Food Processing : ‘फ्लेव्हर्ड पॉपकॉर्न’ निर्मितीतून तरुण झाला उद्योजक

साखराळे (जि. सांगली) येथील दत्तात्रेय पाटील या अभियंता तरुणाने पत्नी धनश्री यांच्या साथीने तीन फ्लेव्हर्समधील पॉपकॉर्न दिनसिंधू पॉपअप या ब्रॅण्डने दोन प्रकारच्या आकर्षक पॅकिंग बाजारपेठेत दाखल केले आहेत.
Popcorn Production
Popcorn ProductionAgrowon

Popcorn production Sanagali : सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात (Valava Taluka) इस्लामपूर- साखराळे येथे दिनकर पाटील यांची दोन एकर शेती आहे. साहजिकच आर्थिक तजवीज करणे मुश्कील असायचे. परिस्थितीमुळे आपल्याला फार शिकता आले नाही.

मात्र आपली मुले चांगली शिकली पाहिजेत हा दिनकर यांचा आग्रह असायचा. दत्तात्रेय सांगतात, की माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वडिलांना २० गुंठे शेती गहाण ठेवावी लागली. सन २०११ मध्ये बीईचे (मेकॅनिकल) शिक्षण पूर्ण केले.

पुण्यात एक वर्ष नोकरी केली. मग एमई देखील पूर्ण केले. गावी आलो. पेठ येथील ‘इंजिनिअरिंग’ महाविद्यालयात २०१७ मध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. पण शिक्षणाचा उपयोग करून व्यवसाय सुरू करावा असे वाटत होते.

नोकरी सोडून व्यवसायात

नोकरी सोडून व्यवसाय (Busniss) करणार असल्याचे घरच्यांना सांगितले खरे. पण त्यांना ही गोष्ट पटेना. कारण त्यात मोठी जोखीम होती. पण व्यवसायात नवीन संकल्पना राबवू शकतो. सुरुवातीला नोकरीपेक्षा कमी पैसा मिळेल, पण पुढे उद्योजक म्हणून नाव मिळवण्याची संधी आहे, असा विश्‍वास दत्तात्रेय यांनी घरच्यांना दिला.

शिक्षणाचा उपयोग व्यवसायात होण्याच्या दृष्टीने ‘इंजिन’साठी उपयोगी ऑइल विक्री व्यवसाय सुरू केला. पण २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले. व्यवसायाला ‘ब्रेक’ लागला.

Popcorn Production
वाळवा तालुक्‍यात ‘लाळ खुरकूत’ची ७० हजार जनावरांना लस

व्यवसायाचा मार्ग सापडला

अडचणीचा किंवा संकटाचा काळ नव्या विचारांना पुढे नेण्याचे काम करतो, या विचाराने दत्तात्रेय यांनी जिद्द कायम ठेवली. बाजारपेठा बंद असण्याच्या काळात ‘वेफर्स’, कुरकुरे आदी पदार्थांना मागणी होती हे लक्षात आले.

एकदा बंगळूर येथे दत्तात्रेय गेले असता आकर्षक पॅकिंगमधील पॉपकॉर्न उत्पादन पाहण्यास मिळाले. पॉपकॉर्न साध्या पिशव्यांमधून किंवा सुट्ट्या पद्धतीने उपलब्ध होतो पण अशा पॅकिंगमध्ये तो सादर करण्याची कल्पना दत्तात्रेय यांना आवडली. इथेच व्यवसायाचा मार्ग सापडला.

सुरुवातीचे प्रयत्न

दत्तात्रेय सांगतात, की ‘सोशल मीडिया वर विविध स्वादाच्या पॉपकॉर्न निर्मितीची माहिती संकलित केली. बंगळूर येथील एका कंपनीला भेट देत तेथील उत्पादने व पॅकिंग यांचा अभ्यास केला.

तेवढ्यावर न थांबता नाशिक- मोहाडी येथील सह्याद्री शेतकरी कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी पॉपकॉर्नसाठी लागणाऱ्या अमेरिकन ग्रेड मक्याविषयी माहिती दिली. गुजरात, कर्नाटकातून तो खरेदी करण्याविषयी सांगितले.

सर्वेक्षण केले

कोरोना काळानंतर आठ महिन्यांनंतर बाजारपेठा सुरू झाल्या. त्या वेळी ‘रेडी टू इट’ असा पॉपकॉर्नसाठी मका मिळतो. त्याआधारे घरीच पॉपकॉर्न तयार केले आणि ‘मार्केट’मध्ये भटकंती सुरू झाली.

बेकरी, किराणा दुकाने, टपरी अशा ठिकाणी जाऊन उत्पादन विक्रीस ठेवण्याविषयी चाचपणी सुरू केली.

जवळच्या मंडळींना उत्पादनाच्या स्वादाबाबत फीडबॅक घेण्यास सुरुवात केली. सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला तसा आत्मविश्‍वास निर्माण होऊ लागला.

Popcorn Production
Onion Cultivation : मका, कांद्याचे पीक बहरले

उत्पादन निर्मितीस सुरुवात

दोन वर्षांपूर्वी ५४ बाय १८ फूट जागेत उद्योगाची सुरुवात झाली. यंत्रे, पॅकिंग मशिन यांची खरेदी पंजाब, पुण्यातून केली. विविध फ्लेव्हर्ससह पॉपकॉर्न निर्मितीचा अनुभव नव्हता. शिवाय ते अधिक काळ टिकण्यासाठीही अभ्यास महत्त्वाचा होता.

सोशल मीडिया, अन्य स्रोतांतून पुरेशी माहिती व अभ्यासातून दर्जेदार निर्मितीला प्रारंभ झाला. प्रत्यक्ष अनुभव तेवढाच महत्त्वाचा होता. त्याशिवाय त्यातील बारकावे लक्षात येत नाही. त्यामुळे दत्तात्रेय यांच्या पत्नी धनश्री यांनी घोगाव (ता. पलूस) येथील दत्तात्रेय यांचे मित्र सुवर्णजीत चव्हाण यांच्या प्रक्रिया उद्योगात कामाचा अनुभव घेतला. इथे पॅकिंगचाही अभ्यास झाला.

अनुभवातून शिक्षण

उत्पादन सुरू होण्यापूर्वी ‘मार्केटिंग’ सुरू केले होते. या काळात अनेकांनी तुमचे ‘प्रॉडक्ट’ घेतो असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात उत्पादन सुरू झाल्यानंतर त्यांनी विक्री करण्यास नकार दिला. त्यावर दत्तात्रेय यांनी काउंटरवर तर ठेवा, विक्री झाली तरच पैसे द्या अशी विनंती केली.

त्यास विक्रेत्यांनी संमती दिली. स्थानिक ‘मार्केट’सह अन्य जिल्ह्यांमध्ये उतरण्यासाठी ‘सोशल मीडिया’चा प्रभावी वापर सुरू केला. टाटा उद्योगाच्या भारतीय युवा शक्ती ट्रस्टतर्फे युवा उद्योजकांना ‘मार्केटिंग’बाबत मार्गदर्शन केले जाते. त्यांचीही मदत घेतली.

पॉपकॉर्न विक्रेत्यांपर्यंत पोहोचले. दरम्यान, उत्पादनाची गुणवत्ता टिकवायची तर पॅकिंगही त्या दर्जाचे हवे असा ‘फीडबॅक’ मिळू लागला. त्यादृष्टीने पॅकिंगचा प्रकार, यंत्र आणि दर्जेदार सीलिंग घटक यांचा वापर सुरू झाला.

योजनेची मदत

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. त्या अंतर्गत उद्योगासाठी ३५ टक्के अनुदान मिळते. त्यासाठी अर्ज दाखल केला असून मंजुरीही मिळाली आहे.

या व्यतिरिक्त बॅंकेकडून ५५ टक्के, तर स्वतःकडील १० टक्के वाटा असे रकमेचे नियोजन होते. मिळालेल्या अनुदानातून पाऊच पॅकिंगचे यंत्र खरेदी केले जाणार आहे.

पाटील यांचा उद्योग दृष्टिक्षेपात

-दिनसिंधू पॉपअप नावाचा ब्रॅण्ड

-फूड ग्रेड प्लॅस्टिक पाऊच (३० ग्रॅम) व पीपी ग्लास (४५ ग्रॅम) अशा दोन पॅकिंगमध्ये उत्पादन.

-टोमॅटो, चीज आणि सॉल्ट असे फ्लेव्हर्स. त्यांना चांगली मागणी आहे. अजून दोन फ्लेव्हर्स सादर केले जाणार आहेत.

-सहा वितरक. (सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, विजापूर)

-या शिवाय पाच ते सहा गावांमधील १५ चित्रपटगृहांत थेट विक्री.

- दिवसाला एक हजार पॅकिंगची होते निर्मिती. महिन्याला २५ ते ३० हजार पॅकिंगची होते विक्री.

-गुजरातेतून अमेरिकन ग्रेडच्या मक्याची १२० रुपये प्रति किलो दराने खरेदी.

Popcorn Production
Corn Market : जागतिक मका उत्पादन घटल्यानं दर चांगले

गुंतवणूक, उलाढाल

प्रकल्प खर्च- १५ लाख, बँक अर्थसाह्य- ७ लाख, स्वभांडवल- ८ लाख रु.

-उलाढाल पहिल्या वर्षी १५ लाख तर यंदा चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत ती १८ ते २० लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

‘ॲग्रोवन’ ठरला वाटाड्या

ॲग्रोवनमध्ये प्रकाशित होणाऱ्या ‘स्टार्टअप’ उद्योगातील यशोगाथांनी अन्न प्रक्रिया उद्योगात उतरण्यासाठी प्रेरणा व दिशा दिली. त्यामुळे ॲग्रोवन माझ्यासाठी वाटाड्या ठरला आहे. बाजारातील सातत्याने होणारी स्थित्यंतरे देखील त्याद्वारे समजतात अशी भावना दत्तात्रेय यांनी व्यक्त केली आहे.

दत्तात्रेय पाटील- ८००७४७३००३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com