Water Conservation : लोकसहभागातून जलसंधारणामुळे घाटसिरस झाले पाणीदार

लोकसहभाग व वन्य विभागाच्या मदतीने घाटसिरस (जि. नगर) गावात वीस वर्षांपासून जलसंधारणाची कामे घडली. त्यातून शाश्‍वत पाणी उपलब्ध झाले.
Water Conservation
Water ConservationAgrowon

Ahmednagar News: नगर जिल्ह्यातील पाथर्डी हा दुष्काळी तालुका आहे. तालुक्यात बालाघाटाच्या डोंगररांगा आहेत. कोणत्या मोठ्या धरणाचे (Dam) तालुक्याला शाश्‍वत पाणी (Water Availability) नाही. त्यामुळे स्थानिक गावतलाव, पाझर तलाव, बंधारे (Water Bunds) यातून मिळणाऱ्या पाण्यावरच शेतीची (Agriculture Irrigation) मदार असते.

याच डोंगररांगांतील सात हजार लोकसंख्येचे गाव म्हणजे घाटशिरस. थेट जनेतेने निवडून दिलेले गणेश सुधाकर पावले हे तरुण सरपंच आहेत. अलकाताई पोपट चोथे उपसरपंच आहेत.

महेश वाघमारे, प्रकाश माळी, अलकाताई पडोळे, द्वारकाताई सिरसाट, भाऊसाहेब पालवे, आसराबाई पाठक व काका पडोळ हे सदस्य, तर आजीनाथ नेहरकर हे ग्रामसेवक पदी कार्यरत आहेत.

गावाला पाण्याची शाश्‍वत सोय करण्यासाठी वीस वर्षांपूर्वी माजी सरपंच सुधाकर पालवे यांच्या पुढाकारातून लोकसहभाग व वन विभागाच्या मदतीने जलसंधारणाच्या कामांना सुरुवात झाली.

आजही कामांत सातत्य आहेच. विद्यमान सरपंच गणेश यांचे आजोबा माजी सरपंच स्व. शिवराम पालवे यांचेही विकासात मोठे योगदान आहे.

झालेली कामे व फलश्रुती

१) गावाच्‍या सभोवताली डोंगराचा मोठा परिसर. वृद्धेश्‍वराच्या डोंगरातून दोन नद्या वाहतात. घाटसिरसपासून थेट देवराईत दोन्ही नद्यांवर वीस वर्षांपूर्वी सात साखळी बंधारे.

२) सन २०१४ मध्ये जलयुक्त शिवार अभियानात गावाची निवड. त् ‍यावर्षी गरजेनुसार दोन्ही नद्यांवर साखळी बंधारे.

३) डोंगरात शंभराहून अधिक छोटे मातीनाला बांध तर ‘वॉटर’ संस्थेच्या माध्यमातून १५ दगडी बांध.

४) साडेतीनशे हेक्टरवर डोंगरावर सलग समतल चर बांधले.

५) शिवारात १०० हून अधिक विहिरी आहेत.

६) एकूण कामांतून भूजलपातळी वाढली. उन्हाळ्यापर्यंत बंधाऱ्यात पाणी असते. पूर्वीची पिण्याच्या पाण्याची टंचाईही दूर झाली.

७) लोकसहभाग व विविध सरकारी उपक्रमांतून गावशिवाराचे चित्र पालटले.

पीक पद्धती बदलली

गावाचे एकूण १९९१ हेक्टर क्षेत्र असून पैकी ९०३ हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. ५५६ हेक्टर वन विभागाचे आहे. जलसंधारणामुळे पीक पद्धतीतही बदल होत गेले. पूर्वी पावसावर अवलंबून असलेली बाजरी, ज्वारी, हुलगे, करडई, हुलगे, मठ अशी पिके घेतली जायची.

गेल्या दहा वर्षांत डाळिंब (२०० हेक्टर), संत्रा (१०० हेक्टर), मोसंबी, अलीकडे सीताफळ व केशर आंबा (प्रत्येकी २५ हेक्टर) आदी पिके शिवारात दिसू लागली आहेत.

Water Conservation
‘जलसंधारण’च्या ३९ पदांवर एकत्रीकरणामुळे संकट

जिरॅनियम, बटाटा, बागायती कापूस, गहू, कांदा अशी विविधताही दिसत आहे. शंभर हेक्टरहून अधिक क्षेत्रातील फळपिकांत आंतरपीक आहे.

गावातील तरुण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. त्याचा अनुभव घेण्यासाठी अभ्यास सहलीही काढल्या जातात. त्यातून उत्पादन वाढ आणि आर्थिक प्रगती होत असल्याचे शेतकरी प्रा. राम पालवे सांगतात.

तीन वर्षांपूर्वी गणेश पालवे यांनी अडीच एकरांत सफरचंद लागवडीचा प्रयोग हे. दहा शेतकऱ्यांनी चंदन, अश्‍वगंधाची लागवड झाली आहे.

गावातील उपक्रम

१) सव्वाशे हेक्टरहून अधिक क्षेत्रावर चारा उत्पादन. दीडशेच्या जवळपास शेतकरी दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत. गावात दररोज तीन हजार लिटरच्या जवळपास दूधसंकलन.

२) अनेक शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल. सुमारे १८ महिला बचतगट असून ‘वॉटर’ संस्थेकडून ३५० महिलांना स्लरी निर्मितीचे प्रशिक्षण व साहित्य दिले आहे.

३) तरुण स्वच्छता अभियान व अन्य बाबीसाठी श्रमदान.

४) सर्व ५६४ कुटुंबाकडून शौचालयाचा वापर.

५) सन २०१८-१९ मध्ये गावाला हागणदारीमुक्तीचा तर २०१४ मध्ये तंटामुक्त पुरस्कार.

६) सरकारी निधीतून रस्त्यांची कामे.

७) वन विभागाने गावाला दत्तक घेतलेले असून, गावकऱ्यांच्या मदतीने वड, चिंच, उंबर, पिंपळ, अजनावृक्ष, मोह, बिबवा, पळस, कदंब आदी दोन लाखांहून अधिक वृक्षलावड.

८) तरुणांकडून स्व. सुधाकर प्रतिष्ठानची स्थापना. केले. त्याद्वारे गेल्या वर्षी बारा हजार बियांचे रोपण.

९) वृद्धेश्‍वर देवस्थान परिसरात दहा कचरा कुंड्या. कोरोना काळात शंभरहून अधिक आर्थिक गरीब कुटुंबांना किराणा साहित्य वाटप.

१०) घाटसिरससह दहा किलोमीटर परिसरात जंगल आहे. त्यामुळे या भागात बिबट्याची अनेक वर्षांपासून दहशत आहे. गेल्या वर्षी एका बालकाचा बिबट्याने बळी घेतला. जनावरांनाही ठार केले. जेव्हा बिबट्याची दहशत निर्माण होते, त्या वेळी गावकरी एकत्र येऊन संकटाशी मुकाबला करतात.

देवस्थानांचा कायापालट

गर्भगिरीच्या डोंगररांगांत पाच-सात किलोमीटरच्या अंतरावर नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ यांच्या संजीवन समाधी. त्याच डोंगररांगेत नवनाथांचे श्रद्धास्थान असलेले व पुरातन वृद्धेश्‍वर (म्हातारदेव) देवस्थान आहे.

देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. गावातील तरुण दर रविवारी ‘‘दोन तास देवासाठी’’ असा श्रमदान उपक्रम राबवतात. लोकसहभागातून देवस्थानचा कायापालट झाला आहे.

Water Conservation
Chana Irrigation : हरभऱ्याला तुषार सिंचनान पाणी का द्याव?|Agrowon

कावडी मित्र मंडळाने दोन लाख खर्चून ग्रामदैवत मारुती मंदिराचा जीर्णोद्धार केला. जिल्हा परिषदेच्या शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. गावकरी आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने पंधरा लाख खर्चून संत भगवानबाबा व संत वामनभाऊ महाराज यांचे मंदिर उभारले आहे.

संपर्क ः गणेश सुधाकर पालवे, (सरपंच)- ८७६६९२००३१, ९९२१४१४१०७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com