नांतून
या दांपत्याने येथील आदिवासींना बांबू व्यवसायाच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला. नागपूर येथील सुनील यांचे वडील मिल कामगार होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. अशा स्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ‘बीएसडब्ल्यू’चे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख निरुपमा यांच्याशी झाली. त्यांनी एमएसडब्ल्यू (मास्टर ऑफ सोशल सायन्स) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे निरुपमा यांना मुंबई म्हाडा येथे नोकरी लागली. सुनील पांढरकवडा (यवतमाळ) येथे आर्किटेक्ट मित्र (कै.) विनू काळे यांच्या सोबत बांबूपासून वस्तूनिर्मिती प्रकल्पात काम करू लागले.
दरम्यान मे १९९५ मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणाचा उपयोग आदिवासींसाठी करावा या हेतूने त्यांनी मेळघाटात कार्य करण्याचा निर्णय घेतला. लवादा येथील रामकीबाई यांनी सुरुवातीला घर उपलब्ध करून दिले.

Tribals got employment through the entire bamboo centre
बांबूपासून टूथब्रश बनविणारे 'बांबू इंडिया' स्टार्टअप

शिक्षणातून कौशल्य

मेळघाटात सोयीसुविधांचा अभाव व कुपोषणाचा प्रश्‍न गंभीर होता. त्यातूनच माता व बालमृत्यूचे प्रकार घडत होते. रोजगारा अभावी पैसा व क्रयशक्तीचा अभाव असल्याने पौष्टिक अन्न खरेदी करता येत नव्हते. परिस्थिती लक्षात आल्यानंतर दांपत्याने रोजगारासाठी चाचपणी सुरू केली. येथे जंगलातील बांबूपासून वस्तूनिर्मिती केली जाते असे आढळले. कोरकू, भिलाला, गोंड या प्रमुख आदिवासींना त्या दृष्टीने प्रशिक्षित करून कौशल्यवृध्दी आणण्याचा प्रयत्न झाला. म्हणता म्हणता प्रशिक्षणार्थींची आजची संख्या नऊ हजारांवर पोहोचली आहे.

बांबू घरांची निर्मिती

२१ जानेवारी १९९७ मध्ये संस्थेची नोंदणी झाली. संपूर्ण बांबू केंद्र असे नामकरण झाले. लवादा परिसरात दांपत्याला भाऊ आणि ताई म्हणून ओळख मिळाली. सन २००० मध्ये गुजरातमधील कच्छमध्ये भूकंप आला. त्या वेळी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत संस्थेने दीड वर्षांत ७४५ बांबू घरांचे काम पूर्णत्वाला नेले. पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि सुरक्षित घरांचा पर्याय म्हणून त्यास पसंती मिळाली. पुढेही दिल्ली, वर्धा, पुणे, सनसवाडी (पुणे) येथेही बांबू घर उभारणीचे काम मिळाले. दापोली येथे बांबूचे दुमजली घर बांधले. टप्प्याटप्प्याने शासकीय प्रकल्पात घरे उभारण्याची संधी मिळाली.

सहकारी संस्थेची पायाभरणी

संस्थेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या बांधावर ३० हजार बांबू रोपांची लागवड व त्यातून संवर्धन करण्यात येत आहे. मातीची धूप रोखण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. मानवेल जातीच्या बांबूची केंद्राकडून खरेदी होते. त्याची टिकवणक्षमता चांगली असल्याने विविध कलात्मक साहित्य तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो. बाजारातील दरानुसार (८० रुपये प्रति नग) खरेदी होते. त्यातून
शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा स्रोत तयार झाला आहे. निधीची अडचण दूर करण्यासाठी पर्यायी वेणूशिल्पी औद्योगिक सहकारी संस्था स्थापना करण्यात आली. या माध्यमातून उत्पादन आणि विपणनाचे काम होते. देणगीदारांच्या माध्यमातून निधी उभा राहतो. त्याचा विनियोग संस्थेच्या विविध प्रकल्पांसाठी होतो.

प्रशिक्षण व विक्री

केंद्रातील कारागिरांमध्ये कौशल्यगुण रुजावेत यासाठी ठरावीक कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम ठेवले जातात. इच्छुक प्रशिक्षणार्थींना ‘टूलकिट’ देण्यात येते. ठाणे, मुंबईसह राजस्थान, आयआयटी. कानपूर, दिल्ली येथील विद्यार्थीही प्रशिक्षणासाठी येतात. उत्पादनाची विक्री येथील केंद्रासह नागपूर येथील धरमपेठ तसेच डिझाइन स्टुडिओ या ठिकाणाहूनही होते. पुण्यात ‘मेळघाट सपोर्ट ग्रुप’च्या सहकार्याने तीन दिवस वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते.

बांबूपासूनची उत्पादने

कानातील डुल, गळ्यातील माळ, इअर रिंग, गरम भांडे चुलीवर असताना काळे पडू नये साठीचे पात्र,
पेपरवेट, आकाशकंदील, गणेश फ्रेम, मखर, बांबू घरे
राखी- केंद्र बांबूपासून राख्याही तयार करते. ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनशिप या
भारत सरकारच्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेने तयार केलेल्या राख्या विविध देशांत पाठविण्यात येतात. काही ग्राहकांकडूनही परदेशात राखी पाठविण्याची मागणी होते.

Tribals got employment through the entire bamboo centre
औष्‍णिक ऊर्जानिर्मितीसाठी कोळशाऐवजी बांबू सक्षम पर्याय

कार्याचा वारसा

संस्थेच्या विविध प्रकल्पांद्वारे मेळघाटातील साडेतीनशे व्यक्तींना रोजगार मिळाला आहे.
सन २०२१ मध्ये कोरोनाची लागण सुनील देशपांडे यांना झाली. त्यात त्यांचे निधन झाले.
मात्र कार्याचा वारसा निरुपमाताईंनी पुढे जिद्दीने सुरू ठेवला आहे. आज त्यांच्या दोन्ही संस्थांची वार्षिक उलाढाल प्रत्येकी ५० लाख याप्रमाणे सुमारे एक कोटींपर्यंत पोहोचली आहे.

संस्कारपीठाची पायाभरणी

संस्थेचा कारभार देणगीदारांवर अवलंबून असतो. एका दानशूराकडून मिळालेल्या आठ लाख रुपयांच्या देणगीतून कोठा येथे आठ एकर जमीन खरेदी केली. तेथे ग्राम ज्ञानपीठ उभारले आहे. पतंग महोत्सव,
घुंगरू बाजार, पौष्टिक धान्य विक्री, रुग्णवाहिका व आरोग्यविषयक जागृती असे उपक्रम राबवणियात येतात.

संपर्क- निरुपमा देशपांडे- ८६६८५८८६०२
गणेश कनासे- ८०८०८५६३७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com