मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवण्यास प्राधान्य - जयंत पाटील  

मराठवाड्यातील पाण्याच्या टंचाईवर(Water Scarcity in Marathawada) मात करण्यासाठी गोदावरी (Godavari ) थेट कालवा दुरुस्तीच्या कामाला वेग देण्यात येत असून येत्या दोन वर्षांत हे उद्दिष्ट सिद्ध होईल, असा विश्वासजयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला आहे.
 Priority to solve water Scarcity in Marathawada
 Priority to solve water Scarcity in Marathawada

मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य (Water Scarcity in Marathawada) कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असून जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे अत्याधुनिक करण्याचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाले तर मराठवाड्यातील पाणी टंचाई (Water Scarcity in Marathawada) असलेल्या भागांना पाणी मिळेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री (Water Resources Minister) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला आहे. 

मंगळवारी विधानसभेत २६३ अन्वये अनुदान मागणीवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यातील पाणीपुरवठ्यासंदर्भातील विविध विकास कामांची माहिती देताना जयंत पाटील (Jayant Patil) बोलत होते. सभागृहातील अनेक सदस्यांनी या चर्चेत भाग घेत अनेक चांगल्या सुचना केल्या.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचावे यासाठी शासनाचा जलसंपदा (Water Resources Department) विभाग काम करत आहे. या उद्देशाने शासनाने अनेक कामे पूर्ण केली असून अनेक कामे सुरू असल्याची माहिती देताना पाटील यांनी, सरकारनं मराठवाड्याकडे ( Marathawada) संपूर्ण लक्ष केंद्रीत केल्याचं सांगितलं आहे. 

मराठवाड्यातील पाण्याच्या टंचाईवर (Water Scarcity in Marathawada) मात करण्यासाठी गोदावरी  (Godavari ) थेट कालवा दुरुस्तीच्या कामाला वेग देण्यात येत असून येत्या दोन वर्षांत हे उद्दिष्ट सिद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केलाय. 

निळवंडे (Nilwande) धरणाच्या कामालाही वेग आला आहे. कोविडच्या काळात आर्थिक चणचण असताना या प्रकल्पासाठी ८२३ कोटी ७२ लाख रुपये दिले गेले तर यंदाही २०२२-२०२३ या वर्षांसाठी ३६५ कोटींची तरतूद करण्यात आलीय. निळवंडेच्या (Nilwande) डाव्या कालव्याचे व उजव्या कालव्याचे ७५ टक्के काम पूर्ण झालं असून उर्वरित कामही याच वेगाने होणार आहे. 

३० प्रवाही वळण योजना करून मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. नदीजोड योजना प्रस्तावित आहेत, त्यासाठी अहवाल तयार केला जात आहे. या दोन्ही नदी जोड योजनांची कामे आम्ही तात्काळ सुरू करू. गोदावरी (Godavari ) खोऱ्यात जसं शक्य होईल तसं पाणी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिलीय.

व्हिडीओ पहा-  

कोरोनाच्या काळात पहिल्या वर्षी निधीची कमतरता होती, मात्र तरीही प्रकल्पाची कामे थांबली नाहीत.  प्रकल्प पूर्ण करण्याचे कालबद्ध कार्यक्रम आम्ही आखले आहेत ज्यामुळे येत्या काळात १०४ प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे पाटील म्हणाले आहेत. 

इतर सदस्यांनी महत्त्वाच्या बाबी सभागृहात मांडल्या. त्यांचाही विचार करून योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वासही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केलाय. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com